ऊसावरील लोकरी माव्याचे एकात्मिक नियंत्रण!! Pest control on sugarcane 2026

Pest control on sugarcane 2025 शेतातील पिकांना किडींच्या उपद्रवाचा इतिहास हा मानवाच्या शेती करण्याच्या इतिहासाइतकाच जुना आहे. किंबहुना मानव ज्यावेळी रानात कंदमुळे खाऊन जगत होता त्यावेळी झाडांना अथवा वेलींना निरनिराळ्या किडींचा प्रादुर्भाव होता. पूर्वीच्या काळी अस्थित्वात असणाऱ्या शेतीमध्ये या किडींची संख्या खूपच कमी होती. पिकांची उत्पादकताही नगण्य होती. किडींच्या प्रादुर्भावावर शेतकऱ्यांनी स्वतःच विकसित केलेल्या मशागतीय व भौतिक (सौर उष्णता) उपायांद्वारेच नियंत्रण मिळवले जायचे.

Pest control on sugarcane 2025

Pest control on sugarcane 2025 परंतु सध्याच्या यांत्रिक युगात किडींचा बंदोबस्त करण्यासाठी विविध रासायनिक कीटकनाशकांचा वापर मोठ्या प्रमाणात होत असून, या बेसुमार वापरामुळे किडीमध्ये प्रकारक शक्ती वाढत आहे. त्यामुळे कीड नियंत्रणात येऊ शकत नाही. तसेच फवारलेल्या कीटकनाशकांचे अवशेष मात्र फळे, भाजीपाला, चारा, पाणी व अन्नधान्य यात आढळून येतो व त्याचा दुष्परिणाम मानवी व पशुपक्षी यांच्या शरीरावर होत आहेत. त्याच बरोबर कीटकनाशकांच्या अति वापरामुळे मुख्य व दुय्यम किडींबरोबरच त्यांचे नैसर्गिक शत्रू व परागीभवनाचे काम करणाऱ्या उपयुक्त कीटकांची संख्या देखील कमी होते असते. त्यामुळे किरकोळ नुकसान करणाऱ्या किडींच्या संख्येत झपाट्याने वाढ होऊन या प्रमुख किडी बनतात.

सुरु ऊस लागवड तंत्रज्ञान!!

Pest control on sugarcane 2025 एकात्मिक कीड व्यवस्थापन म्हणजे ज्यामध्ये वातावरणाशी समन्व्य साधून व उपलब्ध कीड नियंत्रण पद्धती व तंत्राचा वापर करून किडींची संख्या आर्थिक नुकसानीच्या पातळीखाली ठेवणे.

WhatsApp Group Join Now

Pest control on sugarcane 2025 या पद्धतीमध्ये यांत्रिक, भौतिक, रासायनिक, जैविक, पर्यावर्णीय व कायदेविषयक पद्धतींचा विविध पद्धतींना योग्य वाव दिला गेल्यामुळे सुरुवातीपासून किडींच्या संख्येवर नियंत्रण ठेवले जाते व रासायनिक औषधांच्या अतिरेकी वापरामुळे होणारे दुष्परिणाम टाळता येतात.

ऊस हे महाराष्ट्रातील महत्वाचे नगदी पीक आहे व सुमारे 7.8 लाख क्षेत्रावर उसाची लागवड केली जाते. मात्र उसाची सरासरी उत्पादकता महाराष्ट्रात कमी आहे. याचे प्रमुख कारण म्हणजे दुष्काळ, लोकरी माव्याचा प्रादुर्भाव, अपुरी मशागत, निकृष्ठ बेणे, खत व पाण्याचा अयोग्य वापर, कीड/ रोग / तण नियंत्रणाकडे दुर्लक्ष इत्यादी महत्वाची कारणे उसाची उत्पादकता कमी होण्यास कारणीभूत होत आहेत.

किडींची ओळख: Pest control on sugarcane 2025

माव्याचे तोंड सोंडेसारखे असून ते पुढील पायाच्या जोडीच्या मध्य भागात वाकलेले असते. सोंडेच्या सहाय्याने पानाच्या पाठीमागील पर्णरंध्रातूश्र मावा रस शोषतो. उसाच्या पानाच्या खालील बाजूस मध्य शिरेलगत पांढऱ्या लोकरी सारख्या तंतुधारी, बिनपंखी, थोड्या प्रमाणात काळपट रंगाचा पंखी मावा आढळतो. बिनपंखी माव्याची मादी पांढरट व पिल्ले फिक्कट पिवळसर तर पंखी माव्याची मादी काळसर रंगाची व पिल्ले फिक्कट हिरव्या रंगाची असतात.

नुकसानीचा प्रकार: Pest control on sugarcane 2025

मावा त्याच्या अणकुचीदार सोंडेच्या साहाय्याने पानाच्या पाठीमागील बाजूस राहून रस शोषतात ऊसाच्या पानाच्या अन्नवाहक नलिकांमध्ये नत्र व ऍमिनो आम्लापेक्षा साखरेचे प्रमाण जास्त असते. जास्तीत जास्त नत्र मिळविण्यासाठी मावा जास्त रस शोषण करतो. रसातील शरीरास आवश्यक असणारी साखर घेऊन उरलेला माव्या सारखा पदार्थ विष्टेवाटे बाहेर फेकला जातो. या गोड पदार्थावर काळया रंगाची परोपजीवी (कॅलोडियम) बुरशी वाढते.

WhatsApp Group Join Now

संपूर्ण पान काळे पडते व पानाची प्रकाशसश्लेणाद्वारे अन्न तयार करण्याची क्रिया मंदावते. पानाच्या कडा सुकतात व पाने वाळू लागतात. ऊसाचे शेंडे कापल्यासारखे दिसतात. कांड्याची लांबी व जाडी कमी होते. पानांची लांबी व रुंदी कमी होते, वाढ खुंटते. ऊस उत्पादनात 20 ते 30 टक्के तर साखर उताऱ्यात 0.5 ते 2.00 युनिटने घट होते.

जीवनक्रम: Pest control on sugarcane 2025

या किडीमध्ये माद्या नराच्या समागमाशिवाय पुनरुपती करतात पिल्ले चार वेळा कात टाकून प्रौढ होतात. यात पंखी मादी व बिनपंखी मावा असे दोन प्रकार आढळतात.

प्रसार: या किडीचा प्रसार पंखी मावा वारा मुंग्या कीडग्रस्त पाने वेली याद्वारे होतो.

लोकरी मावा नियंत्रणाची योग्य वेळ:

Pest control on sugarcane 2025 या किडीचा प्रादुर्भाव दिसू लागताच किडीचा बंदोबस्त करावा. उन्हळ्यात लोकरी मावा अत्यंत अल्प प्रमाणात असतो. अशावेळी नदी, नाले, कॅनॉल, किंवा पाण्याचे प्रवाह परिसर असलेल्या गावात किंवा उसालगत असणाऱ्या झाडाच्या सावलीत मावा दबा धरून बसतात. हि लोकरी मावा उत्पत्ती स्थाने शोधून रासायनिक कीटकनाशकांचा वापर करून नष्ट करावीत लोकरी माव्याच्या नियंत्रणासाठी किडीच्या प्राथमिक अवस्थेत नियंत्रण करणे हीच वेळ योग्य असते.

एकात्मिक कीड नियंत्रणात मशागतीय उपायोजना:

Pest control on sugarcane 2025 पिकाची लागवड पठारुंद सरी किंवा जोड ओळखपद्धतीने करावी त्यामुळे प्रादुर्भाव नंतर नियंत्रणाचे उपाय योजना सोयीचे होते पट्ट्यात मूग, उडीद, चवळी, सोयाबीन किंवा हंगामानुसार पिके घ्यावीत. कडधान्य वर्गातील पिकांचा मित्र किडींच्या संवर्धनासाठी उपयोग होतो.

कीडग्रस्त ऊस बेण्यासाठी वापरू नये. निवडून झाल्यावर उसाची पाने जाळून टाकावे.

ऊस लागवडीपूर्वी बेणे प्रक्रिया करावी. 10 मि.ली. मॅलेथिऑन +100 लिटर पाणी घेऊन त्यात बेणे 15 मिनिटे बुडवून घ्यावे.

रासायनिक खतांचा योग्य वापर करावा कारण नत्रयुक्त खतांचा वापर जास्त केल्यास किडींच्या वाढीस प्रोत्साहन मिळते.

प्रादुर्भावाच्या सुरुवातीस किडीचे नियंत्रण करण्यासाठी प्राथमिक अवस्थेत किडींसह पाने अलगद काढून जाळून नष्ट करावीत.

उसावरील पहिली 7 ते 8 पाने उत्पादनाच्या दृष्टीने महत्वाची असल्याने तेवढी पाने पाण्याचा जास्त वापर टाळावा.

तणांचा नाश करावा, शेत व बांध स्वच्छ ठेवावेत.

ऊस खाली लोळू देऊ नये मोठी बांधणी औजारांच्या सहाय्याने वेळेवर करावी.

उन्हाळ्यात लोकरी माव्याची उत्पत्ती स्थाने शोधण्यासाठी शोध माहीम राबवून किडीचे सामूहिक नियंत्रण करावे.

बांबू वरील कीड नष्ट करावी.

ऊस पिकाभोवती मका, चवळी किंवा कडधान्य वर्गातील पिके लावावीत. त्याचा फायदा लोकरी मावा खाणाऱ्या मित्र कीटकांच्या संवर्धनासाठी होतो.

जैविक नियंत्रण: महाराष्ट्रात डिफा (कोनोबाथ्रा), मायक्रोमस इगोरेट्स व सिरफीड माशी व क्रायसोपर्ला कारणी हे परभक्षी मित्र कीटक मोठ्या प्रमाणावर आढळून येत आहेत.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment