Wheat Intercropping 2025 महात्मा फुले कृषी विद्यापीठाने जिरायत गव्हाची पेरणी ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवड्यात, बागायती गव्हाची नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर उशिराने म्हणजेच 15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर पर्यंत करण्याची शिफारस केली आहे.

Wheat Intercropping 2025 पेरणी 15 नोव्हेंबर नंतर उशिरा केल्यास प्रत्येक पंधरवड्यात एकरी 1 क्विंटल उत्पादन कमी येते. त्यामुळे 15 डिसेंबर नंतर पेरलेला गव्हाची लागवड फायदेशीर ठरत नाही तरीदेखील खरिपातील कांदा, ऊस काढणीनंतर शेतकरी मोठ्या प्रमाणात गव्हाची पेरणी करतात. प्रस्तुत लेख गव्हाचे पाणी व्यवस्थापन व अंतर मशागत कसे करावे याबाबत उवापोह केला आहे.
यंदाच्या हंगामात 19 लाख टन सोयाबीन हमीभावने खरेदी करणार, पणन मंत्र्यांची माहिती!!
पाणी व्यवस्थापन: Wheat Intercropping 2025
भारी जमिनीकरता 18 दिवसांच्या अंतराने 6 पाण्याच्या पाळ्या द्याव्यात. मध्यम जमिनीसाठी 15 दिवसांच्या अंतराने 7 पाळ्या द्याव्यात. तर हलक्या जमिनीत 10 ते 12 दिवसाच्या अंतराने 8 ते 10 पाळ्या द्याव्यात. परंतु पीक वाढीच्या महत्त्वाच्या अवस्था व या अवस्थेत पाण्याचा ताण पडल्यास उत्पादनावर होणारे परिणाम खाली नमूद केले आहेत.

मुकुटमुळे फुटण्याच्या वेळी (पेरणीनंतर 21-25 दिवसांनी)
यावेळी जमिनीत पाण्याची उपलब्धता कमी असल्यामुळे मुकुट मुळे कमी फुटतात. फुटलेल्या मुळ्या जास्त पसरत नाहीत फुटवे कमी येतात. गहू काढणीस लवकर येतो व उत्पादनात घट येते.
फुटवे फुटण्याची अवस्था (पेरणीनंतर 55-60 दिवसांनी)
ओंब्या कमी बाहेर पडतात बाहेर पडलेल्या ओंब्याची लांबी कमी होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.
पीक फुलोऱ्यास येणे (पेरणी नंतर 70-80 दिवसांनी) :
परागसिंचन कमी होऊन दाण्याची संख्या घटते व पर्यायाने उत्पादन घटते.
दाण्यात चिक भरण्याची वेळ (पेरणीनंतर 90-100 दिवसांनी):
या अवस्थेत दाणे पोसतात, त्यांचा आकार वाढतो. परंतु जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार लहान होतो व वजन कमी होते.
दाणे टणक होण्याची अवस्था (पेरणीनंतर 110 दिवसांनी):
या अवस्थेत जमिनीत ओलावा कमी असल्यास दाण्याचा आकार कमी होतो. दाण्यांवर सुरकुत्या पडून प्रत निकृष्ठ होते व पर्यायाने उत्पादनात घट येते.
ज्या शेतकऱ्यांकडे मुबलक प्रमाणात पाणी उपलब्ध नाही अशा परिस्तितीत पाण्याचे योग्य नियोजन करणे अत्यंत गरजेचे आहे. पाणी अपुरे असल्यास व एक ते पाच पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असल्यास पुढील प्रमाणे पाणी द्यावे.
- एकाच वेळी पाणी देणे शक्य असल्यास ते पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी द्यावे
- दोन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी पेरणीनंतर 21 ते 25 दिवसांनी व दूसरे 55-60 दिवसांनी द्यावे.
- तीन पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे पाणी 55-60 दिवसांनी, तर तिसरे पाणी 70-80 दिसवानी द्यावे.
- चार पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 21 ते 25 दिवसांनी, दुसरे 55-60 दिवसांनी, तर तिसरे 70-80 दिवसांनी द्यावे तर चौथे पाणी 90-100 दिवसांनी द्यावे.
- पाच पाणी देणे शक्य असल्यास पहिले पाणी 12 ते 25 दिवसांनी, दुसरे 40-45 दिवसांनी तर तिसरे 55-60 दिवसांनी, चौथे पाणी 70-80 दिवसांनी तर पाचवे 90-100 दिवसांनी द्यावे.
- अपुरा पाणी पुरवठा परिस्थितीत एक किंवा दोन पाणी देणे शक्य आहे. त्या क्षेत्रात नेत्रावती, एन आय 5439 व एच डी 2189 या वाणांचे पेरणी करण्याचे नियोजन हंगामाच्या सुरुवातीला करणे आवश्यक आहे. अशा रीतीने गव्हाचे पाणी व्यवस्थापन करावे.
आंतरमशागत: Wheat Intercropping 2025
पेरणीनंतर 21 ते 30 दिवसांनी एक खुरपणी आणि कोळपणी करून तणांचा बंदोबस्त करावा. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या साहाय्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकाची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.
गव्हात चांदवेल हरळी यासारख्या तणांचा प्रादुर्भाव होतो. त्याकरिता गरजेप्रमाणे एक किंवा दोन खुरपणी तसेच, कोळपणी करून जमीन मोकळी करावी. अंतरमशागतीमुळे तणांचा नाश होतो व जमिनीत ओलावा टिकून राहण्यास मदत होते. गहू पिकातील अरुंद पानांचे आणि रुंद पानांच्या तणनियंत्रणासाठी पेरणीनंतर 30 ते 35 दिवसांनी दर हेक्टरी आयसोप्रोट्युरॉन (50%) 2 ते 3 किलो किंवा मेटासल्फ्युरॉन मिथाईल (20%) हेक्टरी 20 ग्रॅम किवा 2,4 डी (सोडियम) अधिक 2% युरिया 600 ते 1250 ग्रॅम 600 ते 800 लिटर पाण्यातून मिसळून गव्हाच्या दोन ओळीत फवारावे. तणनाशक फवारल्यानंतर 10 ते 12 दिवस पाणी देऊ नये. तणनाशकच्या फवारणीसाठी फ्लॅटफॅन किंवा फ्लडजेट नोझल वापरावे. तसेच, फवारणीसाठी साधा नॅपसॅक पंप वापरावा. पॉवर स्प्रे वापरू नये.
खुरपणी नंतर द्या उर्वरित नत्राची मात्रा: Wheat Intercropping 2025
बागायती वेळेवर पेरलेल्या गव्हास खुरपणी झाल्यानंतर (सर्वसाधारणपणे 21-30 दिवसांनी) प्रति हेक्टरी 60 किलो नत्र (130 किलो युरिया) बागायती उशिरा पेरलेल्या गव्हास प्रती हेक्टरी 40 किलो नत्र (87 किलो युरिया) द्यावा.
पीक 55 ते 70 दिवसांचे असताना 19:19:19 या विद्राव्य खताची दोन टक्के या प्रमाणे दोन वेळा फवारणी करावी. (10 लिटर पाण्यात 200 ग्रॅम 19:19:19)
दाणे भरण्याच्या अवस्थेत दोन टक्के युरियाची फवारणी करावी. (10 ली पाण्यात 200 ग्रॅम युरिया)
गव्हाची उशिरा पेरणी: Wheat Intercropping 2025
गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी (15 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर) निफाड 34 (एनआयडब्ल्यू -34), एकेएडब्ल्यू-4627 किंवा फुले समाधान (एनआयडब्ल्यू 1994) या सरबती जातींची लागवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यासह दोन चाड्याच्या पाभरीने एकेरी पद्धतीने 18 सेमी अंतरावर पेरावे. पेरणी करतेवेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (40:40:40) म्हणजेच 87 किलो युरिया, 250 किलो सिंगल सुपर फॉस्फेट व 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे.
उर्वरित नत्राचा हप्ता 87 किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठ्वड्यानी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा. गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी. तसेच प्रति किलो बियाण्यास प्रत्येकी 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व पीएसबी या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी. पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 सेमी खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते.
पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूंनी न करता ती एकेरी करावी, म्हणजे अंतरमशागत करणे सोयीचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दाबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पाडावेत.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |