हरभरा पिकातील कीड व्यवस्थापन!! Gram Crop 2025

Gram Crop 2025 हरभरा हे रब्बी हंगामातील एक महत्वाचे डाळवर्गीय पिक आहे. राज्यातील अहमदनगर, नाशिक, जळगाव, पुणे, सोलापूर, औरंगाबाद, उस्मानाबाद व परभनी या जिल्ह्यांत प्रामुख्याने हरभरा पिकाची लागवड मोठ्या प्रमाणावर करण्यात येते. यंदा सरासरीपेक्षा अधिक पर्जन्यमान झाले असल्याने पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाड्यात देखील या पिकाखालील बागायती क्षेत्रासोबतच कोरडवाहू क्षेत्रातही वाढ होण्याची शक्यता आहे.

Gram Crop 2025

Gram Crop 2025 हरभरा पिकात वाढीच्या अवस्थेनुसार वेगवेगळ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो त्यात प्रामुख्याने मावा, तुडतुडे या रसशोषक करणाऱ्या किडींसोबतच घाटे अळी मुळे / देठ कुर्तडनारी अळी, उंट अळी, नागअळी, गोनोसिफॅलम भुंगेरे, वाळवी, इ. किडींचा प्रादुर्भाव दिसून येतो. वेळीच कीड नियंत्रण उपायांचा अवलंब न केल्यास एकट्या घाटे अळीपासून पिकाचे जवळपास 30 ते 40 टक्क्यांपर्यंत नुकसान होऊ शकते. शेतकरी बांधवानी हरभरा पिकावर येणाऱ्या विविध किडींची सजग ओळख करून घेऊन पीक संरक्षण खर्चात बचत करण्यासाठी एकात्मिक कीड व्यवस्थापनाचा अंगीकार करावा.

सातबारा काढण्यासाठी आता तलाठ्याकडे जाण्याची गरज नाही, डाउनलोड करा तुमच्या मोबाईल वर!! 

घाटे अळी: Gram Crop 2025

हरभरा पिकापासून भरघोस उत्पन्न मिळविण्यामध्ये मुख्य अडसर असतो तो घाटे अळीचा पीक फुलोऱ्यापासून ते काढणीपर्यंत घाटे अळीचा प्रादुर्भाव दिसून येतो. हरभरा पिकांबरोबरच कापूस ज्वारी मका टोमॅटो लसूणघास तूर आणि इतर कडधान्य पिकांवर देखील या किडींचा मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव होतो किडीचा पतंग शरीराने दणकट असून पिवळसर रंगाचा असतो पुढील पंख तपकिरी रंगाचे असून त्यावर काळे ठिपके असतात तर मागील पंखाच्या कडा धुरकट असतात.

WhatsApp Group Join Now

जीवनक्रम:

किडीचा जीवनक्रम अंडी अळी कोष व पतंग अशा चार अवस्थांमध्ये पूर्ण होतो. नर आणि मादी पतंगाच्या मिलनानंतर मादी 3 ते 4 दिवसात पिकांच्या पानांवर फुलांवर अथवा कोवळ्या शेऱ्यांवर 150 ते 300 गोलाकार चकचकीत हिरवट पिवळ्या रंगाची अंडी घालते अंड्यातून 5 ते 6 दिवसात भुरकट पांढऱ्या रंगाच्या अळ्या बाहेर येतात अळीची वाढ 15 ते 20 दिवसात 5 ते 6 वेळा कात टाकून पूर्ण होते वाढलेली अळी 4 ते 5 सेमी लांब व गडद हिरव्या किंवा तपकिरी करड्या रंगाची असते आणि आणि तिच्या शरीराच्या दोन्ही बाजूस करड्या अथवा पांढऱ्या रंगाचे पट्टे असतात. एक घाटे अळी तिच्या जीवनात सुमारे 30 ते 40 घाट्याना नुकसान पोहचविते कोषावस्थेत जाण्यापूर्वी 1 तें 2 दिवस आधी अळीची भूक मंदावते ते अळी झाडाच्या भोवती जमिनीत 5 ते 10 सेमी खोल थरात जाऊन अंगाभोवती मातीचे वेष्टन करून कोषावस्थेत जाते.

कोष तांबड्या रंगाचे असून 1.5 ते 2 से.मी. लांब असतात हवामानानुसार कोश अवस्था 8 ते 15 दिवस टिकते कोषातून परत रात्रीचे वेळी पतंग बाहेर पडतात आणि त्याचे पुढील प्रजनन सुरू होते. अशा प्रकारे या फेरीचा जीवनक्रम 35 ते 40 दिवसात पूर्ण होतो डब्बी हंगामात हरभरा पिकात घाटे अळीच्या दोन ते तीन पिढ्या पूर्ण होताना दिसून येतात पिकाच्या अवस्थेनुसार विचार केल्यास काहीच वाढीच्या अवस्थेत होणाऱ्या प्रादुर्भावापेक्षा काळ्या फुले व घाट्यांवरील प्रादुर्भाव जास्त नुकसानकारक ठरतो.

नुकसानीचा प्रकार:

लहान अळ्या सुरुवातीस पानांची खालील बाजू खरवडून खातात. त्यामुळे पानांवर पांढरे डाग दिसून येतात. प्रादुर्भाव जास्त असल्यास पानांची जाळी झालेली दिसते. अळ्या झाडांचे कोवळे शेंडे देखील कुरतडून खातात. त्यामुळे शेंडे पाने विहिरीत होतात. पिकास आलेल्या कळ्या व फुले देखील अळ्या कुरडतडून खातात परिणामी घाटे कमी प्रमाणात तयार होतात. घाटे पक्वतेच्या कालावधीतील ढगाळ वातावरण किडीच्या वाढीस अतिशय पोषक असल्यामुळे अल्पावधीतच किडीची संख्या झपाट्याने वाढू शकते.

एकात्मिक व्यवस्थापन:

पेरणीच्या वेळी हेक्‍टरी 200 ग्रॅम ज्वारी शेतामध्ये फेकावी जेणेकरून त्याचा ‘नैसर्गिक पक्षी थांबा’ म्हणून चांगला उपयोग होतो.

WhatsApp Group Join Now

वेळोवेळी नींदणी/ कोळपणी करून पिक तण विहरीत ठेवावे. बांधांवरील कोळशी, रानभेंडी व पेटारी इ. तणे काढून नष्ट करावे.

मुख्य पिकाभोवती झेंडू या सापळा पिकाची एक ओळ लावावी.

घाटे अळीच्या सर्वेक्षणासाठी हेक्टरी 5 कामगंध सापळे जमिनीपासून 1 मीटर उंचीवर लावावीत.

पिक सुरुवातीला कायिक वाढीत असताना 5 टक्के निंबोळी अर्क किंवा अझाडिरॅक्टीन 30% डब्ल्यू. एस. पी. 300 पी.पी.एम. 50 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून पहिली प्रतिबंधात्मक फवारणी व 15 दिवसांच्या अंतराने दुसरी फवारणी केल्यास घाटे अळीचा पतंग अशा पिकावर अंडी घालण्याचे टाळतो.

पिक 50 टक्के फुलोऱ्यावर असताना व घाटे भरताना सुरुवातीच्या काळात अळीचा प्रादुर्भाव वाढल्यास शक्य तितक्या अळ्या वेचून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून माराव्यात.

जैविक घटकांचा वापर घाटे अळीच्या प्रभावी नियंत्रणासाठी अतिशय उपयुक्त ठरतो. प्रथम व द्वितीय अळ्या दिसू लागताच एच.ए.एन.पी.व्ही. विषाणू 250 एल. ई. 10 मि.ली. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी. विषाणूची कार्यक्षमता वाढवण्यासाठी व उन्हापासून संरक्षण करण्यासाठी 1 ग्रॅम राणीपाल फवारणीच्या द्रावणात मिसळावे. रोगकारक बुरशी बिव्हेरिया बेसन 1.15% डब्ल्यू 50 ग्रॅम किंवा बॅसिआना 1.15% डब्ल्यू पी 50 ग्रॅम किंवा बॅसिलस थुरिंजिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती 0.5% डब्ल्यू पी 40 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

रासायनिक कीटकनाशके किडीने आर्थिक नुकसान पातळी ओलांडल्यास (दोन अळ्या प्रति मीटर ओळीत आढळून आल्यास किंवा 5 टक्के घाटांवर अळीचा प्रादुर्भाव दिसून आल्यास अथवा सतत 2 ते 3 दिवस प्रत्येक सापळ्यात 8 ते 10 पतंग आढळून येत असल्यास) कीटकनाशकांची फवारणी करावी.

मुळे/ देठ कुर्तडणारी अळी: Gram Crop 2025

या किडीचे पतंग तपकिरी रंगाचे तीन ते पाच सेमी लांब, पंखावर तिरकस रेषा व ठिपके असलेले असतात. मादी पतंग जमिनीवर अथवा पानांच्या खालच्या बाजूस व खोडाच्या बुंध्याशी पुंजक्यात हिरवट पांढरा रंगाची अंडी घालते. अळी तपकिरी रंगाची मऊसर, चपटी 40 ते 45 मिमी लांब असून तिचे डोके लाल असते. पूर्ण वाढलेली अळी काळपट रंगाची असते. स्पर्श करताच ती शरीराची गुंडाळी करते. कोषाअवस्था जमिनीत असते. अंडी,अळी आणि कोषाअवस्थेचा कालावधी अनुक्रमे 2 ते 13, 28 ते 35 आणि 10 ते 30 दिवसांचा असतो.

नुकसानीचा प्रकार:

दिवसा 5 ते 10 सेमी खोल जमिनीतील भेगांमध्ये, मातीच्या ढेकळाखाली अथवा गवताच्या ढिगाखाली लपून राहतात आणि रात्रीच्या वेळी बाहेर पडून जमिनीलगत रोपांची मुळे, खोडे व फांद्या देखील कुरतडून खातात. प्रादुर्भावित क्षेत्रात रोपे, रोपट्यांच्या फांद्या जमिनीत अर्धवट पुरलेल्या आढळून येतात. रोपे सुकून मरतात. या किडीचा प्रादुर्भाव नदीकाठच्या प्रदेशात जास्त आढळतो.

नियंत्रण: शेतात संध्याकाळच्या वेळेस ठीकठिकाणी वाळलेल्या गवताचे ढीग करून ठेवावेत अळ्या दिवसा त्याखाली लपून बसतात. अशा अळ्या पकडून रॉकेल मिश्रित पाण्यात बुडवून नष्ट कराव्यात. क्लोरोपायरीफॉस 20% इ.सी. 50 मि.लि. प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

उंट अळी: Gram Crop 2025

पतंग पिवळसर रंगाचे 25 मिमी लांब असतात. मादी पतंग जवळपास एका पुंजक्यात 40 या प्रमाणात पानांवर हिरव्या रंगाची अंडी घालते. अळी हिरवट रंगाची असते. पूर्ण वाढ झालेली अळी 2.5 ते 3 से.मी. लांब असते. चालताना अळी पाटीत बाक काढून चालते. त्यामुळे तिची हालचाल उंटासारखी दिसते. कोषावस्था जमिनीत पूर्ण होते एक पिढी पूर्ण होण्यासाठी 4 ते 5 आठवड्यांचा कालावधी लागतो.

नुकसानीचा प्रकार:

सुरुवातीला अळ्या पानांचा हिरवा भाग खरवडून खातात तर मोठ्या अळ्या पानांचा सर्व भाग आणि कळ्या, फुले आणि तसेच घाटे लागल्यावर त्यावर देखील उपजीविका करतात. अळ्या घाट्याची टरफले देखील खातात. त्यांच्या उपद्रवामुळे घाट्यावर वेड्यावाकड्या आकाराची छिद्र पडतात.

नियंत्रण: 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा बॅसिलस थुरिंजिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

नागअळी: Gram Crop 2025

या किडीची प्रौढ माशी काळसर पिवळ्या रंगाची असून तिची लांबी 1.5 मि.मी असते. आपल्या अणकुचीदार नांगीने मादी पानाला छिद्रे पाडून आतील पेशीत पांढऱ्या रंगाची अंडी घालते. 4 ते 5 दिवसात अंड्यातून पिवळसर पाय नसलेली अळी बाहेर पडते. एका आठवड्यात अळीची पूर्ण वाढ होऊन साधारण 3 मिमी लांबीची होते. अळी पानांवर किंवा जमीनीत कोषावस्थेत जाते.

नुकसानीचा प्रकार:

अंड्यातून बाहेर पडलेल्या अळ्या पानांचा पापुद्रा खातात, त्यामुळे पानांवर नागमोडी रेषा दिसून येतात. त्यामुळे तिला नागअळी असे म्हंटले जाते. जास्त प्रादुर्भाव झाल्यास पानांची गळ होते व उत्पादनात घट दिसून येते. उशिरा पेरणी झालेले पीक मोठ्या प्रमाणावर या किडीच्या प्रादुर्भावास बळी पडते.

नियंत्रण: 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा बॅसिलस थुरिंजिएन्सिस कुर्सटाकी प्रजाती 20 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

हरभऱ्यावरील रसशोषक किडी:

मावा: Gram Crop 2025

कीड आकाराने अंडाकृती तर रंगाने काळी अथवा तपकिरी असते. प्रौढावस्था हि चमकदार काळ्या रंगाची 2 मिमी लांबीची आणि पंखधारी असते. पिल्ले प्रौढाप्रमाणेच परंतु आकाराने लहान असतात. अनुकूल हवामानात एका आठवड्यात किडीची एक पिढी तयार होते एक मादी दिवसाला 8 ते पिल्लाना जन्म देते. त्यामुळे कमी कालावधीत त्यांची संख्या झपाट्याने वाढते.

नुकसानीचा प्रकार:

पिल्ले व प्रौढ समूहाने पानांच्या खालच्या बाजूस राहून कोवळी पाने, खोड व घाटे यातील रस शोषण करतात. त्यामुळे पाने पिवळी पडून निस्तेज होऊन झाडांची वाढ खुंटते. त्याचप्रमाणे कीड शरीरातून मधासारखा चिकट द्रव बाहेर टाकते. तो पानांवर पसरून त्यावर काळया बुरशीची वाढ होते. त्यामुळे झाडे काळवंडतात या किडीमुळे खुजा रोगाच्या विषाणूंचा प्रसार देखील होतो.

तुडतुडे: Gram Crop 2025

हरभरा पिकावर आढळणारे तुडतुडे हिरवट पिवळसर 2-3 मिमी लांबीचे पाचरीच्या आकाराचे असून त्यांच्या डोक्यावर गर्द तपकिरी ठिपका असतो. पुढील पंखांवर दोन काळे ठिपके व लांब अरुंद रेषा असते. तुडतुडे नेहमी तिरके चालत असल्यामुळे सहज ओळखता येतात. या किडींची मादी 10 ते 15 अंडी पानांच्या शिरेमध्ये घालते. एका आठवड्यात अंड्यातून पिल्ले बाहेर पडतात. त्यांचा रंग पोपटी हिरवट असतो. पंख विकसित झालेले नसतात. पिल्लावस्था 15 ते 21 दिवसांची असते. 35 ते 40 दिवसात किडीचा जीवनक्रम पूर्ण होतो.

नुकसानीचा प्रकार:

पिल्ले आणि प्रौढ पानातील रस शोषण घेतात त्यामुळे पाणी करपतात. ही कीड देखील शरीरातून मधासारखा चिकट द्रव बाहेर टाकते. तो पानांवर पसरून त्यावर काळ्या बुरशीची वाढ होते. त्यामुळे पानांची प्रकाश संश्लेषणाची क्रिया मंदावते.

रसशोषक किडींचे नियंत्रण:

पिकाला पाण्याचा ताण पडू देऊ नये.

शेतात पिवळ्या चिकट सापळ्यांचा 40 प्रति हेक्‍टरी वापर करावा.

नियंत्रणासाठी 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा अझाडिरॅक्टीन 1500 पी पी एम 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

लेकॅनीसीलीयम लेकानी 1.15% डब्ल्यू पी या बुरशीची 50 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.

सध्य परिस्थितीत केंद्रीय कीटकनाशक मंडळाने हरभरा पिकासाठी घाटेअळी व मुळे कुर्तडनारी अळी वगळता इतर किडींसाठी रासायनिक कीटकनाशकांची शिफारस केलेली नसल्याने तज्ज्ञांचा मार्गदर्शनाशिवाय त्यांचा वापर करू नये.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment