राज्यात थंडीची लाट कायम, शेतकऱ्यांसाठी सल्ला!! Weather Update 2025

Weather Update 2025 राज्यभरात सध्या थंडीची लाट पाहायला मिळत असून तापमानात झालेल्या लक्षणीय घसरणीमुळे नागरिकांना हुडहुडी भरली आहे.

Weather Update 2025

Weather Update 2025 थंडगार वाऱ्यांमुळे किमान तापमानात घट नोंदवली जात असून हि थंडीची लाट पुढील काही दिवस कायम राहण्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तविला आहे.

गव्हाची आंतरमशागत व पाणी व्यवस्थापन!!

IMD ने दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये थंडीची लाट कायम राहण्याची शक्यता आहे. उत्तरेकडील थंड आणि कोरड्या वाऱ्यांचा प्रभाव कायम असल्याने, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भातील काही भागांमध्ये गारठा जाणवत राहील.

WhatsApp Group Join Now

Weather Update 2025 मराठवाडयातील काही भागांत किमान तापमान सरारीपेक्षा कमी नोंदवले गेले आहे. राज्याच्या उर्वरित भागांमध्ये किमान तापमान सरासरीच्या जवळपास असले तरी थंडीचा प्रभाव स्पष्टपणे जाणवत आहे.

गेल्या 24 तासांत राज्यातील प्रमुख शहरांमध्ये नोंदवलेले किमान तापमान पहिले असता मुंबई (कुलाबा) येथे 20.6 अंश सेल्सियस, अहिल्यानगर येथे 7.3 अंश सेल्सियस, नाशिक येथे 7.8 सेल्सियस, गोंदिया आणि मालेगाव येथे प्रत्येकी 8.4 अंश सेल्सियस तापमान नोंदवले गेले. राज्यातील सर्वात कमी किमान तापमान अहिल्यानगर येथे नोंदले गेले असून येथे गारठा अधिक जाणवत आहे.

मध्य महाराष्ट्रातील काही भागात थंडीची लाट अनुभवास येत असून किमान तापमानात फारसा बदल झाला नसला तरी थंडीचा प्रभाव कायम आहे. दक्षिण कोकण, मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडयात किमान तापमान सामान्यापेक्षा लक्षणीयरित्या कमी राहिले आहे. उत्तर कोकणात तापमान सामान्यांपेक्षा कमी असून उर्वरित भागांमध्ये ते साधारणपणे सामान्य पातळीवर आहे.

पुढील काही दिवसांचा हवामान अंदाज

Weather Update 2025 मध्य महाराष्ट्र मराठवाडा आणि विदर्भात पुढील काही दिवस हवामान कोरडे राहण्याची शक्यता आहे. कोकण गोवा मध्य महाराष्ट्र आणि मराठवाडा जिल्यामध्ये प्रामुख्याने सूर्यप्रकाशित हवामान राहणार आहे.

पुढील 24 तासांत राज्यातील कमाल तापमानात कोणताही मोठा बदल अपेक्षित नाही. त्यानंतर कमाल पातमां हळूहळू वाढण्याची शक्यता आहे. तसेच किमान तापमानही पुढील 24 तास स्थिर राहून त्यानंतर 2 ते 3 अंश सेल्सियसने हळूहळू वाढण्याचा अंदाज आहे.

WhatsApp Group Join Now

मुंबई पुणे परिसराचा अंदाज: Weather Update 2025

Weather Update 2025 मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पुढील 24 तास आकाश मुख्यतः निरभ्र राहील येथे कमाल तापमान 34 अंश सेल्सियस तर किमान तापमान 16 अंश सेल्सियस राहण्याची शक्यता आहे.

पुणे आणि आसपासच्या परिसरात थंडीचा प्रभाव जाणवणार असून पुण्यात कमाल तापमान 29 अंश आणि किमान तापमान 9 अंश सेल्सियस राहण्याचा अंदाज आहे.

मच्छिमारांसाठी इशारा: Weather Update 2025

खोल समुद्रासाठी आणि काही किनारपट्टी भागांसाठी हवामान विभागाने इशारा जरी केला आहे. मन्नारच्या आखातात आणि लगतच्या कोमोरीन भागात 35 ते 45 किमी प्रतितास वेगाने वारे वाहण्याची शक्यता असल्याने मच्छिमारांनी या भागात मासेमारीसाठी जाणे टाळावे असा सल्ला देण्यात आला आहे.

दरम्यान वाढलेल्या थंडीमुळे लहान मुले जेष्ठ नागरिक आणि शेतकऱ्यांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. थंडीची तीव्रता लक्षात घेता पुढील काही दिवस उबदार कपडे वापरणे आणि आरोग्याची दक्षता घेणे आवश्यक असल्याचे तज्ज्ञांनी सांगितले आहे.

शेतकऱ्यांसाठी सल्ला:

गहू, हरभरा, ज्वारी यांसारख्या पिकांमध्ये थंडीमुळे वाढ मंदावू शकते.

सकाळी दव जास्त असल्यास रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो त्यामुळे पिकांची नियमित पाहणी करावी, असा सल्ला देण्यात आला आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment