नोकरी निमित्ताने गेलेल्या शिक्षकाने मोसंबी आणली पश्चिम महाराष्ट्रात, कमी खर्चात चांगले उत्पादन; Farmer Success Story 2025

Farmer Success Story 2025 दरीबडची : जत तालुक्यातील दुष्काळी भागातील तरुण शेतकरी पारंपारिक शेतीला फाटा देत नवनवे प्रयोग करत आहेत. वळसंग (ता.जत) येथील शेतकरी सुभाष मासाळ यांनी फोंड्या माळरानावर कमी पाण्यात, कमी खर्चात मोसंबीची फळबाग फुलविली आहे.

 Farmer Success Story 2025

मोसंबीचा अनोखा प्रयोग यशस्वी करून दाखवला आहे. एकरी आठ टन मोसंबीचे उत्पादन घेतले असून, यातून दोन लाख वीस हजार रुपयांचे उत्पन्न मिळाले.

जिवंत सात-बारा मोहीम राज्यभर; महसूलमंत्री बावनकुळे यांची मोठी घोषणा!

जत तालुक्यात सततचा दुष्काळ व पाणी टंचाईमुळे पारंपरिक शेती केली जाते. सुभाष मासाळ हे संभाजीनगर जिल्ह्यातील पैठण तालुक्यात जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत शिक्षक होते.

WhatsApp Group Join Now

पैठण तालुका मोसंबीचे आगार म्हणून ओळखला जातो. तेथील मोसंबी बागेचा त्यांनी अभ्यास केला. बागेचा देखभाल खर्च, फवारणी खर्च देखील कमी आहे. कमी पाण्यावर घेतले जाणारे फळपीक म्हणून मोसंबीची ओळख आहे.

Farmer Success Story 2025 वर्षातून मृग, आंबा, हस्त असे तीन बहर घेता येतात. चौथ्या वर्षी बागेचे उत्पादन सुरू होते. मोसंबी रोगप्रतिकारशक्ती जास्त असते. बागेला उष्ण हवामान पोषक आहे. निचरा होणारी जमीन लागते. फळगळती होत नाही. झाडाला डिंककीड, पानावरील अळीचा प्रादुर्भाव होतो.

कीटकनाशकाची फवारणी केली जाते. कमी किमतीची औषधे लागतात. जमीन, हवामाणी यांचा विचार करून तेथील शेतकऱ्यांशी चर्चा करून मोसंबी बाग लावण्याचा निर्णय घेतला.

घरासमोरील डाळिंबाची बाग रोगाने वाया गेली होती. तालुक्यात बदली झाल्यावर 2016 मध्ये खडकाळ माळरानावर एक एकरवर न्यूसेलर वाणाच्या मोसंबीची लागवड केली. मोसंबीची रोपे संभाजीनगर येथील नर्सरीतून पन्नास रुपयांप्रमाणे आणली.

एकरात 16 बाय 14 फुटावर 215 रोपांची लागवड केली. लागवडीसाठी 40,000 रुपये प्राथमिक खर्च केला. बागेत भुईमूग, हरभरा, उडीद आदी आंतरपीके तीन वर्षे घेतली.

झाडांना शेणखत घातले. तीन वर्षातच भाग बहरली. योग्य नियोजनाने झाडांची जोमाने वाढ झाली. 60% झाडांना फळधारणा झाली. त्यातून पाच टन उत्पादन मिळाले.

WhatsApp Group Join Now

त्यामुळे उत्पादन जादा मिळणे शक्य झाले. यासाठी मजुरी व इतर खर्च मिळून फक्त चार हजार रुपये आला. दीड लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले.

Farmer Success Story 2025 सेंद्रिय पद्धतीने मोसंबी बागेची लागवड

  • मोसंबी फळबागेला 100 टक्के सेंद्रिय खताचा वापर केला आहे. ठिबक सिंचनद्वारे पाणी दिले जाते.
  • जत तालुक्यात मोसंबी क्षेत्र वाढावे म्हणून शेतकऱ्यांना मार्गदर्शन करत आहे.
  • गावातील चार शेतकऱ्यांनी बागेची लागवड केली आहे. लागवडीसाठी पैठण येथील विजय वाघ, विठ्ठल पांढरे यांचे मार्गदर्शन मिळाले आहे, अशी माहिती सुभाष मासाळ यांनी दिली.

जत कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये मोसंबीचे सौदे सुरू करावेत. शेतकऱ्यांना कमी खर्चात जास्तीत जास्त उत्पन्न देणारे पीक म्हणून मोसंबीचे उत्पादन घ्यावे. व्यावसायिक तत्त्वावर मोसंबी फळबागेतील शेती करावी. – सुभाष मासाळ, शेतकरी वळसंग “

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment