Brinjal Crop 2025 वांगी हे महाराष्ट्रमध्ये घेतले जाणारे एक महत्वाचे भाजीपाला वर्गीय पीक असून ते खरीप, रब्बी आणि उन्हाळी हंगामात घेतले जाते. दररोजच्या आहारात या भाजीचे महत्व खूप असून यात जीवनसत्वे, प्रथिने, लोह, इत्यांदींचे पुरेसे प्रमाण असते. महाराष्ट्रातील सर्व जिल्ह्यांमध्ये या पिकाची लागवड असल्यामुळे वांग्यावर किडींचा प्रादुर्भाव भरपूर प्रमाणात दिसून येतो.

Brinjal Crop 2025 शेंडे आणि फळे पोखरणारी अळी, तुडतुडे, मावा, पांढरी माशी, लाल कोळी या किडींचा प्रादुर्भाव प्रामुख्याने वांग्यावर दिसून येतो. या किडींची ओळख, आणि व्यवस्थापन या विषयाची माहिती करून घेणे हे शेतकऱ्यांच्या दृष्टीने महत्वाचे ठरते.
सातारा जिल्ह्यातील या दहा साखर कारखान्यांचे ऊस दर जाहीर!!
शेंडे आणि फळे पोखरणारी अळी: Brinjal Crop 2025
या किडीचा पतंग हा तपकिरी रंगाचा व लाल कडा असलेला असतो.
समोरील पंख पांढऱ्या रंगाचे असून त्यावर तपकिरी काळसर रंगाचे पट्टे असतात.
अळी हि पांढऱ्या रंगाची असते.
या अळीचा प्रादुर्भाव लागवडी नंतर काही आठवड्याने सुरु होतो.
हि अळी सुरुवातीस कोवळ्या शेंड्यात शिरून आतील गर खाते त्यामुळे झाडांचे शेंडे वाळून जातात.
फळ घर्ना झाल्यावर हि अळी फळावर छिद्र करून आत शिरते व आतील भाग खाऊन फळावरील छिद्र तिच्या विष्टेने लिपून टाकते.
याकिडीमुळे फळांचे 50 टक्के नुकसान होते.

मावा: Brinjal Crop 2025
प्रौढ मावा लांबट असून रंगाने हिरवा असतो व 1 ते 2 मी. मी. लांबीचा असतो.
प्रौढ मावा व त्याची पिल्ले पानाच्या खालच्या बाजूने आणि कोवळ्या शेंड्यावर दिसून येतात व रस शोषण करतात.
हि कीड त्याच्या शरीरातून चिकट पदार्थ बाहेर टाकते त्यामुळे पाने चिकट होतात.
कालांतराने त्यावर बुरशी वाढून पानावर काळा थर जमा होतो व प्रकाशसंश्लेषण क्रिया मंदावते त्यामुळे झाडाची वाढ खुंटते.
तुडतुडे: Brinjal Crop 2025
प्रौढावस्थेतील तुडतुडे साधारणपणे 2 ते 4 महिने लांब व फिकट हिरव्या रंगाचे असतात.
समोरील पंखावर दोन काळ्या रंगाचे ठिपके असतात.
तुडतुडे हे पानांच्या खालच्या बाजूला राहून त्यातील रस शोषण करतात.
प्रादुर्भावग्रस्त पाने कडेने पिवळसर होऊन त्यानंतर तपकिरी रंगाचे होतात.
या किडीचा जास्त प्रादुर्भाव झाल्यास संपूर्ण पाने तांबडी होऊन त्यांच्या कडा मुरगळतात, परिणामी झाडांची वाढ खुंटते.
पांढरी माशी: Brinjal Crop 2025
पांढरी माशी ही वांग्यावरील महत्त्वाची रस शोषण करणारी कीड आहे.
प्रौढ माशीचे पंख पांढरे असतात.
ही कीड पानाच्या खालील बाजूने रस शोषण करते.
रस शोषणामुळे झाडाची पाने लालसर होऊन वळतात.
पिल्ले त्यांच्या शरीरातून गोड चिकट पदार्थ बाहेर टाकतात व त्यावर बुरशी वाढून झाडांची वाढ खुंटते.
लाल कोळी: Brinjal Crop 2025
ही कीड सूक्ष्म असून डोळ्याने सहजासहजी दिसत नाही.
ही कीड वांगी पिकात नुकसान करणारी महत्त्वाची कीड आहे.
पिल्ले व प्रौढ अवस्था पानाच्या मागील बाजूवर राहून पानातील रस शोषून घेतात.
त्यामुळे पानाचा खालचा भाग गुलाबी रंगासारखा दिसतो.
पानाच्या खालील बाजूस जाळे तयार झालेले दिसते व पाने वेडेवाकडी होतात.
सूत्रकृमी: Brinjal Crop 2025
ही एक अटकीय कीड आहे.
हिची सरासरी लांबी 0.2 ते 0.5 मि.मी. असते.
सूत्रकृमी हे जमिनीत राहून पिकाच्या मुळात शिरतात आणि मुळातील रस शोषण करून मुळांवर गाठी तयार करतात.
कालांतराने झाडांची वाढ खुंटते.

एकात्मिक कीड व्यवस्थापन:
- जमिनीची खोल नांगरट करावी जेणेकरून किडींच्या सुप्तावस्था बाहेर येऊन नष्ट होतील.
- कीडग्रस्त शेंडे आणि फळे अळींसह नष्ट करावे.
- वांग्याची लागवड करताना सुधारित व शिफारस केलेल्या वाणांची निवड करावी.
- फळे व शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी शेतामध्ये प्रति हेक्टरी 10 कामगंध सापळे या प्रमाणात लावावे.
- रस शोषक किडींचा प्रादुर्भाव वाढू नये म्हणून नत्रयुक्त खतांचा योग्य वापर करावा व अधिक वापर टाळावा.
- पांढऱ्या माशीसाठी पिवळे चिकट सापळे एकरी 4 ते 5 लावावेत.
- कोळी या अटकिटकिय किडींच्या नियंत्रणासाठी डायकोफॉल 25 मि.मी. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
- सूत्रकृमींच्या नियंत्रणासाठी लागवडीच्या वेळी प्रती हेक्टरी 200 किलो निंबोळी पेंडीचा वापर करावा तसेच प्रति हेक्टरी 10 किलो ट्रायकोडर्मा व्हिरीडी शेणखतात मिसळून जमिनीत टाकावे.
वरील उपाययोजना केल्यावर जर किडींचा प्रादुर्भाव वाढून आर्थिक नुकसानीचे पातळी ओलांडण्यास पुढील रासायनिक कीटकनाशकांची फवारणी करावी.
फळे व शेंडा पोखरणाऱ्या अळीच्या नियंत्रणासाठी:
रोपासाठी तयार केलेल्या वाफ्यात कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम किंवा फोरेट 10 ग्रॅम टाकावे.
तसेच कोराजन 18.5% प्रवाही 5 मि.मी. किंवा मार्शल 10 मी.मी. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी किंवा निंबोळी अर्क 10 लिटर पाण्यातून फवारणी करावी.
रस शोषक किडींच्या नियंत्रणासाठी (10 लिटर पाणी)
मावा: असिटामॅप्रिड 20 टक्के :2 ग्रॅम, इमिडाक्लोप्रिड 17.5 टक्के:4 मी.
तुडतुडे: असिफेट 75 टक्के :20 ग्रॅम, थायमिथोक्झाम 25 टक्के: 5 ग्रॅम.
पांढरी माशी: ट्रायझोफॉस 40 टक्के :10 मी, निंबोळी तेल 5 टक्के :20 मी. असिफेट 75 टक्के: 20 ग्रॅम.
सूत्रकृमी: कार्बोफ्युरॉन 30 ग्रॅम. रोप लावते वेळी वाफ्यात टाकावे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |