पिकांचे संरक्षण करण्यासाठी उपयुक्त ‘तार कुंपण योजना’ जाणून घ्या सविस्तर माहिती;

शेतात वन्य प्राण्यांचा शिरकाव झाल्यास शेतीचे होणारे नुकसान टाळण्यासाठी शेतकऱ्यांना शेताला कुंपण लावावे लागते.

परंतु कुंपण लावणे हे महागडे असल्याने शेतकरी त्यांच्या शेतातील मालाचे संरक्षण करू शकत नाही. 

अनियमित पाऊस, दुष्काळ सदृश परिस्थिती, पाणीटंचाई आणि वन्य प्राण्यांमुळे होणारे नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान होते.

त्यामुळे शेतकऱ्यांसाठी महाराष्ट्र शासनाच्या वतीने ‘तार कुंपण अनुदान योजना’ सुरू केली आहे.