Water Management 2025 गेल्या वर्षीच्या तुलनेत या वर्षी प्रमुख धरणात पुरेसा पाणीसाठा असून, सध्या सिंचनासाठी दुष्काळी भागाला पिण्यासाठी सर्वच धरणातून पाणी सोडण्यात येत आहे. यामध्ये कोयनेतून 2100, धोम 1175, धोम-बलकवाडी 340, उरमोडी 570, तारळी 220 क्युसेक पाणी सोडले आहे. आगामी काळात पाणी नियोजन करण्यासाठी सातारा सिंचन मंडळांने आत्तापासूनच पाणी मागणी करण्याचे आवाहन उपसा सिंचन योजना व शेतकऱ्यांना केली आहे.

या वर्षी पावसाचे प्रमाण जेमतेम राहिल्यामुळे प्रमुख धरणात अद्यापपर्यंत तरी पुरेसा पाणीसाठा उपलब्ध आहे. गेल्या वर्षी मार्चमध्ये बहुतांशी धरणाने धरणांनी तळ गाठला होता. कोयना, धोम व धोम बलकवडी धरणातून मार्चमध्ये सिंचनासाठी पाणी सोडले जात होते. हे पाणी दुष्काळी भागासह पिण्याच्या पाण्यासाठी सोडले जात होते.
यावर्षी सर्वच प्रमुख धरणांत पुरेसा पाणीसाठा आहे साधारण 60 ते 75 टक्क्यांपर्यंत पाणी उपलब्ध आहे. सध्या कोयना, धोम, धोम-बलकवडी, कण्हेर, उरमोडी, तारळी या धरणातून सिंचनासाठी पाणी सोडले आहे.
यामध्ये कोयनेतून 2100, धोम 1175, धोम-बलकवडी 340, कण्हेर 425, उरमोडी 570, तारळी 220 क्युसेक पाणी सोडलेले आहे. यापैकी काही पाणी हे दुष्काळी भागांसाठी सोडण्यात येत आहे. पण सध्या सधन तालुक्यांतूनही धरणातील पाणी उपलब्ध करण्याची मागणी जोर धरत आहे. त्यामुळे सातारा सिंचन मंडळांने पाणी आवर्तनांचे नियोजन करण्यासाठी पाणी मागणी करण्याचे आवाहन केले आहे.
रेशीम शेतीचा सुवर्णकाळ – कमी गुंतवणुकीत मोठा नफा मिळवण्याची संधी ! रेशीम उद्योग माहिती
Water Management 2025 प्रमुख धरणांतील पाणीसाठा टीएमसी (टक्केवारी)
| कोयना | 75.76 (71.50) |
| धोम | 8.66 (64.13) |
| धोम-बलकवडी | 2.32 (56.92) |
| कण्हेर | 7.04 (69.70) |
| उरमोडी | 7.41 (74.38) |
| तारळी | 3.32 (56.73) |
| येरळवाडी | 0.68 (59.94) |

| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |