पिकांवरील मित्रकीटकांची ओळख!! Identification of Insects on Crops 2025

Identification of Insects on Crops 2025 किडीच्या विविध अवस्थांवर उपजीविका करणारे नैसर्गिक शत्रू म्हणूनच परोपजीवी कीटक परभक्षी कीटक आणि रोगजंतू यांची पैदास करून त्याच्या वापरास प्रोत्सहान देऊन नवीन जैविक घटकांचे प्रस्थापन करून किडींचा बंदोबस्त करणे याला जैविक कीड नियंत्रण म्हणतात.

Identification of Insects on Crops 2025

Identification of Insects on Crops 2025 जैविक कीड नियंत्रणामध्ये मित्रकीटकांची ओळख व त्यांचा उपयोग विविध शत्रू किडींच्या बंदोबस्तासाठी होतो. याबाबत सविस्तर माहिती शेतकऱ्यांना असणे अत्यंत महत्वाचे आहे. त्यामध्ये परोपजीवी, परभक्षी मित्रकीटक आणि रोगजंतूंमध्ये परोपजीवी बुरशी, जिवाणू, विषाणू आणि परोपजीवी सूत्रकृमी इतादींचा समावेश होतो.

बिट लागवड तंत्रज्ञान!!

परभक्षी मित्र कीटक: Identification of Insects on Crops 2025

क्रायसोपर्ला:

परभक्षी कीटक हा महत्वाचा घटक आहे. शेतामध्ये किंवा रस्त्याच्या कडेने मऊ मातीत गोल घर करून राहणारा व मुंग्या खाऊन जगणारा अनटलॉयन हा परभक्षी कीटक सर्वांच्या परिचयाचा आहे. त्यापैकी न्यूरोप्टेरा कुळातील दुसरा महत्वाचा कीटक म्हणजे क्रायसोपर्ला झास्ट्रॉबी सिल्लेमी (क्रायसोपर्ला कानिर्या) यालाच इंग्रजीमध्ये फ्लेस्विंगम असे म्हणतात. या कीटकांचे पारदर्शक पंख, पोपटी रंग, उठावदार डोळे, लांब मिशा शरीर रचनेमुळे कार्यसोपर्ला अतिशय आकर्षक दिसतो.

WhatsApp Group Join Now

निसर्गात क्रायसोपर्ला वर्षभर आढळून येतो. हा मित्र कीटक कापूस, मूग, करडई, वांगी, कोबी, भेंडी, पेरू, पपई, सीताफळ, डाळिंब, इ. पिकांवरील रस शोषण करणारे मृदू शरीरवर्गीय मावा, तुडतुडे, फुलकिडे, पांढरी माशी, पिठ्या ढेकूण व बोंडआळीची अंडी या किडींवर उपजीविका करताना आढळून येतो.

या मित्र कीटकाच्या अंडी, अळी, कोष व प्रौढ अशा चार अवस्था असून साधारणतः 66 ते 102 दिवसात एक पिढी पूर्ण होते. अंडी अवस्था 3 ते 5 दिवस, अळी अवस्था 10 ते 15 दिवस, कोषावस्था 6 ते 17 दिवस, प्रौढ अवस्था 47 दिवस (उन्हाळा), 65 दिवस (हिवाळा) असते.

अंडी: Identification of Insects on Crops 2025

या मित्र कीटकांची अंडी पोपटी रंगाची असून त्यांचा आकार लांबट गोल असतो. पानावर किंवा पानाखाली तथा खोडावर 1 ते 1.5 से.मी. लांबीच्या तंतूच्या टोकावर अंडी आढळून येतात. अंडी तंतूच्या टोकावर असल्यामुळे इतर किडी सहजासहजी ती अंडी खाऊ शकत नाहीत. एक मादी पतंग साधरणतः 400 ते 600 अंडी घालते. अंड्यातून अळी बाहेर येण्याच्या दरम्यान अंडी पांढरट आणि नंतर काळी पडतात.

अळी: Identification of Insects on Crops 2025

अळी पांढऱ्या रंगाची असून तोंडाकडील भागाला दोन मोठ्या नांग्या असतात. नांग्याचा उपयोग भक्षाला मजबूत पकडून ठेवण्यासाठी केला जातो. अळी अवस्था कीड नियंत्रणासाठी महत्वाची आहे. अळी तीन वेळा कात टाकते. पहिल्या तीन दिवसात अळीला कमी खाद्य लागते. तदनंतर 7 ते 10 दिवसाच्या कालावधीत हि अळी अधाशीपणे किडींचे भक्षण करते. क्रायसोपर्लाची अळी शेवटच्या 7 दिवसात 538 मावा किंवा 525 पांढऱ्या माशा किंवा 238 पीठे ढेकूण किंवा 135 तुडतुडे किंवा 675 घाटे अळीची अंडी खाते.

WhatsApp Group Join Now

प्रयोगशाळेत संगोपन दरम्यान एका अळीला खाद्य म्हणून 1000 ते 1200 कोर्सीरा पतंगाची अंडी लागतात. यावरून या अळीची खादाडपणाची कल्पना येईल.

कोष: Identification of Insects on Crops 2025

पूर्ण वाढ झाल्यानंतर अळ्या स्वतः भोवती कोष विणतात. कोष पांढरट रंगाचे व आकाराने गोल, ज्वारीच्या दाण्याएवढे असतात. कोशवस्ता पिकांच्या वाळलेल्या पानांमध्ये आढळून येते.

प्रौढ: Identification of Insects on Crops 2025

प्रौढ अतिशय आकर्षक हिरवट-पोपटी रंगाचे असून पंख पारदर्शक असतात. पतंग अतिशय संथ हालचाल करताना म्हणून त्यांची गणना सर्वात हळू उडणाऱ्या कीटकांमध्ये होते. पतंगावस्थेत ते परागकण मध किंवा मावा कीटकांनी शरीरातून बाहेर टाकलेल्या चिकट द्रवावर उपजीविका करतात. कोषवस्थेतून बाहेर पडलेल्या नर मादीचे पुनः पुन्हा मिलन होते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा


Leave a Comment