फळ पीक विमा मंजूर शेतकऱ्यांसाठी शासनाचा महत्त्वपूर्ण निर्णय,वाचा सविस्तर : Fal Pik Vima 2025

Fal Pik Vima 2025 राज्यातील फळ पिक विमा योजनेचे योजनेच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी दिलासदायक बातमी आहे. राज्य शासनाच्या माध्यमातून मृग बहार 2023-24-25 तसेच आंबिया बहार 2023-24-25 या चारही हंगाम करता राज्य शासनाचा उर्वरित असलेला आणि अग्रीम स्वरूपातील हप्ता पिक विमा कंपन्यांना वितरित करण्यास मंजुरी देण्यात आली आहे.

Fal Pik Vima 2025

WhatsApp Group Join Now

ज्या शेतकऱ्यांचा (Fal Pik Vima 2025)फळ पिक विमा मंजूर आहे. परंतु निधीच्या कारणामुळे वितरित करण्याला विलंब लागला. या शेतकऱ्यांना पिक विमा मिळण्यास मदत होणार आहे. राज्यात 2023-24 या दोन्ही हंगामात शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले. खरीप हंगाम अर्थात मृग बहार दुष्काळी परिस्थिती अनुभवास मिळाली आणि आंबिया बहार या हंगामात काही ठिकाणी गारपिटीमुळे शेतकऱ्यांना नुकसानीला सामोरे जावे लागले.

काही भागांमध्ये फळपीक विमा मंजूर देखील झालेला होता. परंतु पिक विमा कंपन्यांच्या माध्यमातून राज्य शासनाचा निधी वितरित न झाल्याचे कारण सांगून या फळ पिक विम्याचे वितरण केले जात नव्हते. आता याच पार्श्वभूमीवर हा हप्ता वितरित झाल्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे.

काय आहे एक जिल्हा एक उत्पादन योजना, राज्याला कसा फायदा होईल? वाचा सविस्तर…

यामध्ये आंबिया बहर 2024-25 चा अग्रीम स्वरूपाचा 159 कोटीचा तसेच मृग बहार 2024-25 चा 26 कोटी रुपयांचा तर आंबिया बहार 2023-24 चा उर्वरित हप्ता दहा कोटी रुपयांचा तर साधारणपणे मृग बहार 2023-24 या हंगामातील सहा ते सात लाख रुपयांचा उर्वरित निधी देखील प्राप्त झाला आहे.

याबाबतचे महत्त्वाचे निर्णय शासन निर्णय निर्गमित करण्यात आले आहेत. शासनाकडून ही रक्कम पिक विमा कंपन्यांना अनुदान हप्ता म्हणून वितरित करण्यात आले आहे. ज्या शेतकऱ्यांचे (Fal Pik Vima 2025) फळ पीक विमा मंजूर झाले आहेत, पिक विमा सुद्धा शेतकऱ्यांना व्यतिरिक्त करण्यात आलेला नाही. अनेकदा कारण सांगून हप्ता वितरणास विलंब लावल्याचे पाहायला मिळाले. आता, मात्र पिक विमा कंपन्यांना राज्य शासनाकडून निधी मंजूर झाल्यामुळे शेतकऱ्यांना हप्ता वितरित करावा लागणार आहे.

WhatsApp Group Join Now

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment