नमो किसानचा हफ्ता जमा झाला की नाही? हे तुमच्या मोबाईलवर कसे चेक कराल? पहा सविस्तर; Namo Kisan Hafta 2025

Namo Kisan Hafta 2025 राज्यातील 93.26 लाख शेतकरी कुटुंबाच्या नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेच्या सहाव्या हफ्त्याचा सुमारे रक्कम रु. 2169 कोटी लाभ आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात दि. 31 मार्च, 2025 पूर्वी जमा करण्यात येत आहे.

Namo Kisan Hafta 2025

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न देण्याकरिता केंद्र शासनाने प्रधानमंत्री किसान सन्मान निधी (पी.एम. किसान) योजना माहे फेब्रुवारी 2019 पासून सुरू केली आहे.

उन्हाळ्यात तापमान नियंत्रणासाठी कसे कराल जनावरांच्या गोठ्याचे नियोजन?

Namo Kisan Hafta 2025 या योजनेच्या निकषानुसार सर्व पात्र शेतकरी कुटुंबास (पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील अपत्ये) 2000 रुपये प्रति हफ्ता याप्रमाणे तीन समान हफ्त्यात प्रति वर्षी 6 हजार रुपये त्यांच्या आधार व डीबीटी संलग्न सक्रिय बँक खात्यात जमा करण्यात येत आहे.

WhatsApp Group Join Now

नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा हप्ता बँकेत जमा झाला का नाही? हे तुम्ही तुमच्या मोबाईलवरही चेक करू शकता.

Namo Kisan Hafta 2025 हफ्त्याचे स्टेटस कसे चेक कराल?

खालील प्रक्रिया तुमचा फोन आडवा (Horizontal) पकडून करा.

  1. खाली दिलेल्या लिंकवर क्लिक करा.
  2. त्यानंतर लाल रंगात Beneficiary Status दिसेल त्यावर क्लिक करा.
  3. त्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड ला जोडलेला मोबाईल नंबर (Enter Moblie Number) या ठिकाणी टाकायचा आहे.
  4. नंतर खाली दिलेला इंग्रजी अक्षरे कॅपच्या कोड खाली टाकायचा आहे.
  5. त्यानंतर तुमच्या मोबाईलवर सहा अंकी ओटीपी येईल तो खाली टाकायचा आहे.
  6. त्यानंतर Get Data गेट डाटावर क्लिक करा.
  7. त्यानंतर तुम्हाला तुमच्या सर्व हफ्त्यांची माहिती दिसेल. कोणता हफ्ता किती तारखेला कोणत्या बँकेत जमा झाला त्यात तुम्हाला आताचा हफ्ता जमा झाला की नाही हे पण दिसेल.

स्टेटस चेक करण्याची लिंकयेथे क्लिक करा
इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment