Winter and Animal Health 2025 उन्हाळा, हिवाळा, पावसाळा अश्या प्रत्येक ऋतूमध्ये जनावरांच्या समस्या वेगवेगळ्या असतात. त्याचप्रमाणे हिवाळ्यात सुद्धा जनावरांच्या शरीरावर त्याचे विपरीत परिणाम दिसून येतात. हे टाळण्यासाठी हवामानानुसार जनावरांच्या व्यवस्थापनामध्ये बदल करणे गरजेचे असते. अतिथंडीचा जनावरांच्या शरीरावर आणि पर्यायाने उत्पदानातही अनिष्ट परिणाम दिसून येतो. त्यामुळे जनावरांना थंडीपासून वाचवणे खूप गरजेचे आहे.

अतिथंडीमुळे जनावरांवर होणारे दुष्परिणाम:
Winter and Animal Health 2025 दुधाळ जनावर हिवाळ्यात पान्हा व्यवस्थित सोडत नाही त्यामुळे दूध उत्पादनात घट होऊन दुधाच्या प्रतीवरही परिणाम होतो.
लहान वासरांना फुफुसदाहापासून संरक्षण मिळावे याकरिता थंडीच्या काळात लहान वारसरांकरिता गोणपाटीची झूल बांधल्याने त्यांना उबदार वाटते.
करा काजू पालवीचे संरक्षण!!
Winter and Animal Health 2025 थंडी जास्त असल्याने जनावरे पाणी कमी पितात त्यामुळे त्यांची पचनसंस्था व्यवस्थित काम करत नाही. शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे.
हिवाळ्यात जनावरांच्या त्वचेला भेगा पडतात. त्यामुळे त्वचा खरबडीत होते व खाज सुटते म्हणून त्यांच्या त्वचेला एरंडीचे तेल किंवा पेट्रेलियम जेली लावावे जेणेकरून वाचा नरम राहील व भेगा पडणार नाहीत.
अतिथंडीत सडावर भेगा पडून दुध काढताना रक्त येते. अतिथंडीमुळे जनावरांचे स्नायू आखडतात किंवा काही जनावरे लंगडतात शेळ्यांचे करडे आणि गाई म्हशींची वासरं अतिथंडीमुळे गारठून मृत्युमुखी पडतात.

उपाययोजना: Winter and Animal Health 2025
थंडी वाढू लागल्यास जनावरे प्रथमतः गोठ्यात बांधावीत. बाहेरील थंड हवा आत येणार नाही याची काळजी घ्यावी. गोठ्याच्या खिडकीशी रिकाम्या पोत्यांचे किंवा गोणपाटाचे पडदे लावावेत. हे पडदे रात्रभर किंवा जास्त थंडीमुळे बंद ठेवावेत व सकाळी 9 ते सायंकाळी 5 पर्यंत उघडे ठेवावेत.
जनावरांना थंडीत मुक्त संचार गोठ्यामध्ये ठेऊ नये. गोठ्यामध्ये जनावरांना उब मिळेल यासाठी प्रयत्न करावेत. उबदारपणासाठी गोठ्यात जास्त व्हॅटचे बल्ब लावावेत व शक्य असेल तर इलेक्ट्रिक हिटर लावावे. सायंकाळी शेडमध्ये थंड हवेचा पिलांशी प्रत्यक्ष संपर्क येणार नाही याची काळजी घ्यावी.
Winter and Animal Health 2025 जनावरांना गोठ्यामध्ये बसण्यासाठी भाताचे किंवा गव्हाचे काड, भुसाच्या सहाय्याने गादी तयार करावी.
जनावरांना थंडीच्या काळात दुपारी ऊन असताना गरम-कोमट पाण्याचा वापर करून धुवावे. सकाळचे व सायंकाळचे ऊन गोठ्यात येईल अशी रचना गोठा बांधताना करावी.
सडाची त्वचा मऊ राहावी, भेगा पडू नये म्हणून ग्लिसरीनचा किंवा पेट्रिलियम जेलीचा वापर करावा. दूध दोहनावेळी कास धुण्यासाठी गरम कोमट पाण्याचा वापर करावा.
हिवाळ्यात शारीरिक तापमान संतुलित ठेवण्यासाठी जास्त प्रमाणात ऊर्जा खर्च होत असल्याने, जनावरांना जास्त ऊर्जा मिळेल असे खाद्य द्यावे. जनावरांच्या खाद्यामध्ये खनिज मिश्रणाचा समावेश करावा. पिण्याचे पाणी स्वच्छ असावे. जनावराने व्यवस्थित पान्हा सोडण्यासाठी कास धुण्यासाठी आणि वासरांना धुण्यासाठी कोमट पाण्याचा वापर करावा.
हिवाळ्यात पाणीही थंड असल्यामुळे जनावर पाणी कमी पिते. जनावरे भरपूर पाणी प्यावेत, यासाठी कोमट पाणी उपलब्ध करून द्यावे. शक्यतो दुपारच्या वेळी जनावरांना उन्हात राहता येईल अशी सोय करावी व दुपारच्या वेळेस जास्तीत जास्त पाणी पिण्यास द्यावे.
अति थंडीमुळे बहुवर्षीय चार पिकांची वाढ हळूहळू होते या काळात लसूणघास, बरसीम किंवा चवळी या हिवाळ्यात वाढणाऱ्या पिकांची लागवड करून चार उत्पादन करावे. आहारात कडबा किंवा मुरघासाचा वापर करावा.
Winter and Animal Health 2025 गोठ्यातील सांडलेले पाणी, मूत्र निघून जावे यासाठी गोठ्यातील जमिनीला उतार देऊन नाली काढावी व गोठा कोरडा करावा. सकाळचे व सायंकाळचे ऊन गोठ्यात येईल अशी गोठ्याशी रचना करावी.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |