आदिवासी शेतकऱ्यांना फळ-भाजीपाला लागवडीसाठी निधी मंजुर, वाचा सविस्तर; Adivasi Shetkari Nidhi Manjur 2025

Adivasi Shetkari Nidhi Manjur 2025 ‘आदिवासी कुटुंबाच्या फळेझाडे व भाजीपाला लागवडीची योजना’ या योजनेकरीता सन 2023-24 मध्ये प्रलंबित दायितवांसाठी रुपये 4 लाख रुपये इतकी रक्कम खर्च करण्यास वित्तीय मान्यता देण्यात येत आहे. राज्यातील 14 आदिवासी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ घेता येणार आहे.

Adivasi Shetkari Nidhi Manjur 2025

आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत राज्यातील ठाणे, पालघर, पुणे, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव, अहमदनगर, नांदेड, यवतमाळ, गडचिरोली, चंद्रपूर, अमरावती व गोंदिया या 14 जिल्ह्यातील आदिवासी भागातील कुपोषणाचे प्रमाण कमी करण्याच्या उद्देशाने व आदिवासी बांधवांना पौष्टिक आहार पुरविण्यासाठी, आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत पौष्टिक भाजीपाला व फळांची निवड करून त्याची लागवड” करण्यास प्रोत्साहन देण्यासाठी “आदिवासी कुटुंबाच्या परसबागेत फळझाडे व भाजीपाला लागवड ही योजना राज्यात सन दोन हजार तीन चार पासून राबविण्यात येत आहे.

राज्यात अवकाळीचे पुन्हा संकट.. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर;

Adivasi Shetkari Nidhi Manjur 2025 आदिवासी कुटुंबामध्ये कुपोषणाचा प्रश्न मोठ्या प्रमाणावर असल्याने विशेष बाब म्हणून उपलब्ध करून दिलेल्या तरतुदींतून झालेल्या खर्चाचा अहवाल, लेखाशिर्षनिहाय/उपलेखाशिर्षनिहाय तसेच साध्य झालेले भौतिक उद्दिष्टनिहाय माहिती, निधी उपयोगिता प्रमाणपत्र, संबंधित क्षेत्रीय अधिकारी यांनी आयुक्त, आदिवासी विकास, नाशिक, संबंधित अपर आयुक्त, आदिवासी विकास, आदिवासी विकास विभाग व कृषी व पदुम विभाग यांना प्रत्येक महिन्याच्या 10 तारखेपर्यंत पाठवावी.

WhatsApp Group Join Now

नियंत्रण अधिकारी व विभाग प्रमुख यांनी आदिवासी उपयोजना क्षेत्रात, अतिरिक्त आदिवासी उपयोजना क्षेत्रात तसेच आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरी क्षेत्रात विविध योजनांवर केलेल्या खर्च स्वतंत्रपणे नोंदविला जाईल याची दक्षता घ्यावी. जेणेकरून शासनाला आदिवासी उपयोजना क्षेत्रातील व आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील योजनांवर होणाऱ्या खर्चावर लक्ष ठेवता येईल.

Adivasi Shetkari Nidhi Manjur 2025 आदिवासी घटकांना लाभ द्या

  • आदिवासी घटक कार्यक्रमांतर्गत उपलब्ध करून दिलेल्या तरतुदीतून आदिवासी उपयोजनेतील वैयक्तिक लाभाच्या घेण्यात याव्यात आणि आदिवासी उपयोजना क्षेत्राबाहेरील क्षेत्रात फक्त वैयक्तिक लाभाच्या योजना घेण्यात याव्यात.
  • शासन निर्णयात निर्गमित केलेल्या मार्गदर्शक सूचना व प्रचलित अटी व शर्तीचे व वेळोवेळी दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे.

शासन निर्णययेथे क्लिक करा
इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment