Unhali Bhuimung 2025 स्वच्छ वातावरणामुळे पिकांवर कीड व रोगांचा प्रादुर्भाव कमी होत असल्यामुळे खरीप हंगामाच्या तुलनेत उन्हाळी हंगामात घेतलेल्या भुईमूग पिकापासून निश्चितच उत्पादन मिळते. अर्थातच हे जास्तीचे उत्पादन मिळवण्यासाठी पीक व्यवस्थापन ही चांगली करणे गरजेचे असते.

पीक व्यवस्थापनात उभ्या पिकातील मशागतीला म्हणजेच आंतरमशागतीला अनन्य साधारण असे महत्त्व असते, कारण व्यवस्थापनाच्या या महत्त्वाच्या घटकाकडे दुर्लक्ष झाले तर उत्पादनात कमानीची घट येते.
शेतकरी बांधवानो मोबाईल वर मेसेज चेक करा, नमोचा सहावा हफ्ता आला!
Unhali Bhuimung 2025 “उन्हाळी भुईमुगामध्ये करावयाची आंतरमशागतीची कामे”
भुईमुगातील आंतरमशागतीमध्ये पिकाच्या उगवणीनंतर ज्या ठिकाणी नांगे पडले असतील तेथे बियाणे पेरून हेक्टरी रोपांची संख्या योग्य ठेवणे व ज्या ठिकाणी रोपांची दाटी झाली असेल तेथे विरळणी करणे गरजेचे असते.

भुईमूग पिकात व त्यामध्ये वाढणाऱ्या तणांमध्ये साधारणपणे पेरणीनंतरची 30 ते 35 दिवस तीव्र स्पर्धा असते. तणांचा नायनाट करण्यासाठी 2 कोळपण्या 10 दिवसाच्या अंतराने कराव्यात. त्यासाठी पिक 20 ते 25 दिवसाचे असताना पहिली व 30 ते 35 दिवसाचे होताच दुसरी कोळपणी करावी.
Unhali Bhuimung 2025 दुसरी कोळपणी खोल करावी आणि शक्य झाल्यास याच काळात करता आल्यास तिसरी कोळपणी करावी. पहिल्या कोळपणीनंतर खुरपणी करून पिकाच्या दोन ओळीतील तणे नष्ट करावीत.
पेरणीनंतर 35 दिवसांनी भुईमुगाच्या आऱ्या जमिनीत शिरू लागल्या म्हणजे कोळपणी किंवा खुरपणी करू नये. मात्र पीक 40 तसेच 50 दिवसाचे झाल्यावर 2 वेळा पिकावर 200 लिटर क्षमतेचा मोकळा ड्रम फिरवावा.
पिकावर रिकामा ड्रम फिरवल्यामुळे जमिनीच्या पृष्ठभागातून निघालेल्या आऱ्या जमिनीत न शिरता जमिनीच्या पृष्ठभागावर लोंबकळत राहून त्याच शेंगा लागत नाहीत. ड्रम फिरवताना जमिनीत ओलावा असणे मात्र गरजेचे असते.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |