Magel Tyala Solar Pump 2025 मागेल त्याला सौर कृषी पंप योजना अंतर्गत अनेक शेतकऱ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर केलेले आहेत. शिवाय, पेमेंट देखील केलेले आहेत. मात्र, काही दिवसांपूर्वी या योजनेअंतर्गत कंपन्यांचा कोटा समाप्त झाल्याचं पोर्टलवर दिसून आले होते. त्यामुळे अनेक शेतकरी पासून वंचित असल्याचे चित्र आहे.

नवीन कंपन्यांना कोटा हा उपलब्ध करून दिलेला असून व्हेंडर सिलेक्शन मध्ये या कंपनीची नावे समाविष्ट होण्यास सुरुवात झालेली आहे. काही कंपन्या या ठिकाणी व्हेंडर सिलेक्शन मध्ये दिसत आहे, तर काही कंपन्या या लवकरच व्हेंडर सिलेक्शन मध्ये तुम्हाला परत दिसणार आहेत.
आता जमिनीची मोजणी होणार एका तासामध्ये आले हे नवीन तंत्रज्ञान
अशी करा अर्ज प्रक्रिया :
- सर्वप्रथम https://offgridmtsup.mahadiscom.in/AGSolarPumpMTS/PMKusumCons?uiActionName=trackA1FormStatus या महाराष्ट्र शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर यायचं आहे.
- या ठिकाणी लाभार्थी सुविधा या पर्यायावर क्लिक करत, यातील अर्जाची सद्यस्थिती या पर्यायावर क्लिक करा.
- यानंतर Search By Beneficiary या पर्याय समोरील रकान्यात आपली आयडी टाकायची आहे.
- आयडी टाकून सर्च या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- पुढील विंडोमध्ये शेतकऱ्याची संपूर्ण माहिती आपल्याला दिसून येईल, शेवटी सर्च व्हेंडर या पर्यायावर क्लिक करा.
WhatsApp Group
Join Now

- त्यावर क्लिक केल्यानंतर पुढे व्हेंडर असाइनमेंट असा पर्याय दिसून येईल.
- ज्या काही कंपन्या समाविष्ट झाल्या असतील त्यांची नावे दिसून येतील.
- जर तुम्हाला उपलब्ध असलेली कंपनी निवडायची असल्यास, ती कंपनी निवडून खाली असाइन या पर्यायावर क्लिक करायचे आहे.
- यानंतरही इतर कंपन्या समाविष्ट होण्याची शक्यता आहे, त्यासाठी वारंवार या संकेतस्थळावर जाऊन तपासणी करणे आवश्यक असणार आहे.