Agriculture News 2025 नागपूर अमेरिका भारतीय शेतमालावर 100% आयात शुल्क लावते. डोनाल्ड ट्रम्प मात्र भारताला टेरीफ किंवा संबोधतात. भारत अमेरिकेच्या कोणत्या शेतमालावर किती आयात शुल्क आकारतो हे स्पष्ट करीत नाही. जर भारताने शेतमालावरील आयात शुल्क हटविले तर भारतातील अन्नसुरक्षा, शेती व शेतकरी धोक्यात येईल. रुपयाचे अवमूल्यन झाल्यास शेतमालाची निर्यात स्वस्त व आयात महाग होईल. हेच डोनाल्ड ट्रम्प च्या टेरीफला योग्य उत्तर आहे, असे मत कृषीतज्ञ विजय जावंधिया यांनी व्यक्त केले.

वर्ल्ड ट्रेड ऑर्गनायझेशनच्या नियमानुसार भारताला आयातीवर शुल्क लावण्याचा अधिकार आहे. अमेरिका त्यांच्या शेतकऱ्यांना दरवर्षी मोठी सबसिडी देते, त्याचा विचार कुणीही करत नाही. उलट, डोनाल्ड ट्रम्प विकसनशीला व गरीब देशांनी आयात शुल्क लावू नये, यासाठी दबाव निर्माण करते. टेरिफ जाहीर करण्यापूर्वी त्यांनी त्यांच्या शेतमालाला दिली जाणारी सबसिडी बंद करावी.
धान उत्पादकांसाठी अनुदानाचा ‘जीआर’ प्रसिद्ध पण अटींचा अडथळा, वाचा सविस्तर;
Agriculture News 2025 अमेरिकन शेतकऱ्यांना मोठी सबसिडी
सन 1995 नंतर अमेरिकेने त्यांच्या शेतकऱ्यांना दिल्या जाणाऱ्या सबसिडीत मोठी वाढ केली आहे. ते कापूस उत्पादनाला दरवर्षी 4.6 बिलियन डॉलर (40 हजार कोटी रुपये) सबसिडी देतात. त्यांच्या शेतमाल निर्यातीसाठी दरवर्षी 12 ते 6 बिलियन डॉलर (102 ते 136 हजार कोटी रुपये) सबसिडी देतात.

Agriculture News 2025 व्हीएतनाम उत्तम उदाहरण
- व्हीएतनामचे चलन ‘डोंग’चे झपाट्याने अवमूल्यन झाले आहे. सध्या 25,644,97 डोंगचे मूल्य एक अमेरिकन डॉलर एवढे आहे. मात्र याच काळात भीत मानणे व्हीएतनामने कापडासह इतर शेतमालाच्या निर्यातीत तेवढ्यात वेगाने वाढ केली आहे, अशी माहिती विजय जावंधिया यांनी दिली.
- अमेरिकेने डॉलरचे अवमूल्यन करण्याचे प्रयत्न सुरू केले आहेत.
- रुपयाचे अवमूल्यन झाल्यास आयात महाग व निर्यात स्वस्त होईल. यातून रोजगार वाढेल. केंद्र सरकारने व्यवस्थित नियोजन करायला हवे.
- अमेरिकेत कोंबडीचे पाय (लेग पीस) खाल्ले जात नाही. टेरिफमुळे ते भारतात आल्यास भारतीय पोल्ट्री उद्योग धोक्यात येऊ शकतो.
- रुपया मजबूत होणे देशातील 10 टक्के लोकांसाठी आवश्यक आहे. 80 टक्के लोक आयात केलेल्या वस्तू वापरत नाही. त्यामुळे त्या महाग झाल्या तरी त्याचा काही फरक जाणवणार नाही.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |