Adharlink Seeding 2025 जालना : शासनाने विविध योजनांचा लाभार्थ्यांना लाभ व्हावा, या उद्देशाने थेट बँक खात्यात पैसे जमा केले जातात. त्यासाठी बँक खाते आधार कार्डशी संलग्न असणे आवश्यक आहे.

निराधार लाभार्थ्यांसाठी सरकारी योजना राबवत आहे. योजनेच्या लाभार्थ्यांना बँक खात्यात थेट लाभ मिळण्यासाठी प्रत्येक लाभार्थ्यांचा बँक तपशील व आधार केवायसी करण्याची मोहीम सुरू करण्यात आली आहे; परंतु जालना जिल्ह्यात योजनेचे 1 लाख 30 हजार 205 लाभार्थी आहेत.
रिकटनंतर ‘द्राक्ष बागेतील व्यवस्थापन’ या गोष्टी लक्षात ठेवा, वाचा सविस्तर;
योजनेतील 27 हजार 312 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणीकरण केलेले नाही. यामुळे लाभार्थ्यांना सरकारचे आधार नको असल्याचे दिसून येत आहे. योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटीद्वारे (DBT) करण्यात येत आहे. नियमित अनुदान मिळविण्यासाठी निराधारांचे आधार अपडेट व बँक खाते आधार संलग्न असणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.

संजय गांधी निराधार व श्रावणबाळ योजना या योजनेतील लाभार्थ्यांना अर्थसाहाय्याचे वितरण डीबीटी द्वारे करण्यात येत आहे. योजनेचा लाभ घेण्यासाठी लाभार्थ्यांनी आधार लिंक करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
Adharlink Seeding 2025 ‘आधार लिंक नाही’
- जिल्ह्यात निराधार योजनेचे 1 लाख 30 हजार 205 लाभार्थी आहेत
- यापैकी 27 हजार 312 लाभार्थ्यांनी आधार प्रमाणी करणाकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे, तर 67 हजार 174 लाभार्थ्यांनी प्रक्रिया पूर्ण केली.
’88’ लाभार्थ्यांनी केवायसी पूर्ण…
जालना जिल्ह्यातील निराधार योजनेच्या एकूण लाभार्थ्यांपैकी 88 टक्के लाभार्थ्यांनी केवायसीची प्रक्रिया पूर्ण केली आहे.
Adharlink Seeding 2025 लाभार्थ्यांना आवाहन !
- निराधार योजनेचे अनुदान 1 आता ‘डीबीटी’ मार्फत सरळ लाभार्थ्यांच्या खात्यात देण्यात आले आहे.
- योजनेतील लाभार्थ्यांनी आधार कार्ड व मोबाईल क्रमांक गावातील तलाठ्याकडे किंवा प्रत्यक्ष तहसील कार्यालयात उपलब्ध करून द्यावे, असे आवाहन केले आहे.
Adharlink Seeding 2025 ‘हे’ नक्की करा….
- खाली दिलेली वेबसाईट ओपन करा.
- लॉगिन वर क्लिक करा.
- आपला आधार क्रमांक टाका.
- कॅपच्या कोड प्रविष्ट करा व पुढे चला आपल्याला ओटीपी (OTP) येईल तो टाका व पुढे चला (सदर OTP (ओटीपी) हा ज्या मोबाईलला आपला आधार लिंक असेल त्याच मोबाईलवर येईल).
- आपल्या आधारचे पेज ओपन होईल त्यात बँक Seeding (सीडींग) स्टेटस वर क्लिक करा.
- आपले आधार कोणत्या बँकेत कोणत्या खात्याला जोडलेला आहे त्याचे डिटेल्स व स्टेटस आपल्याला समजेल.
- आपल्या आधार मधील पत्ता जर चुकीचा असेल तर तोही आपण 14 सप्टेंबर 2024 पर्यंत आपण स्वतःच विना खर्च अपडेट्स करू शकता.
- आधार सीडींग आर्थिक व्यवहार सुलभ करते, कागदपत्रे कमी करते आणि सुरक्षितता वाढवते.
- डीबीटी आणि त्रास मुक्त बँकिंगचा लाभ घेण्यासाठी तुमचा आधार तुमच्या बँक खात्याशी जोडलेला असल्याची खात्री करा.
- डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर (DBT) ही भारत सरकार द्वारे चालवली जाणारी एक प्रणाली आहे, ज्याद्वारे सरकारी योजनांद्वारे मिळालेल्या पैशाचा लाभ थेट लाभार्थ्यांच्या खात्यावर जमा होतात.
तालुका | लाभार्थी | जमा | बाकी |
जालना | 19687 | 13092 | 3911 |
बदनापूर | 12228 | 9221 | 5834 |
भोकरदन | 18839 | 9371 | 8943 |
जाफराबाद | 15809 | 9023 | 6307 |
परतुर | 5092 | 3086 | 940 |
मंठा | 4067 | 1986 | 1868 |
अंबड | 19330 | 7389 | 9596 |
घनसावंगी | 18626 | 9212 | 5834 |
वेबसाईट आधार लिंक | येथे क्लिक करा |
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |