राज्यात अवकाळीचे पुन्हा संकट.. वाचा IMD रिपोर्ट सविस्तर; Maharashtra IMD Report 2025

Maharashtra IMD Report 2025 राज्यात अवकाळी संकट निवळणार असे वाटत असतानाच परत एकदा हवामान विभागाने अवकाळी पावसाचा अंदाज वर्तविला आहे. गेल्या काही दिवसांपासून हवामानात सातत्याने बदल होताना दिसतोय.

Maharashtra IMD Report 2025

राज्यात हवामानात सातत्याने बदल होत असून, काही ठिकाणी अवकाळी पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विदर्भातील काही जिल्ह्यात तापमानाचा पारा 41 अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. तर कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात वादळी वाऱ्यासह पाऊस पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

दुष्काळी पारंपारिक पिकांना फाटा देत मसाला शेतीतून विदर्भातील शेतकऱ्याने घडवली क्रांती; 

कधी पाऊस तर कधी कडाक्याचे ऊन आहे. राज्यात सध्या अवकाळीचे ढग पहायला मिळत आहेत. काही ठिकाणी जोरदार अवकाळी पाऊस पडतोय. तर कुठे उष्णतेचा पारा वाढतोय.

WhatsApp Group Join Now

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, पुढील चार दिवस अवकाळी पावसाचा इशारा काही भागांमध्ये देण्यात आला आहे. मात्र, विदर्भात सातत्याने उष्णतेत वाढ होताना दिसत आहे. विदर्भातील काही शहरांमध्ये तापमान हे 41 अंश सेल्सिअस च्या पुढे गेल्याचे पाहायला मिळत आहे. पश्चिम महाराष्ट्रात सांगलीमध्ये अवकाळी पावसाने हजेरी लावली आहे.

मध्य महाराष्ट्र पासून केरळ पर्यंत कमी हवामानाचा पट्टा निर्माण झाला. त्यामुळे पावसाला पोषक वातावरण निर्माण झाले आहे. अनेक ठिकाणी ढगाळ वातावरणामुळे उष्णतेत मोठी वाढ झाली आहे. नागपूर, चंद्रपूर, अकोला, अमरावती, वर्धा या जिल्ह्यांमध्ये तापमान हे 41 अंशापर्यंत पोहोचले होते. यवतमाळ, परभणी, भंडारा, गडचिरोली, वाशिम या ठिकाणी तापमान 40 अंशावर पोहोचले. यामुळे नागरिकांनी घराबाहेर पडताना काळजी घेणे आवश्यक आहे.

Maharashtra IMD Report 2025 कोल्हापूर, सांगली आणि साताऱ्यात हवामान खात्याकडून वादळी वाऱ्यासह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. यासोबतच नांदेड, लातूर, सोलापूर, सातारा, रत्नागिरी या भागांमध्ये ही पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मात्र, पुण्यात तापमान वाढताना दिसत आहे.

मुंबई शहर आणि उपनगरात आकाश मुख्यतः निरभ्र राहील. कमाल आणि किमान तापमान अनुक्रमे 33 अंश सेल्सिअस आणि 21 अंश सेल्सियस च्या जवळपास असेल, असेही हवामान विभागाने कळविले आहे.

Maharashtra IMD Report 2025 शेतकऱ्यांना सल्ला

  • येत्या पाच दिवस तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज लक्षात घेता काढणी व मळणी केलेल्या मालाची सुरक्षित ठिकाणी साठवणूक करावी.
  • कापूस पिकाच्या पऱ्हाट्या काढून त्याची योग्य विल्हेवाट लावावी जेणेकरून गुलाबी बोडं अळीच्या जीवन क्रमात घट पडेल, असा सल्ला देण्यात आला आहे.

WhatsApp Group Join Now
इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment