Draksh Bag Management 2025 नवीन द्राक्ष बागेत रिकट घेण्यापूर्वीची तयारी बाबतची माहिती घेतली. यानंतर द्राक्ष बागेची वाढ होण्यास मदत होते. त्यामुळे रिकटचा काळ अतिशय महत्त्वाचा मानला जातो. दरम्यान रिकट केल्यानंतर या बागेतील व्यवस्थापन कसे करावे, हे या लेखातून समजून घेऊया…

WhatsApp Group
Join Now
Draksh Bag Management 2025! रिकट बागेतील व्यवस्थापन
- नुकताच रिकट झालेल्या बागेत वाढत्या तापमानात डोळे लवकर फुटायला सुरुवात होईल.
- यापूर्वी रिकट घेतल्यानंतर चार ते पाच डोळ्यांना पेस्टिंग केले असेल.
आनंदाची बातमी ! ऊस उत्पादक शेतकऱ्यांसाठी एफआरपी देण्यासंदर्भात उच्च न्यायालयाचा हा मोठा निर्णय; वाचा सविस्तर…
- आता सर्वच फुटी निघालेल्या असतील. यावेळी आपल्याला फक्त दोन फुटांची गरज आहे.
- सात ते आठ पानांच्या अवस्थेत निघालेल्या फुटींपैकी वरच्या फुटींला चार पानांवर शेंडा मारून घ्यावा.
- खालील फूट सुतळीने बांधून घ्यावी.
- शेंड्याचे प्रभुत्व (अपायकल डॉमिनन्स) या द्राक्ष जातीमध्ये जास्त असल्यामुळे पहिली फूट जोरात चालत असल्यास दुसरे फूट हळूहळू वाढेल.

- वरील फुटी मध्ये रिकट घेतल्यानंतर शेंड्याकडील काडीवर रोगाचा प्रादुर्भाव होण्याची शक्यता असते.
- त्यामुळे पहिल्या फुटीवर शेंडा पिंचिंग करून खालील फूट खोड तयार करण्याकरिता बांबूला सुतळीने बांधून घ्यावी.
- वरच्या फुटीचा शेंडा मारल्यामुळे दुसरी फुट जोरात चालेल.
- खोड तयार करण्याकरिता या फुटीची वाढ लवकर होणे व जाडी मिळणे गरजेचे असते.
- यासाठी अन्नद्रव्य व्यवस्थापन जास्त महत्त्वाचे आहे.
- खोड तयार झाल्यानंतर अन्नद्रव्यांचा साठा व्यवस्थित व्हावा, यासाठी नत्र आणि स्फुरदयुक्त खतांचा वापर केला जातो.
- यामध्ये 12-61-0, युरिया किंवा अमोनिअम सल्फेटचा वापर करता येईल, दोन पेऱ्यातील अंतर वाढण्याकरिता फक्त नत्राचा वापर करून चालणार नाही, तर पाणी व्यवस्थापनही तितकेच महत्त्वाचे आहे.
- नुकतेच तयार केलेले बोद वाफसा स्थितीत असते असतील.
- तसेच मुळांच्या कक्षेत पुरेसे पाणी असल्यास अन्नद्रव्यांचा पुरवठा शक्य होईल.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |