मार्च महिन्यात कापसाचे बाजारभाव कसे राहतील? Cotton Rate 2025

Cotton Rate 2025 मार्च महिना उजाडला बाजारातील कापसाचे आवक ही कमी झाली. तर सीसीआयने आत्तापर्यंत तब्बल 94 लाख गाठी कापूस खरेदी केला. तरी कापसाचा भाव आजही हमीभावापेक्षा कमी आहे. आंतरराष्ट्रीय बाजारातील मंदी आणि देशातील बाजारात स्थिर उठाव यामुळे कापसाचे भाव दबावत आहेत. मार्च महिन्यातही एक कापसाच्या भावात अपेक्षित सुधारणा होण्याची शक्यता धुसरच असल्याचे अभ्यासकांचे म्हणणे आहे.

Cotton Rate 2025

WhatsApp Group Join Now

देशात यंदा कापसाचे उत्पादन घटले. देशात कापसाचा वापरही चांगला आहे. मात्र, आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचे आणि सुताचे भाव कमी असल्याने याचा देशातील कापूस उद्योगावरही येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात आजही कापसाचे भाव दबावतच आहेत. त्याचा परिणाम देशातील बाजारावर ही येत आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कापूस स्वस्त असल्याने देशात आयात ही सुरू आहे.

आजही आंतरराष्ट्रीय बाजारात कापसाचा भाव दुपारपर्यंत जवळपास तीन टक्क्यांनी तुटला होता जवळपास उजळ 63 सेंट प्रतिपाउंडवर दर पोहोचला होता. दर पडल्याने अमेरिकेतील शेतकरी अडचणीत आले आहेत.

मात्र याचा थेट फटका आपल्या शेतकऱ्यांनाही बसत आहे. मार्च महिन्यातली कापूस बाजारातील अनिश्चितता कायम राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे देशातील बाजारात मार्च महिन्यातही अपेक्षित दरवाढीची शक्यता धुसरच आहे. दरात 100 ते 200 रुपयांपर्यंत चढ उतार दिसू शकतात, असा अंदाज कापूस बाजारातील अभ्यासकांनी व्यक्त केला.

कापसाचे हंगाम सुरू होऊन आता पाच महिने पूर्ण झाले आतापर्यंत देशातील बाजारात 216 लाख गाठी कापसाची आवक झाली आहे यंदा देशातील एक लाख गाठी कापूस उत्पादनाचा अंदाज आहेम्हणजेच देशातील एकूण उत्पादनापैकी तब्बल 72 टक्के कापूस बाजारात शेतकऱ्यांनी विकला. आता केवळ 28 टक्के कापूस बाजारात यायचा बाकी आहे. यंदा देशातील कापूस उत्पादनात मोठी घट झाली तरीही कापसाला अपेक्षित भाव मिळताना दिसत आहे. बाजारातील अवस्थेचा दबाव आता हळूहळू कमी होणार आहे

Cotton Rate 2025 आवक कमी होऊनही दबाव

  • मार्च महिन्यात बाजारातील कापूस आवक कमी होण्यासह दरात काही प्रमाणात सुधारणा पाहायला मिळत असते.
  • मात्र यंदा बाजारातील आहोत कमी होत असतानाही दरावरील दबाव कायम आहे.
  • आजही देशातील बाजारात कापसाला सरासरी 7000 ते 7300 रुपयांचा भाव मिळत आहे.
  • तर बाजारातील आवक सरासरी 90 हजार ते एक लाख गाठींच्या दरम्यान आहे.
  • मार्च महिन्यात आवक आणखी कमी होत जाईल. मात्र, एरव्ही मार्च महिन्यात दिसणारे अपेक्षित सुधारणा यंदा दिसण्याची शक्यता धुसरच आहे.

WhatsApp Group Join Now

राज्यात कांदा बाजार भाव स्थिर…पहा आजचे कांदा बाजार भाव

सीसीआयची खरेदी 94 लाख गाठींवर Cotton Rate 2025

सीसीआयने आत्तापर्यंत जवळपास 94 लाख गाठी कापसाची खरेदी केली. त्यापैकी 28 लाख गाठी कापूस महाराष्ट्रात खरेदी झाला. सीसीआयची खरेदी वाढली तरी उद्योगांकडून कापसाला अपेक्षित उठाव मिळाला नाही. त्यामुळे देशातील एकूण आवके पैकी जवळपास 43 टक्के कापूस सीसीआयला खरेदी करावा लागला. खुल्या बाजारात कापसाचा भाव मागील तीन आठवड्यांमध्ये काहीसं सुधारला.

तसेच सीसीआयच्या खरेदी काही अडचणी निर्माण झाल्या त्यामुळे मागील तीन आठवड्यांपासून सीसीआयची खरेदी काहीशी कमी झाली नाही. तर बाजारात येणाऱ्या कापसापैकी जवळपास 50% कापूस सीसीआय खरेदी करत होता. सीसीआयच्या खरेदीत अडचणी आल्यानंतर खुल्या बाजारात कापसाची खरेदी वाढली. तसेच कापूस दर 7000 ते 7300 रुपयांवर पोहोचल्याने शेतकरी ही खुल्या बाजारात माल विकत आहेत.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment