रेन वॉटर हार्वेस्टिंग म्हणजे काय? आणि त्याच्या पद्धती कोणत्या? वाचा सविस्तर; Rain Water Harvesting 2025

Rain Water Harvesting 2025 भारतात दरवर्षी सरासरी 100 इंच पाऊस पडतो. यावर्षी पाऊस चांगला झाला असताना सुद्धा मार्च महिन्यामध्येच काही भागांमध्ये पाण्याची टंचाई जाणवू लागली आहे.

Rain Water Harvesting 2025

आत्ताच तापमान खूप वाढले आहे. त्यामुळे धरणातील साठा मे महिन्यापर्यंत खूप कमी होईल असा अंदाज आहे. धरणातील साठा हा शहरी भागातील पिण्याच्या पाण्यासाठी, घरगुती वापरासाठी व भागातील कारखान्यांसाठी तर ग्रामीण भागामध्ये मोठ्या प्रमाणावर शेतीसाठी केला जातो.

शेतकरी बांधवानो मोबाईल वर मेसेज चेक करा, नमोचा सहावा हफ्ता आला!

शहरीकरण जास्त होत चालले असल्यामुळे शहरांची पाण्याची गरज वाढली आहे त्यामुळे धरणामधून शेतीसाठी पाण्याची उपलब्धता करणे अवघड होत चालले आहे

WhatsApp Group Join Now

Rain Water Harvesting 2025 वारंवार पडणारा दुष्काळ, पाणीटंचाई, चारा टंचाई या सर्व गोष्टींचा विचार करता पाणी काटकसरीने वापरणे, पाण्याचा पुनर्वापर करणे, पडलेल्या पावसाचे पाणी व्यवस्थित साठविणे या गोष्टी महत्त्वाच्या ठरतात.

पडलेल्या पावसाचे पाणी वाहून जाऊ न देता ते व्यवस्थित गोळा करणे व साठवणे यालाच वर्षा जलसंचयन म्हणजे म्हणजेच रेन वॉटर हार्वेस्टिंग असे म्हणतात.

Rain Water Harvesting 2025…रेन वॉटर हार्वेस्टिंग पद्धती

छतावर पडणारे पावसाचे पाणी जलसंचयन

यामध्ये इमारतीच्या अगर घराच्या छतावर पडणारे पाणी गोळा केले जाते व खाली दिलेल्या घटकांचा वापर करून पाण्याची साठवणूक केली जाते. रेन वॉटर हार्वेस्टिंग करण्यासाठी आपल्याला प्रमुख काही घटकांची आवश्यकता असते.

कॅचमेंट (पाणलोट) : पाणी गोळा करणे व साठविणे.

कन्वेअन्स सिस्टिम (वाहतूक प्रणाली) : गोळा केलेले पाणी दुसरा ठिकाणी रिचार्ज झोन पर्यंत वाहून नेणे.

WhatsApp Group Join Now

फ्लॅश (पाण्याचा झोत) : सुरुवातीचे वाहून आलेले पाणी बाहेर काढणे.

फिल्टर : गोळा केलेली पाणी गाळून त्यातील घाण काढणे.

टाकी व रिचार्ज स्ट्रक्चर : गाळून ठेवलेले पाणी पुढे वापरण्यासाठी सज्ज ठेवणे.

Rain Water Harvesting 2025 रेन हार्वेस्टिंगचे फायदे!

  • वर्षा जलसंचयन पावसाचे पाणी गोळा करणे व साठवणे, याचबरोबर भूजल व महानगरपालिकेचा पाणीपुरवठा या दोन्हीची मागणी कमी करते.
  • रेन हार्वेस्टिंग केलेले पाणी जे पिण्यायोग्य नाही ते टॉयलेटची साफसफाई, कार धुणे, झाडांना पाणी देणे यासाठी वापरता येते यामुळे पाणी वापराचे बिल कमी येते.
  • पाण्याचा प्रवाह जमिनीचे धूप, पूर व शहरी भागातील प्रदूषण यावर नियंत्रण.
  • रेन वॉटर हार्वेस्ट केलेल्या पाण्यामध्ये दूषित पदार्थांचे प्रमाण नसते त्यामुळे पाण्याचा दर्जा सुधारतो.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment