Pomegranate Crop Planning 2025 डाळिंब हे पीक उष्ण आणि समसितोषण कटिबंधात येणारे पीक आहे. या पिकास थंड व कोरडे हवामान उपयुक्त असते. उन्हाळ्यातील कडक ऊन आणि कोरडी हवा तसेच हिवाळ्यातील कडक थंडी डाळिंबाच्या वाढीस योग्य असते. अशा हवामानात चांगल्या प्रतीची दर्जेदार फळे तयार होतात.

कमी पावसाच्या प्रदेशात जेथे सिंचनाची सोय असेल तेथे डाळिंबाच्या लागवडीस भरपूर वाव आहे. किंवा त्या प्रदेशात डाळिंब लागवड वाढताना दिसून येत आहे. डाळिंब हे पीक महाराष्ट्र मध्ये प्रमुखता पश्चिम महाराष्ट्रात सांगली सोलापूर सातारा पुणे, नाशिक अहिल्यानगर संभाजीनगर सोबतच मराठवाडा विदर्भ या भागात कमी पावसाच्या परिसरामध्ये घेतले जाते.
सोयाबीन लागवडीतील महत्त्वाचे मुद्दे !!
Pomegranate Crop Planning 2025 समृद्ध आणि सर्वांगीण विकास आरोग्य खूप सार्या आजारावर काम करणार या दृष्टिकोनातून डाळिंब पीक अतिशय फायदे शीर आहे. नगदी पीक असल्यामुळे तसेच सर्वत्र चांगली मागणी असल्यामुळे बाहेरचे शेजारील देश यांचे कडून ही त्यास चांगली मागणी आहे. त्यामुळे निर्यातक्षम डाळिंबांना चांगली मागणी असलेली दिसून येत आहे.

Pomegranate Crop Planning 2025 महाराष्ट्रात सोबतच इतर राज्यात हे डाळिंब लागवड चांगल्या प्रमाणात आहे. मध्य प्रदेश, गुजरात, राजस्थान, आंध्र, कर्नाटका, इत्यादी.
जमीन– डाळिंबाचे पीक कोणत्याही जमिनीमध्ये घेता येते. पाण्याचा चांगला निचरा होणारी जमीन असावी. गाळाची पोएट्याची जमीन निवडल्यास उत्पन्न चांगले मिळते. त्याचप्रमाणे उताराच्या माळरान हलक्या मुरमाड जमिनी सुद्धा त्याच त्याची लागवड करता येते. डाळिंब लागवड झाल्यानंतर तीन ते पाच वर्षांनी उत्पादन घेता येते.
बहार– डाळिंबाच्या झाडास मुख्य तीन बहार येतात.
- आंबिया बहार
- मृग बहार
- हस्त बहार
कोणत्याही एका बहाराची फळे घेणे फायदेशीर ठरते. आंबिया बहरात वातावरण उष्ण व कोरडे असते त्यामुळे, फळास गोडी येते, व किडी रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो. पाण्याची कमतरता असल्यास मृग बहार चांगले.
बहार येण्याचा काळ | बहार | फळे तयार होण्याचा काळ |
जानेवारी फेब्रुवारी | अंबिया | जून ऑगस्ट |
जून जुलै | मृग | नोव्हेंबर जानेवारी |
सप्टेंबर ऑक्टोबर | हस्त | फेब्रुवारी एप्रिल |
बहार धरताना एक महिना अगोदर संपूर्ण अंतरमशागत करणे आवश्यक असते. खोल नांगरणे, जळवा काढणे, सल काढणे, इत्यादी.
फळाची तोडणी फुले लागल्यापासून डाळिंब तयार होण्यास किमान पाच ते सहा महिने लागतात.
- अंबिया – जून ते ऑगस्ट
- मृग – नोव्हेंबर जानेवारी
- हस्त – फेब्रुवारी एप्रिल
Pomegranate Crop Planning 2025 जमिनीची सुपीकता पांढऱ्या मुळांची संख्या वाढण्यासाठी SRP 9 एकेरी दोन बॅगचा वापर करावा. डाळिंबावर फुलकळी वाढवण्यासाठी डाळिंब पिकाच्या पानागळीसाठी फवारणी करण्या अगोदर 1 महिना
फुलकळी अवस्था | सुपर स्टार 9 | बोरॉन | 00:52:34 |
वाढविण्यासाठी | 2 मि. ली | 0.5 ग्रॅम | 2 ग्रॅम |

प्रति लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी द्यावी. दुसरी फवारणी डाळिंब पिकाची पानगळ झाल्यानंतर आणि नवीन पालवी फुटल्यानंतर पुन्हा तीच फवारणी द्यावी. दोन वेळा फवारणी झाल्यामुळे मादी फुलांची संख्या वाढण्यास मदत होईल.
फुल, कळीगळ रोखण्यासाठी आयकॉन शाईन (75 मि.ली ) + टायकून (20 मि.ली) + बोरॉन (100 ग्रॅम) वापर करावा.
किंवा
अमिनोलाईट (30 मि.ली) किंवा हंसचा (30 मि.ली) 15 लिटर पाण्यासाठी वापर करावा.
पांढऱ्या मुळांची चांगली वाढ होण्यासाठी तसेच मुळे ज्यादा सक्रिय होऊन, झाडाला योग्य ती अन्नद्रव्याचा पुरवठा करून फळधारणा चांगली होण्यासाठी खालील प्रमाणे फवारणी करावी.
1 हंस (400 मिमी)+ सल्फर (1 किलो) प्रति एकर.
अमिनो लाईट + वॉटर सेल्यूबल + फर्टीलायझर (विद्राव्य खते) + सेफ गार्ड 1लिटर फवारणी करावी.
फळ तडकणे – ही समस्या टाळण्यासाठी तसेच चांगले उत्पादन घेण्यासाठी ठिबक सिंचनाद्वारे कॉलड्रीप (2 लिटर) + बोरॉन (250 ग्रॅम) प्रति एकर वापर करावा.
फळांवर चकाकी येण्यासाठी तसेच चमकदार फळ व रसरशीत फळांसाठी केलायटर (2 मिली) + शुगर फास्ट (2 मिली) याचा वापर करावा.
फळांवरील वेल्या या रोगावर नियंत्रण मिळवण्यासाठी तसेच प्रतिबंधक उपाय म्हणून सिफॉन + पेनीटेटर+ M 45 कॅप्टन+SRP या आलटून पालटून फवारणी करावी.

डाळिंब पिकाची पानगळ झाल्यानंतर आणि नवीन पालवी फुटल्यावर सुपरस्ट्रॉंग 9 ची दोन वेळा फवारणी करावी. त्यामुळे मोठी फुलांची संख्या वाढण्यास मदत मिळते.
Pomegranate Crop Planning 2025 डाळिंबामध्ये गोडी उतरण्यासाठी व फळांना आकर्षक रंग, चकाकी, येण्यासाठी शुगरफास्ट 200 मि.ली. + समरूप (0:0:50) + सीबीझेड 50% -100 ग्रॅम 100 लिटर पाण्यामध्ये मिसळून फवारणी द्यावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |