रब्बी पिकातील खत व्यवस्थापन!! Fertilizer Management 2025

Fertilizer Management 2025 रब्बी हंगामात घेण्यात येणाऱ्या विविध पिकाचे एकात्मिक व्यवस्थापन करून किफायतशीर उत्पादन घेण्यासाठी पीक व्यवस्थापनातील खत व्यवस्थापन हा एक महत्त्वाचा घटक आहे. शेती उत्पादनाची उच्चतम पातळी गाठण्यासाठी तसेच उत्पादनात सातत्य राखण्यासाठी जमिनीचे आरोग्य उत्तम असणे आवश्यक आहे. वनस्पतीची निरोगी व पूर्ण वाढ होण्यासाठी 17 अन्नद्रव्यांची गरज असते. आपण सर्व पिके जमिनीच्या माध्यमातून घेत असतो त्यामुळे अन्नद्रव्यांचा पुरवठा करण्याची जबाबदारी जमिनीवर पडते.

Fertilizer Management 2025

Fertilizer Management 2025 बहुसंख्य पिकांना लागणाऱ्या आवश्यक्य अन्नद्रव्यांचा पुरवठा बहुदा अपूर्ण असतो. परंतु खत व्यवस्थापन करताना खताचे नियोजन व वापर हा पूर्णतः शास्त्रीय दृष्टिकोनातून करणे ही सध्याची गरज आहे. रासायनिक खताचा कार्यक्षम वापर होण्यासाठी आणि पोषक द्रव्य हवेद्वारे किंवा निचऱ्याद्वारे वाया जाऊ नये. म्हणून खत व्यवस्थापनातील काही महत्त्वाच्या गोष्टींचा अवलंब करणे आवश्यक आहे. त्या म्हणजे खताची निवड, मात्रा, वेळ आणि खत देण्याची पद्धती इ.

ऊस पिक नियोजन!!

Fertilizer Management 2025 रासायनिक खतांच्या किमती खूप वाढल्याने त्यावरील खर्चात बचत करण्याच्या दृष्टीने खताची कार्यक्षमता कशी वाढेल याकडे लक्ष देणे गरजेचे आहे. रासायनिक खते योग्यवेळी व योग्य पद्धतीने दिली गेली नाही, तर त्याची कार्यक्षमता कमी होऊन खतांवरील खर्च वाढतो व पीक उत्पादनात घट येते. एकात्मिक खत व्यवस्थापनामध्ये प्रामुख्याने सेंद्रिय खते, जैविक खते, रासायनिक खते, (मुख्य दुय्यम व सूक्ष्म अन्नद्रव्यांचे पुरविणारे) यांचा समावेश होतो.

WhatsApp Group Join Now

Fertilizer Management 2025 खत व्यवस्थापनामध्ये सेंद्रिय खतांना अनन्यसाधारण महत्त्व आहे. सेंद्रिय खत वापरामुळे जमिनीच्या भौतिक, रासायनिक व जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. आपल्या जमिनीचे आरोग्य दीर्घकाळ टिकवणे व उत्पादनात सातत्य या दोन गोष्टी केवळ आणि केवळ सेंद्रिय खते व रासायनिक खते यांच्या एकात्मिक वापरामुळे शक्य आहे. सेंद्रिय खत व्यवस्थापन करत असताना आपण शेणखत, गांडूळ खत, कंपोस्ट खत, इ. खतांचा वापर करू शकतो.

एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाचा दुसरा महत्त्वाचा घटक हा जैविक खते हा आहे. जैविक खतांचे प्रकार व कार्य वेगवेगळे आहेत. उदा. नत्र स्थिरीकरण करणारे (ऍसिटोबॅक्टर, रायझोबियम, असोस्पिरिलम) स्फुरद विरघळविणारे (पीएसबी) पालाश उपलब्ध करून देणारे गंधक, जस्त, लोह उपलब्ध करणारे इ. जैविक करते हे घनस्वरूपात किंवा द्रव स्वरूपात उपलब्ध आहे.

तसेच जैविक खत हे वेगवेगळे किंवा एकत्रित स्वरूपात सुद्धा उपलब्ध आहेत. जैविक खते आपण बीज प्रक्रियेद्वारे शेणखतात मिसळून किंवा ठिबक सिंचनातून देऊ शकतो. जैविक खतांच्या वापरामुळे उत्पादनात 15 ते 30 टक्के वाढ होते व जमिनीचे जैविक गुणधर्म सुधारण्यास मदत होते. याचबरोबर अन्नद्रव्यांची कार्यक्षमता वाढून जमिनीतील अन्नद्रव्यांची पिकास उपलब्ध होण्यास मदत होते. एकात्मिक अन्नद्रव्यांचे व्यवस्थापन करत असताना तिसरा महत्त्वाचा घटक म्हणजे रासायनिक खतांचा वापर.

WhatsApp Group Join Now

Fertilizer Management 2025 रासायनिक खतांचा वापर करताना रासायनिक खतांची जमिनीुसार देण्याची वेळ, मात्रा व खते देण्याची पद्धती इ. बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.

रासायनिक खतांची मात्रा आपणास वेगवेगळ्या पद्धतीने ठरवता येते. यामध्ये प्रामुख्याने माती परीक्षण अहवालानुसार कृषी विद्यापीठाच्या शिफारशीत खत मात्रेवर किंवा पाने व देठ परीक्षण करून खत मात्रा ठरवता येते. माती परीक्षणानुसार खत व्यवस्थापन करताना शिफारशीत खत मात्रेत आवश्यक बदल करणे गरजेचे असते. अन्नद्रव्यांचे प्रमाण, स्तर व रासायनिक खत मात्रेत करावयाचे बदल हे खालील तक्त्यानुसार करावेत.

मृद परीक्षणावर आधारित जमिनीतील उपलब्ध अन्नद्रव्ये स्तर आणि शिफारसीत मात्रेत करावयाच्या बद्दल

अन्नद्रव्यांचे स्तर नत्रस्फुरदपालाश शिफारशीत अन्नद्रव्यांचे मात्रेत करावयाच्या बद्दल
कमी25010150शिफारसीत अन्नद्रव्यांची मात्रा 25 टक्के जास्त घ्यावे.
मध्यम250-50010-25150-300शिफारसी अन्नद्रव्यांची मात्रा घ्यावी.
अधिक50025300शिफारसीत अन्नद्रव्याची मात्रा 25 टक्के कमी घ्यावी.

अन्नद्रव्याचे व्यवस्थापन करत असताना जर माती परीक्षण केलेले नसेल तर रासायनिक खतांची मात्रा ठरविताना कृषी विद्यापीठाने शिफारस केलेल्या खत मात्रा याचा वापर केला जातो. ही खत मात्रा पिकांनुसार वेगवेगळे असते.

Fertilizer Management 2025 माती परीक्षण अहवालामध्ये सूक्ष्म अन्नद्रव्यांची जमिनीत कमतरता आढळून आल्यास कमतरता असलेली अन्नद्रव्ये ते अन्नद्रव्य पुरवणाऱ्या खताद्वारे शिफारसी प्रमाणे द्यावीत. सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारे खते जमिनीतून द्यावयाची झाल्यास ती शेणखत, कंपोस्ट खत, अथवा गांडूळ खतासोबत दिल्यास परिणामकारक ठरतात. सूक्ष्म अन्नद्रव्य पुरवणारी खते इतर रासायनिक खतांमधून मिसळून देऊ नये. फवारणीद्वारे सूक्ष्म अन्नद्रव्य खते देताना योग्य तीव्रतेचे द्रावण वापरावे.

रब्बी पिकासाठी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापन करताना खत वापरासंबंधी घ्यावयाची काळजी:

  1. शेणखत/ कंपोस्ट खत/ गांडूळ खत वापरताना ते चांगले कुजलेले असावे, अन्यथा सेंद्रिय खतांमधून तणांचा प्रादुर्भाव होतो. तसेच अर्धवट कुजलेले सेंद्रिय खत वापरल्यास सुरुवातीच्या काळात पीक वाढीवर विपरीत परिणाम होतो.
  2. जैविक खतांची बीजप्रक्रिया बुरशीनाशकाच्या बीजप्रक्रियेनंतर करावी. बीजप्रक्रिया करताना घनस्वरूपात जैविक खते असल्यास गुळाचा वापर केल्यास जिवाणू खत बियांना चिटकते.
  3. नत्रयुक्त खते विशेषतः युरिया खत वापरताना विशेष काळजी घ्यावी. पाण्याद्वारे ऱ्हास टाळण्यासाठी युरिया खत विभागून घ्यावे. यामुळे नत्रखताची कार्यक्षमता वाढण्यास मदत होते. तसेच आवरणयुक्त युरिया खताचा (निम कोटेड) वापर करावा.
  4. क्षारयुक्त तसेच चुनखडीयुक्त जमिनीत युरिया खत जमिनीवर टाकू नये. यामुळे युरियाचा वायुरूपात ऱ्हास होतो.
  5. चुनखडीयुक्त जमिनीत सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी स्फुरदासाठी वेगळ्या स्त्रोताचा डायअमोनियम फॉस्फेट वापर करावा.
  6. सर्व अन्नद्रव्यांचा शिफारसीप्रमाणे संतुलित वापर करावा. अन्नद्रव्यांचा असंतुलित वापर केल्यास एका अन्नद्रव्याच्या जास्त वापरामुळे दुसऱ्या अन्नद्रव्याच्या उपलब्धतेवर परिणाम येतो.
  7. स्फुरदासाठी सिंगल सुपर फॉस्फेट ऐवजी डाय अमोनियम फॉस्फेट चा वापर केल्यास तेलबिया पिकांची गंधकाची गरज भागवण्यासाठी गंधकाचा वापर करावा.
  8. विद्राव्य खते फवारणीद्वारे देताना योग्य तीव्रतेचे द्रावण वापरावे तीव्रता वाढल्यास पिकांची पाने करपतात.

वरील सर्व बाबींचा विचार करून खत व्यवस्थापन केल्यास रब्बी पिकाचे उत्पादन वाढण्यास निश्चितच मदत होईल.

इतर माहितीसाठीयेथे क्लिक करा

Leave a Comment