Cashew Seedlings 2025 जागतिक पटलावर भारत हा काजूचे सर्वाधिक उत्पादन घेणारा देश म्हणून ओळखला जातो. महाराष्ट्रमध्ये काजू लागवड 191.45 लक्ष हेक्टर क्षेत्रावर असून त्यापासून 269.44 मॅट्रिक टन उत्पादन घेण्यात येते.

Cashew Seedlings 2025 काजू पिकातील उत्पादन कमी होण्यास हवामानातील बदल, कीड-रोग व लागवडीनंतर घ्यावयाची काळजी ही महत्त्वाची कारणे आहेत. सध्या बहुतांशी ठिकाणी नवीन पालवी येण्यास सुरुवात झाली असून पालवी वरील कीड-रोगांचा प्रादुर्भाव वाढू शकतो. अशा परिस्थितीत बागेचे दररोज सर्वेक्षण करून काजू पिकाच्या पालवीवर प्रादुर्भाव करणाऱ्या कीड-रोग याबाबत थोडक्यात माहिती घेणार आहोत.
भीमाशंकर साखर कारखान्याचा पहिला हप्ता जाहीर, किती रुपयाने होणार पहिले पेमेंट?
पालवीवर आढळणाऱ्या प्रमुख किडी:
ढेकण्या (टी मॉस्किटो बग):
नुकसानीचा प्रकार: या किडीचे पिल्ले व प्रौढ ढेकूण कोवळी पालवी, देठ, पाने यांच्यामधून रस शोषून घेतात व त्याचवेळी सोंडेद्वारे लाळेतून विषारी पदार्थ आत सोडतात. त्यामुळे प्रादुर्भाव झालेल्या ठिकाणी पांढरे ठिपके पडतात, नंतर ते वाढत जाऊन प्रादुर्भावग्रस्त भाग काळा पडतो. मोठ्या प्रमाणावर प्रादुर्भाव झाल्यास पालवी पूर्णपणे वाळून जाते. त्यामुळे मोहोर येण्याच्या प्रक्रियेवर परिणाम होतो. या किडीचा प्रादुर्भाव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोवळी पालवी फुटल्यावर सुरू होतो तो जानेवारी-फेब्रुवारी महिन्यापर्यंत वाढतो.

व्यवस्थापन: या किडीच्या नियंत्रणासाठी बागेत पुरेसा सूर्यप्रकाश राहील, अशाप्रकारे फांद्यांची विरळणी करावी. बागेतील रानमोडी तणांचे समूळ उच्चाटन करावे, कारण पर्यायी यजमान वनस्पती ढेकण्या किडीचा जीवनक्रम पूर्ण करण्यास मदत करते. वेळोवेळी बागेचे सर्वेक्षण करून किडीने आर्थिक नुकसानीची पातळी (5 टक्के प्रादुर्भाव) ओलांडल्यावर फवारणी करावी. ढेकण्या पिल्यांच्या अवस्थेत असतानाच कीटकनाशकांची फवारणी करावी.
कोवळ्या पोपटी रंगाच्या पालवीवर फवारणीसाठी 36 टक्के प्रवाही मोनोक्रोटोफॉस 15 मिली किंवा 5 टक्के प्रवाही लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 6 मिली. किंवा ऍसिटामीप्रिड 20 टक्के पाण्यात विरघळणारे पावडर 5 ग्रॅम किंवा 50 टक्के प्रवाही प्रोफेनोफॉस 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. जैविक कीटकनाशक लिकॅनी या बुरशीचा 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
फुलकिडी: Cashew Seedlings 2025
नुकसानीचा प्रकार: या किडीचा प्रादुर्भाव कोकण विभागात दिवसेंदिवस वाढू लागला आहे या किडीचा प्रादुर्भाव प्रथम कोवळी पालवे पानांच्या देठावर तसेच मोहोराचा देठ, कोवळ्या बिया व बोंडू यावर आढळून येतो. पूर्ण वाढ झालेली कीड व पिल्ले कोवळ्या पालवीवरील साल खरवडतात व त्यामधून बाहेर येणारा रस शोषून घेतात. त्यामुळे प्रादुर्भावित ठिकाणी भुरकट रंगाचे चट्टे पडतात. पानांच्या कडा तसेच शेंडे करपतात. पाने वेडीवाकडी होतात. प्रादुर्भाव जास्त झाल्यास पानगळ होऊन फक्त शेंडेच शिल्लक राहतात.
व्यवस्थापन: 5 % प्रभावी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 6 मिली. किंवा ऍसिटामीप्रिड 20 टक्के पाण्यात विरघळणारे पावडर 5 ग्रॅम किंवा 50 टक्के प्रवाही प्रोफेनोफॉस 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी. जैविक कीटकनाशक लिकॅनी या बुरशीचा 5 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करावी.
पाने पोखरणारी अळी: Cashew Seedlings 2025
अलीकडच्या काळात कोवळ्या पालवीवर पाने पोखरणाऱ्या किडींचा प्रादुर्भाव दिसून येत आहे. या किडीची मादी कोवळ्या पालवीवर पानाच्या वरच्या बाजूला अंडी घालते अळ्या बाहेर आल्यानंतर पानांचा आतील भाग पोखरून खातात. त्यामुळे सुरुवातीला कोवळ्या पालवीवर वेडीवाकडी वळणे दिसतात. कालांतराने पानांवर पांढरा पापुद्रा झालेला दिसतो व पाने वाळतात. त्यामुळे प्रकाश संश्लेषणाचे कार्य थांबते. या किडीमुळे कोवळ्या पालवीचे नुकसान होते. या किडीचा प्रादुर्भाव ऑगस्ट-डिसेंबर दरम्यान आढळतो पण सर्वाधिक प्रादुर्भाव ऑक्टोबर-नोव्हेंबर महिन्यात कोवळ्या पालवीवर दिसून येतो.
व्यवस्थापन: 5 % प्रभावी लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 6 मिली. किंवा 50 टक्के प्रवाही प्रोफेनोफॉस 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून यापैकी कुठल्याही एका कीटकनाशकाची फवारणी करावी.

पालवीवरील प्रमुख रोग:
करपा: Cashew Seedlings 2025
कोलेटोट्रिकम ग्लाईओस्पोरिऑइड्स नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. रोगाचा प्रादुर्भाव कोवळी पाने, फांद्या, मोहोर, बिया इ. आढळतो. रोगग्रस्त भागावर फिकट तांबूस रंगाचे ठिपके दिसतात. कालांतराने ठिपके वाढत जाऊन रोगग्रस्त भाग वाळून जातो. रोगग्रस्त पाने आकसतात, तर कोवळ्या बिया वाळून जातात.
शेंडे कुजणे व पानगळ: Cashew Seedlings 2025
फायटोप्थोरा निकोटीन नावाच्या बुरशीमुळे हा रोग होतो. पावसाळ्यात फांद्यावर सरळ रेषेत काळे ठिपके आढळतात आणि त्यातून डिंक बाहेर पडतो. कालांतराने हे ठिपके एकमेकांत मिसळून शेंड्यावरील कोवळी पाने सुकून जातात. पक्व (जून) पानांवर मुख्य शिरेवर रोगाचा पादुर्भाव दिसून येतो आणि पसरत जातो. त्यामुळे पानगळ होते.
व्यवस्थापन: वरील दोन्ही रोगांच्या नियंत्रणासाठी खालील उपाययोजना करावी. दाट लागवडीमध्ये रोगाचा प्रादुर्भाव जास्त आढळतो. त्यामुळे घन लागवड करू नये.
पावसाळापूर्वी आणि पावसाळ्यानंतर संपूर्ण झाडावर 1 टक्का बोर्डोमिश्रण द्रावणाचे दोन वेळा फवारणी करावी. पावसाळ्यात उघडीप पाहून कार्बनडिझम 1 टक्का किंवा बोर्डोमिश्रण 1 टक्के किंवा मॅन्कोझेब 2 टक्के या बुरशीनाशकाच्या दोन-तीन फवारण्या गरजेनुसार कराव्यात.
रोगग्रस्त पाने, फांद्या, शेंडे, कापून रोगग्रस्त भाग स्वच्छ करून अवशेष जाळून नष्ट करून कापलेल्या भागावर बोर्डोपेस्ट लावावी.
पानांवरील विविध टिपके ठिपके: Cashew Seedlings 2025
काजू झाडाच्या पानांवर विविध आकाराचे आणि भिन्न रंगाचे ठिपके आढळतात. त्यात प्रामुख्याने करडे, लाल, व तपकिरी रंगाचे ठिपके दिसून येतात. हे ठिपके वेगवेगळ्या प्रकारच्या बुरशींच्या प्रादुर्भावामुळे होतात. त्यात प्रामुख्याने कोलेटोट्रिकम ग्लायोस्पोरिऑइड्स, पेस्टलेशिया स्पेसिस, फायलेस्टीका स्पेसिस, फोमोप्सिस स्पेसिस, इ. बुरशीमुळे होतात.
व्यवस्थापन: रोगग्रस्त झाडांवर कॉपर ऑक्सिक्लोराईड 3 टक्के किंवा बोर्डोमिश्रण 1 टक्के या बुरशीनाशकाची फवारणी करावी.

आर्थिक नुकसानीची संकेत पातळी
| कीड/ रोग | पीक अवस्था | आर्थिक नुकसानीची पातळी |
| ढेकण्या | कोवळी पालवी मोहोर व फळधारणा | 5% प्रादुर्भाव |
| फुलकिडी | मोहोर व फळधारणा अवस्था | 10 फुलकिडी पाळावी मोहोर व फळावर |
| करपा | कोवळी पालवी व मोहोर अवस्था | 10 % प्रादुर्भाव |
टीम:
- उपरोक्त कीटकनाशके व लेबल क्लेम नाहीत शेतकऱ्यांनी ती स्वतःच्या जबाबदारीवर फवारणीकरता वापरावीत.
- परागीकरण करणारे कीटक तसेच मित्र कीटकांना हानी पोहोचणार नाही याची शक्यतो फवारणी करताना काळजी घ्यावी.
- फवारणी करताना सुरक्षिततेची काळजी घ्यावी.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |