‘गाळ मुक्त धरण व गाळयुक्त शिवार’ योजनेअंतर्गत गाळ काढण्यासाठी 105 कोटी रुपये आले वाचा शासन निर्णय;

शेतकऱ्यांना शेतात गाळ पसरविण्यासाठी देण्यात येणारे अनुदान यासाठी शासन निर्णय आला आहे.

या योजनेतून एकूण रु. 105,40,90,363/- (रुपये एकशे पाच कोटी चाळीस लक्ष 90 हजार तीनशे त्रेसष्ट फक्त ) इतका निधी वितरित करण्यासाठी शासनाने मान्यता दिली आहे.

उपरोक्त निधी आयुक्तमृद्ध व जलसंधारण विभाग औरंगाबाद यांनी तात्काळ संबंधित जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी वितरित करावा.

तसेच संबंधित जिल्हा जलसंधारण अधिकारी यांनी सदर निधी सोबतच्या जोडपत्र अ नुसार काम निहाय व यंत्रेनुसार नमूद अशासकीय संस्थाना तात्काळ वितरित करावा

अनुपालन अहवाल शासन सादर करावा.

गाळ काढलेल्या कामाची व पंचनामा करून गाळ नेणाऱ्या शेतकऱ्यांना अदा करावयाच्या अनुदानाची खातरजमा करून, देयकाच्या आधारे निधीचे वितरण करण्यात यावे.

मंजूर (अदा करावयाच्या) निधीपेक्षा जास्तीची रक्कम अदा करण्यात येऊ नये.

कोणत्याही कारणे निधी अखर्चित राहिल्यास, सदरची रक्कम परस्पर अन्य कामासाठी वितरित न करता तातडीने शासनाकडे प्रत्यपिर्त करावी.

निधी वितरणासंबंधीत गाळमुक्त धरण व गाळयुक्त शिवार या योजनेसंदर्भातील शासन निर्णयान्व्ये निर्धारित कार्यपद्धती व सूचनांचे/तरतुदींचे अनु पालन करण्यात आले असल्यास बाबतची खातरजमा करण्यात यावी.अधिक माहितीसाठी