Vermi Compost Fertilizer 2025 रासायनिक सुपीकता भौतिक व जैविक सुपीकतेमुळे बदलता येते. मात्र भौतिक सुपीकता बदलणे व टिकवणे अत्यंत अवघड गोष्ट आहे. त्यासाठी फार मोठा कालावधी लागतो. म्हणूनच सेंद्रिय खताचा अधिकाधिक वापर शेतीला केला पाहिजे. गांडूळ खत हे आज उपलब्ध असल्यास सेंद्रिय खतांपैकी उत्कृष्ट खत आहे. त्यावर या पुढील काळात भर देण्याची नितांत गरज आहे.

देशाची वाढती लोकसंख्या लक्षात घेता शेतकरी बांधवांना अन्नधान्यांची पूर्तता करण्यासाठी अधिकाधिक पीक घेणे तसेच त्याच जमिनीवर प्रति हेक्टरी उत्पादन वाढवणे अनिवार्य आहे. परंतु असे असेल तरी ज्या पद्धतीने रासायनिक खतांचा बेसुमार वापर वाढला आहे, त्याचा विपरीत परिणाम पर्यावरणावर दिसून येत आहे.
अर्थसंकल्पात मोठी घोषणा; मुख्यमंत्री बळीराजा मोफत वीज योजनेअंतर्गत कृषी पंपांना मोफत वीज
दिवसेंदिवस जमिनीची उपजाऊक शक्ती कमी होत आहे. जमिनीतील सूक्ष्मजीवांची संख्या घटून त्या मृतप्राय झालेल्या आहेत. शेत जमिनीची भौतिक, रासायनिक व जैविक दृष्ट्या अपरिमित हानी होत आहे.
शेतकऱ्यांचा उत्पादन खर्च मोठ्या प्रमाणावर वाढला असून तो कर्जबाजारी होत आहे. वर्षानुवर्षे एकाच जमिनीत एकाच पिकाची लागवड केली जाते. त्यामुळे जमिनीत पाण्याचा वापर वाढला आहे.

दिवसेंदिवसचे शेत जमिनीचे प्रमाण कमी होत असून अन्नधान्याची गरज मात्र वाढतच आहे. ही गरज पूर्ण करण्यासाठी उपलब्ध जमिनीचा अधिकाधिक वापर करावा लागणार आहे. त्यासाठी ही जमीन दीर्घकाळ जिवंत, सुपीक ठेवणे ही आपली नैतिक जबाबदारी आहे.
Vermi Compost Fertilizer 2025 गांडूळ खत म्हणजे काय ?
- गांडूळ हा जमिनीत राहणारा प्राणी आहे. तो जमिनीतील सेंद्रिय पदार्थ खातो. ते खाल्ल्यानंतर त्याच्या शरीराला आवश्यक असा भाग सोडून उर्वरित भाग विष्ठा म्हणून शरीरातून बाहेर टाकतो, त्यालाच गांडूळ खत किंवा वमरिकंपोस्ट असे म्हणतात. या क्रियेला 24 तासांचा कालावधी लागतो.
- गांडूळ जेवढे पदार्थ खातो त्यापैकी स्वतःच्या शरीरासाठी फक्त दहा टक्के भाग ठेवतो व बाकीचा 90 टक्के भाग शरीरातून बाहेर टाकतो. गांडूळ खतात वनस्पतींच्या वाढीसाठी लागणारे अन्नद्रव्य, संप्रेरके, उपयुक्त जिवाणू असून वनस्पतीची रोगप्रतिकारक क्षमता वाढविते.
- गांडूळ खत हे भरपूर अन्नद्रव्य, संप्रेरके असणारे दाणेदार सेंद्रिय खत असून जैविक गुणधर्म वाढविते. गांडूळ खत हा सेंद्रिय शेतातील एक महत्त्वाचा घटक आहे.
- गांडूळास दानवे, वाळे, केचवे, शिदोडे, करडू असे अनेक नावे आहेत. पृथ्वी तळावर हजारो वर्षांपासून गांडूळ अस्तित्वात असून त्यांचे रंग व आकार भिन्न भिन्न प्रकारचे आढळून येतात. गांडूळ जांभळी, लाल, तांबडी, निळे, हिरवी व फिकट तांबूस अशा विविध रंगाची असतात.
- प्राणी शास्त्राच्या वर्गीकरणामुळे गांडूळ अनेलिडा या वर्गात दहा कुळामध्ये जवळजवळ 3200 जातींची गांडूळे असून त्यापैकी सुमारे 300 जातीची गांडूळे भारतात आढळून येतात.
- जमिनीच्या वरच्या थरात वास्तव्य करून राहणाऱ्या आणि सेंद्रिय पदार्थांवर उपजीविका करणारे व जमिनीत खोलीवर राहून जमिनीत मशागत करून मातीवर उपजीविका करणाऱ्या असे दोन गट आहेत.
गांडूळ खत तयार करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी
- गांडूळ खत प्रकल्प सावलीत व दमट हवेतील ठिकाणी असावा.
- शेणखत व शेतातील पिकांचे अवशेष व झाडाचा पाला यांचे 3:1 प्रमाण असावे व गांडूळ सोडण्यापूर्वी हे सर्व दिवस कुजवावे.
- खड्ड्यांच्या तळाशी प्रथमतः 15 ते 20 सें.मी बारीक केलेला वाळलेला पालापाचोळा टाकावा.
- गांडूळाच्या वाफ्यावर गांडुळे सोडण्या अगोदर 1 दिवस पाणी मारावे.
- गांडूळाच्या वाफ्यावर दररोज किंवा वातावरणातील उष्णतेचे प्रमाण पाहून पाणी मारावे.
- व्हम्रीवॉश जमा करण्यासाठी गांडूळ बेडला एक विशिष्ट जाळी दिलेली असावी तेथे खड्डा करून व्हम्रीवॉश जमा करण्याचे नियोजन करावे.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |