मराठवाड्यात येत्या 24 तासात अवकाळी पावसाचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे.

त्यामुळे शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी .

प्रादेशिक हवामान केंद्र, मुंबई येथून प्राप्त झालेल्या अंदाजानुसार मराठवाड्यात 20 मार्च रोजी छत्रपती संभाजी नगर, जालना, परभणी व हिंगोली जिल्ह्यात तुरळक ठिकाणी वादळी वाऱ्यासह हलक्या स्वरूपाच्या पावसाची तर 21 मार्च रोजी परभणी, हिंगोली व नांदेड जिल्ह्यात तुरळक ठिकाणी हलक्या स्वरूपाच्या पावसाची शक्‍यता आहे.

नवीन लागवड व पुर्नलागवड केलेल्या रोपांना आवश्यकतेनुसार पाणी व्यवस्थापन करावे.

मराठवाड्यात येत्या 24 तासात कमाल तापमानात फारशी तफावत जाणवणार नाही व त्यानंतर हळूहळू घट होण्याची शक्यता आहे तर पुढील दोन दिवसात किमान तापमानात हळूहळू वाढ होऊन त्यानंतर फारशी तफावत जाणवणार नाही.

विस्तारित अंदाजानुसार (ईआरएफएस) मराठवाड्यात दिनांक 20 ते 26 मार्च दरम्यान कमाल तापमान सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरी एवढे ते सरासरीपेक्षा किंचित जास्त राहण्याची शक्यता आहे.

भाजीपाला पिकात खुरपणी करून भाजपाला पीक तण विरहित ठेवावे. काढणीस तयार असलेल्या भाजीपाला पिकाची काढणी करून घ्यावी.

 फुल पिकात खुरपणी करून फुल पिक तण विरहित ठेवावेत व आवश्यकतेनुसार पाटाने पाणी द्यावे.

काढणीस तयार असलेल्या फुलांची काढणी करून बाजारपेठेत पाठवावी.

शेतकऱ्यांनी पिकांचे नियोजन करताना काय काळजी घ्यावी, याविषयीचे कृषी सल्ला वसंतराव नाईक मराठवाडा कृषी विद्यापीठाने जारी केला आहे.