Marathwada Weather 2025 वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे. राज्यात मुंबई काेकणपट्ट्यासह विदर्भात अकोला, चंद्रपुरात उष्णतेच्या लाटांची शक्यता वर्तवण्यात आलीय.

मराठवाड्यात पुढील पाच दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. तापमानाचा पारा प्रचंड वाढला असून 36-37 अंश सेल्सियस पर्यंत पारा जात आहे. पुढील तीन ते चार दिवसात कमाल तापमानात हळूहळू 2 ते 3 अं.से. ने वाढ होण्याची शक्यता आहे. त्यानंतर मराठवाडयात दिनांक 14 ते 20 मार्च 2025 दरम्यान पाऊस सरासीपेक्षा जास्त राहून काही ठिकाणी वादळी वाऱ्याची शक्यता आहे, कमाल तापमान सरासरीएवढे ते सरासरीपेक्षा कमी व किमान तापमान सरासरीएवढे राहण्याची शक्यता आहे. दरम्यान, वसंतराव नाईक मराठवाडा कृषि विद्यापीठाने शेतकऱ्यांसाठी कृषी सल्ल्याची शिफारश केली आहे.
Marathwada Weather 2025 पीक व्यवस्थापन कसे कराल ?
काढणीस तयार असलेल्या रब्बी ज्वारी पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी. मळणी केलेला माल उनहात वाळवून साठवणूक करावी. वेळेवर पेरणी केलेल्या व काढणीस तयार असलेल्या गहू पिकाची काढणी व मळणी करून घ्यावी.
सलोखा योजनेचा 1191 नागरिकांना मिळाला लाभ
मळणी केलेला माल उन्हात वाळवून साठवणूक करावी. गव्हाच्या पिकात उंदरांचा प्रादुर्भाव दिसून असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी झिंक फॉस्फाईड 1 भाग + गुळ 1 भाग + 50 भाग गव्हाचा भरडा व थोडसे गोडतेल मिसळून हे मिश्रण उंदराच्या बिळात टाकुन बिळे बंद करावीत.
Marathwada Weather 2025 मका, भुईमुग सांभाळा
कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, मका पिकास आवश्यकतेनूसार पाणी द्यावे.
उशीरा पेरणी केलेल्या मका पिकात लष्करी अळीचा प्रादुर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमामेक्टीन बेन्झोऐट 5 टक्के 4 ग्रॅम किंवा स्पिनेटोरम 11.7 एससी 4 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून वरील किटकनाशकांची आलटून पालटून फवारणी करावी.

फवारणी करत असतांना किटकनाशक पोंग्यात पडेल अशाप्रकारे फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या मका पिकाची काढणी करून घ्यावी.
कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे तसेच पुढील पाच दिवसाच्या कोरडया हवामानाचा अंदाज लक्षात घेता, वेळेवर पेरणी केलेल्या उन्हाळी भुईमूग पिकात आवश्यकतेनूसार तुषार सिंचन पध्दतीने पाणी व्यवस्थापन करावे.
उन्हाळी भुईमूग पिकात रसशोषण करणाऱ्या किडींचा प्रादूर्भाव दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी इमिडाक्लोप्रिड 18.8% 2 मिली किंवा क्विनॉलफॉस 25% 20 मिली यापैकी एका किटकनाशकाची प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
Marathwada Weather 2025 फळबागेचे व्यवस्थापन
कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, केळी बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी केळी फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
नविन लागवड केलेल्या केळीच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. कमाल तापमानात झालेली वाढ, वाढलेल्या बाष्पोत्सर्जनाच्या वेगामूळे, आंबा बागेत आवश्यकतेनूसार पाणी व्यवस्थापन करावे. जमिनीतील ओलावा टिकून राहण्यासाठी व जमिनीचे तापमान संतुलित राहण्यासाठी आंबा फळझाडाच्या आळयात आच्छादन करावे.
नविन लागवड केलेल्या आंब्याच्या रोपांचे उन्हापासून संरक्षण करण्यासाठी रोपांना सावली करावी. आंबा बागेत फळगळ दिसून येत असल्यास याच्या व्यवस्थापनासाठी 00:52:34 एक किलो व जिब्रॅलिक ॲसिड 1 ग्रॅम प्रति 100 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. काढणीस तयार असलेल्या द्राक्ष घडांची काढणी करून घ्यावी.
इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |