सातारा जिल्ह्यातील या दहा साखर कारखान्यांचे ऊस दर जाहीर!! Sugarcane Prices 2025

Sugarcane Prices 2025 सातारा जिल्ह्यातील साखर कारखान्यांचा गाळप हंगाम जोमात सुरु झाला असला तरी दराबाबत मात्र मनमानी सुरु असून, अद्यापही सहा साखर कारखान्यांनी दर जाहीर केलेला नाही.

Sugarcane Prices 2025

Sugarcane Prices 2025 विशेष म्हणजे, हे कारखाने मंत्री आणि माजी खासदारांचे आहेत. तसेच उताऱ्याबाबतही शेतकऱ्यांकडून तक्रारी असून थर्ड पार्टी ऑडिटची मागणी करण्यात येत आहे. साखर जिल्ह्यात 17 कारखान्याचे गाळप सुरु झाले आहे.

राज्यात थंडीची लाट कायम, शेतकऱ्यांसाठी सल्ला!!

मात्र, साखरेचा उतारा गेल्या तीन वर्षांपासून घटू लागला आहे. त्याच्या थर्ड पार्टी ऑडिटची मागणी होत आहे. मागील साखर उताऱ्यावर यावर्षीचा एफआरपी ठरत असल्याने इतर जिल्ह्याच्या तुलनेत कमी दर मिळत आहे.

WhatsApp Group Join Now

Sugarcane Prices 2025 यंदा 10.25 बेस रिकव्हरी गृहीत धरून 3,550 एफआरपी निश्चित केली आहे. परंतु दरांबाबत अद्यापही कारखान्याकडून मनमानी सुरु आहे. सहा साखर कारखान्यांनी अद्यापही दर जाहीर केलेला नाही.

त्यामुळे कार्यक्षेत्रातील ऊसतोड झाल्यानंतर कारखाने देईल तो दर सभासदांना घ्यावा लागू शकतो. त्यामुळे लवकरात लवकर दर जाहीर करावा, अशी मागणी होत आहे.

या 10 कारखान्यांकडून दर जाहीर: Sugarcane Prices 2025

जिल्ह्यात कृष्णा, जयवंत शुगर्स, रयत-अथणी, सह्याद्री, जरंडेश्वर, शिवनेरी, अजिंक्यतारा यांनी 3500 रुपये.

माण-खटाव, ग्रीन गोपूज, वर्धन ऍग्रो 3300 रुपये.

दत्त इंडिया (साखरवाडी) 3400 रुपये.

WhatsApp Group Join Now

पाटणच्या देसाई कारखान्याने 3000 दर जाहीर केला आहे.

दर न जाहीर करणारे कारखाने: Sugarcane Prices 2025

प्रतापगड, किसनवीर, खंडाळा, स्वराज, शरयू, श्रीराम या सहा कारखान्यांनी अजूनही दर जाहीर करण्याची तसदी घेतलेली नाही.

विशेष म्हणजे यापैकी बहुतेक कारखान्यांचा ताबा मंत्री, माजी खरदारांकडे आहे.

विलंब व्याजावरही मौन: Sugarcane Prices 2025

उसाचे बिल 15 दिवसात न दिल्यास वार्षिक 15 टक्के व्याजासह रक्कम देणें बंधनकारक आहे. पण, दरच नसेल तर बिल व व्याजाचा हिशेब कोण करणार? असा सवालही उपस्थित होत आहे.

जिल्ह्यात 36.49 लाख मेट्रिक टन गाळप:

  • अथणी शुगर्स :1,95,510
  • शरयू: 2,71,270
  • जयवंत शुगर्स: 2,70,391
  • स्वराज: 2,84,377
  • प्रतापगड: 74,580
  • अजिंक्यतारा: 1,97,910
  • कृष्णा: 5,45,979
  • किसनवीर: 1,87,790
  • श्रीराम: 1,87,472
  • खंडाळा: 1,15,030
  • दत्त इंडिया: 3,42,820
  • शिवनेरी: 2,81,430
  • सह्याद्री: 2,54,700
  • खटाव माण: 2,31,665
  • देसाई कारखाना पाटण: 20,985
  • ग्रीन पॉवर शुगर: 1,171430
  • एकूण: 36,49,339

कायदेमंडळात बसणारेच कायदे मोडत असून, नियमाप्रमाणे शेतकऱ्यांना न्याय देत नाहीत. दुसरीकडे 17 नोव्हेंबरच्या बैठकीत दर न जाहीर करणाऱ्यांवर कडक कारवाईचा इशारा जिल्हाधिकाऱ्यांनी दिला होता, पण आजपर्यंत कोणतीही कारवाई करण्यात आलेली नाही. – राजू शेळके, जिल्हाध्यक्ष स्वाभिमानी शेतकरी संघटना”

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment