
शेतकऱ्यांच्या आर्थिक उत्पन्न वाढवण्यासाठी सरकारकडून विविध योजना राबवल्या जातात. या लेखामध्ये आपण रोपवाटिका अनुदान योजनेविषयी Ropvatika anudan yojana 2025 संपूर्ण माहिती पाहणार आहोत. यामध्ये योजनेसाठी अर्ज कोठे व कसा करायचा ,आवश्यक पात्रता, कागदपत्रे कोणती, अनुदान किती, निवड प्रक्रिया अशा सर्व प्रश्नांची उत्तरे पाहणार आहोत.
महाराष्ट्र हे भाजीपाला फॉलोत्पादनाच्या क्षेत्रात आघाडीवर असलेले राज्य आहे. महाराष्ट्र राज्यात मोठ्या प्रमाणात फळे आणि पालेभाज्यांचे उत्पादन घेतले जाते. याची निर्यात ही मोठ्या प्रमाणावर होते. कीडमुक्त (बिनाविषारी) व निर्यातक्षम भाजीपाला पिकांच्या उत्पादनाकडे गेल्या काही वर्षांपासून शेतकरी वळवली आहेत. Ropvatika anudan yojana 2025
सेंद्रिय भाजीपाला व फळांची मागणी वाढत आहे. नियंत्रित वातावरणामध्ये उत्पादित होणाऱ्या कीड व रोगमुक्त भाजीपाल्याचे उत्पादन क्षेत्र शेतकरी मोठ्या प्रमाणात घेत आहेत. दर्जेदार, रोग व क्रीडा मुक्त रोपांची वाढती मागणी यामुळे राज्यातील प्रत्येक तालुक्यातील रोपवाटिका मोठ्या प्रमाणात उभारण्यास वाव आहे.
भाजीपाला क्षेत्रासाठी अशी कोणतीही मोठी योजना, राज्यस्तरावर आत्तापर्यंत कार्यान्वित केली गेली नव्हती. त्यामुळे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर रोपवाटिका योजना सध्याच्या सरकारने, राष्ट्रीय कृषी विकास योजनेअंतर्गत महाराष्ट्रात सुरू केली आहे. 9 सप्टेंबर 2020 या योजनेला शासन निर्णयाद्वारे प्रशासकीय मान्यता देण्यात आलेली आहे.Ropvatika anudan yojana 2025
रोपवाटिका योजनेचा उद्देश
- राज्यातील सर्व तालुक्यांमध्ये रोपवाटिकांची निर्मिती व्हावी.
- भाजीपाला पिकांची दर्जेदार व कीड रोगमुक्त रोपे तयार करणे.
- भाजीपाला उत्पादनाला प्रोत्साहन देऊन शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवणे.
- रोपवाटिकेमुळे स्थानिक शेतकऱ्यांना शेतीपूरक व्यवसाय उपलब्ध करून देणे.
- भाजीपाला पिकामुळे पीक रचनेत बदल घडवून आणणे.Ropvatika anudan yojana 2025
रोपवाटिकेची उभारणी Ropvatika anudan yojana 2025
तालुका कृषी अधिकारी यांचे कडून पूर्वसंमती मिळाल्यानंतर रोपवाटिकेची उभारणी करावी. पूर्वसंमती मिळाल्यापासून 15 दिवसाच्या आत काम सुरू करून 3 महिन्याच्या कालावधीत काम पूर्ण करणे आवश्यक आहे.
प्रकल्प उभारणीनंतर प्रथम टप्प्याचे 60 टक्के अनुदान हे उपविभागीय कृषी उपाधिकारी यांना प्रथम मोका तपासणी केल्यानंतर मिळेल. उर्वरित 40 टक्के अनुदान हे रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री / उचल झाल्यानंतर मंडळ कृषी अधिकारी यांनी द्वितीय मोका तपासणी केल्यानंतर मिळेल. रोपवाटिका धारकास बियाणे जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी यांच्याकडून परवाना घेणे बंधनकारक करण्यात आलेले आहे.Ropvatika anudan yojana 2025
या योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना फलोत्पादन प्रशिक्षण केंद्र, तळेगाव-दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती, नाशिक,जालना, कृषी महाविद्यालय नागपूर आणि उद्यान महाविद्यालय, अकोला येथे तीन ते पाच दिवसांचे प्रशिक्षण घेणे अनिवार्य आहे.
रोपवाटिका अनुदान योजनेसाठी कोण लाभार्थी पात्र आहेत ?
1. अर्जदाराकडे स्वत:च्या मालकीची किमान एक एकर जमीन असणे आवश्यक.
2. रोपवाटिका उभारण्यासाठी पाण्याची कायमची सोय असावी.
3. महिला कृषी पदवीधारक यांना प्रथम प्राधान्य.
4. महिला गट/महिला शेतकरी यांना व्दितीय प्राधान्य.
5. भाजीपाला उत्पादक अल्प व अत्यल्प भूधारक शेतकरी व शेतकरी गट यांना तृतीय प्राधान्य.
योजनेअंतर्गत तांत्रिक प्रशिक्षण : Ropvatika anudan yojana 2025
रोपवाटिका अनुदान योजनेचा लाभ घेऊ इच्छिणाऱ्या लाभार्थ्यांना 3 ते 5 दिवसांचे तांत्रिक प्रशिक्षण हॉर्टीकल्चर ट्रेनिंग सेंटर, तळेगाव दाभाडे, कृषी विज्ञान केंद्र, बारामती व महाराष्ट्र सहकार विकास महामंडळ (MCDC) पुणे येथे घेणे अनिवार्य राहील.
शेतकऱ्यांनो, तुमचं भविष्य सुरक्षित करा फार्मर आयडी कार्ड मिळवा !
अनुदान कशासाठी मिळणार आहे ? Ropvatika anudan yojana 2025
- नवीन रोपवाटिका तयार करण्यासाठी.
2.प्रत्येक तालुक्यात किमान एक रोपवाटिका.
3.रोपवाटिकेमध्ये शेडनेट हाऊस (1000 चौ.मी.), पॉलीटनेल (1000 चौ.मी.), पॉवर नॅपसॅक स्प्रेअर 1, प्लास्टिक क्रेट्स 62 हे चारही घटक आवश्यक आहेत.
4.टोमॅटो, वांगी, कोबी, फुलकोबी, मिरची, कांदा इत्यादी आणि इतर भाजीपाला पिकांची रोपे तयार करता येतील.
Ropvatika anudan yojana 2025 शेतकरी स्वतः भरू शकतात रोपवाटिका योजना फॉर्म…
मित्रांनो शासकीय योजना म्हटले कि अनेकांना वाटते कि csc center, आपले सेवा किंवा ऑनलाईन सर्व्हिसेस असलेल्या केंद्रावरच सदरील योजनेचे फॉर्म्स भरावे लागतात परंतु असे नाही मित्रांनो.
तुम्ही स्वतः देखील या योजनेचा फॉर्म भरू शकता, त्यासाठी फक्त थोडे मार्गदर्शन हवे असते. रोपवाटिका म्हणजेच नर्सरी निर्माण करून तुम्ही अनेक प्रकारची रोपे निर्माण करून त्यामधून पैसे कमावू शकता.
शेती संबधित हा व्यवसाय असल्याकारणाने आपण याला जोड व्यवसाय म्हणू शकतो. शेतकऱ्यांना चांगल्या प्रकारे रोपांचा पुरवठा करून एक प्रकारे त्यांच्यासाठी हि सेवाच ठरू शकते. त्यामुळे रोपवाटिका या व्यवसायामधून पैसा आणि समाधान दोन्ही गोष्टी मिळतात.Ropvatika anudan yojana 2025
रोपवाटिका ऑनलाईन अर्ज प्रक्रिया :
गुगलमध्ये टाईप करा महाडीबीटी किंवा या वेबसाईटवर डायरेक्ट जाण्यासाठी पुढील लिंक वर क्लिक करा. https://mahadbtmahait.gov.in/Farmer/Login/Login त्यानंतर या ठिकाणी महाडीबीटी या वेबसाईटचा इंटरफेस दिसेल.
या तुमच्याकडे युजर आयडी किंवा पासवर्ड असेल तर या ठिकाणी दोन प्रकारे लॉगिन करता येऊ शकते एक पद्धत आहे युजर आयडी आणि पासवर्ड वापरून व दुसरी पद्धत आहे आधार क्रमांक द्वारे.Ropvatika anudan yojana 2025
परंतु जर तुमच्याकडे जर लॉगिन आयडी किंवा पासवर्ड नसेल तर तुम्ही नवीन अर्जदार नोंदणी या बटनावर क्लिक करून तुमची नोंदणी करू शकता व युजर आयडी व पासवर्ड मिळवू शकता.
- लॉगिन करा.
- अर्ज करा या बटणावर क्लिक करा.
- फलोत्पादन या योजनेसमोरील बाबी निवडा या बटणावर क्लिक करा.
- फलोत्पादन योजनेचा फॉर्म ओपन होईल त्यामध्ये रोपवाटिका निवडून संपूर्ण माहिती भरा.
- रोपवाटिका या योजनेची पूर्ण माहिती भरल्यानंतर जाताना करा या हिरव्या रंगाच्या बटणावर क्लिक करा.
- अर्ज सादर करणे या निळ्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- अर्ज सादर करा या हिरव्या रंगाच्या बटनावर क्लिक करा.
- मेक पेमेंट या बटणावर क्लिक करा.
- पेमेंट यशस्वी पूर्ण झाल्यानंतर तुमच्या पेमेंटची पावती प्रिंट करा.
- परत mahadbt dashboard या.
- स्क्रीनवर डाव्या बाजूला वरून खाली चौथ्या क्रमांकावर असलेल्या मी अर्ज केलेल्या बाबी या बटनावर क्लिक करा.
- या ठिकाणी पैसे भरण्याची पावती डाऊनलोड करता येईल शिवाय तुमच्या अर्जाचे सद्यस्थिती बघता येईल.
रोपवाटिका अनुदान योजनेसाठी अर्ज कोठे करावा ?
शेतकऱ्यांनी 2025 या योजनेसाठी महाडीबीटी वेबसाईटवर ऑनलाइन अर्ज करावा किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज देखील स्वीकारतील.
अर्जासोबत कोणती कागदपत्रे जोडावीत-
- बँक खाते पासबुक प्रथम पानाची छायांकीत प्रत
- ७/१२ उतारा , ८-अ प्रमाणपत्र
- स्थळ दर्शक नकाशा , चतु :सीमा
- आधार कार्ड ची छायांकीत प्रत
- संवर्ग प्रमाणपत्र (अनुसूचित जाती / अनुसूचित जमाती शेतकरी यांचेसाठी)
- हमी पत्र
- कृषी पदवी बाबतची कागद पत्रे ,
- शेतकरी गट असल्यास नोंदणी प्रमाणपत्र
अधिक माहिती मिळण्यासाठी पुढील व्हिडिओ पहा : video credit Digital DG
FAQ :
1) रोपवाटिकेसाठी किती अनुदान मिळते ?
रोपवाटिकेसाठी 50% (कमाल रु 2,30,000) अनुदान मिळते.
2) रोपवाटिकेसाठी अर्ज कोठे करावा ?
रोपवाटिका अनुदान घेण्यासाठी महाडीबीटीच्या ऑफिशियल वेबसाईटवरून https://mahadbt.maharashtra.gov.in/ पुण्यश्लोक आहिल्यादेवी रोपवाटिका योजनेच्या अंतर्गत अर्ज करायचा आहे किंवा तालुका कृषी अधिकारी कार्यालयात ऑफलाईन अर्ज सादर करू शकता.
3) रोपवाटिकेसाठी अनुदान कधी मिळते ?
प्रकल्प उभारणीनंतर प्रथम टप्प्याचे 60% अनुदान हे उपविभागीय कृषी अधिकारी यांनी प्रथम मोका तपासणी केल्यानंतर मिळेल तर उर्वरित 40% अनुदान हे रोपवाटिकेतील रोपांची प्रत्यक्ष विक्री उचल झाल्यानंतर मिळेल.Ropvatika anudan yojana 2025