Adharbhut Kimat Kharedi 2025 खरीप पणन हंगाम २०२४-२५ मधील किमान आधारभूत किंमत खरेदी म्हणजेच हमीभाव योजनेअंतर्गत नोंदणीकृत शेतकऱ्यांना राज्य सरकारकडून प्रती हेक्टरी 20 हजार रुपये अनुदान दोन हेक्टरच्या मर्यादेत देण्यात येणार आहे. त्यामुळे धान उत्पादकांना काहीसा दिलासा मिळण्याची शक्यता आहे.

यामध्ये नोंदणीकृत शेतकऱ्यांनी धानाची विक्री केलेली असो वा नसो धान लागवडी खालील जमीन धारणेनुसार प्रति हेक्टरी 20 हजार रुपये प्रोत्साहन अनुदान देण्यात येणार आहे.
अवेळी पावसामुळे झालेल्या पिकांच्या नुकसान भरपाईसाठी 4 कोटी रुपये वितरणास शासनाची मंजुरी,
Adharbhut Kimat Kharedi 2025 त्यासाठी राज्य सरकारने 1 हजार 800 कोटी रुपयांच्या खर्चास मान्यता दिली आहे. या संदर्भातील शासन निर्णय राज्य सरकारने बुधवारी (ता.26) प्रसिद्ध केला.

Adharbhut Kimat Kharedi 2025 परंतु यामध्ये अटी शर्तीचा खोडा घालण्यात आल्याने बहुतांश धान उत्पादक शेतकरी अनुदानापासून वंचित राहण्याची शक्यता आहे. यामध्ये अनुदानासाठी हमीभाव खरेदी योजनेअंतर्गत नोंदणी झालेल्या शेतकऱ्यांपैकी धान लागवडीच्या क्षेत्राची ई-पीक पाहणी, ई-भूमी, महानोंदणी पोर्टल वरील पाहणीची खातरजमा करण्यात येणार आहे.
या पोर्टल नोंदणी असेल तरच शेतकरी अनुदानास पात्र ठरणार आहेत. वास्तविक राज्यात ई-पीक पाहणी ॲपमध्ये अद्यापही शेतकऱ्यांना अडचणी येतात. सर्व्हर आणि नेटवर्कच्या समस्या शेतकऱ्यांसमोर निर्माण होतात. त्यामुळे विविध जिल्ह्यातील शेतकऱ्यांची ई-पीक पाहणी पूर्ण होत नाही, असं शेतकरी सांगतात.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |