उन्हाळ्यात फळबागा जिवंत ठेवण्यासाठी करा हे सोपे पाच उपाय, वाचा सविस्तर; Falbag Niyojan 2025

Falbag Niyojan 2025 यावर्षी पश्चिम महाराष्ट्र विदर्भ मराठवाड्यात दिवसागणिक उन्हाळ्यातील तापमान वाढत आहे शेतकऱ्यांनी उपलब्ध पावसाचे योग्य व्यवस्थापन करून उन्हाळ्यात आपल्या फळबागा जिवंत ठेवणे गरजेचे आहे. पाण्याचे व्यवस्थापन करण्यासाठी खाली दिलेल्या पद्धतीचा वापर करून उन्हाळ्यात फळबागा वाचवू शकता…

Falbag Niyojan 2025

WhatsApp Group Join Now

1. Falbag Niyojan 2025 आच्छादनाचा वापर

जमिनीतून होणाऱ्या पाण्याच्या बाष्पीभवनाचा वेग जमिनीवर आच्छादन करून कमी करता येतो. ही सर्वात सोपी पद्धत आहे. यासाठी फळ बागेतील प्रत्येक झाडाजवळ सेंद्रिय पद्धतीने 5 ते 6 सें.मी. जाडीचे उसाचे पाचट, पालापाचोळा, वाळलेले गवत, काडीकचऱ्याचे थर द्यावेत.

अतिवृष्टी नुकसान भरपाई आली! पण हे काम न केल्यास शेतकरी अनुदानापासून राहणार वंचित;

यामुळे जमिनीत ओलावा टिकून राहण्यास तसेच जमिनीत सेंद्रिय पदार्थांचा पुरवठा होऊन खताच्या खर्चात बचत होते. विशेषतः पाण्याचे बाष्पीभवन रोखले जाते. जमिनीतील ओलावा टिकून राहतो. याशिवाय आच्छादनामुळे मृद संधारण जमिनीचे तापमान संतुलित राखणे क्षारांचे प्रमाण कमी करणे, तणांचा बंदोबस्त करणे व मितिची संरचना सुधारणे इत्यादी प्रकारचे विशेष परिणाम दिसून येतात.

WhatsApp Group Join Now

2. हलकी छाटणी करणे

झाडाच्या पानातील पाण्याचे उत्सर्जन कमी करण्यासाठी झाडावरील पानांची संख्या कमी असणे गरजेचे असते. त्यासाठी फळ झाडाची हलकी छाटणी करावी.

3. Falbag Niyojan 2025 बाष्परोधकांचा वापर

पद्धतीमध्ये पानाचे पर्णरंध्रे बंद करणारे बाष्परोधक किंवा सूर्य किरणे परावर्तित करणारे बाष्परोधक शेतकऱ्यांनी फळ पिकांमध्ये पर्णोत्सर्जन कमी करण्यासाठी वापरावे. त्यासाठी केओलीन पर्णरंध्रे बंद करणारे बाष्परोधकांचे सहाशे ते आठशे ग्रॅम 10 लिटर पाण्यात द्रावण तयार करून 15 दिवसाच्या अंतराने दोन वेळा फवारणी करावी.

4. वारारोधकाची उभारणी

वाऱ्यामुळे जमिनीतील बाष्पीभवन आणि झाडाच्या पानातील पाण्याचे उत्सर्जन जास्त होत असते. त्यामुळे बागेच्या पश्चिम व दक्षिण दिशांना वारारोधक झाडांची लागवड करावी. उदा. शेवगा, सुरू, जांभूळ, करवंद इत्यादी झाडे लावावीत.

5. Falbag Niyojan 2025 मडका सिंचन

पाण्याचे फारच दुर्भिक्ष असलेल्या ठिकाणी या पद्धतीचा उपयोग आपल्या भागात जिवंत ठेवण्यासाठी करावा. झाडाच्या वयानुसार मडकी वापरावीत. लहान फळ झाडांच्या व कमी वयाच्या झाडांसाठी 5 लिटर क्षमतेची तर जास्त वय व मोठ्या झाडांसाठी 15 लिटर क्षमतेची मडकी वापरावीत.

भर दुपारी झाडाखाली पडणाऱ्या सावली वरून झाडाचे सावली क्षेत्र निश्चित करून दोन ते चार मडकी प्रति झाड ठेवावे. दर पंधरा दिवसाला मडक्यांची जागा बदलावी. निवडलेल्या मडक्याच्या तळाशी लहान छिद्र पाडून त्यात कापडाची चिंधी बसून सावली क्षेत्राच्या परिघावर ठेवावे व पाणी भरून झाकण ठेवावे.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment