Lemon Market 2025 जळगाव: लिंबू आगारापैकी एक असलेल्या भडगाव तालुक्यातील गुढे गावातील लिंबू उत्पादक शेतकऱ्यांवर यावर्षी अभूतपूर्व आर्थिक संकट ओढवले आहे. जुलैपासून लिंबाच्या भावात मोठी घसरण होत आहे. शेतकऱ्यांना प्रति किलो केवळ 5 ते 15 रुपये इतकाच दर मिळत आहे.

Lemon Market 2025 मजुरी, वाहतूक, फवारणी, खत इत्यादी खर्चही भरून निघत नसल्याने अनेक शेतकऱ्यांचे लिंबू शेतातच पडून आहेत. गुढे गावातून दररोज 4 ते 5 ट्रक लिंबू सुरत, नाडियाद तर 3 ते 4 ट्रक हे महाराष्ट्रातील विविध शहरात पाठवले जातात.
घोणस अळी किंवा डंख अळी व्यवस्थापन!!
एक कॅरेटमागे दीडशे रुपये खर्च Lemon Market 2025
लिंबू तोडण्यासाठी प्रति कॅरेट 50 ते 60 रुपये मजुरी, तर सुरत मार्केटपर्यंत वाहतूक 100 रुपये एवढा खर्च येतो. खत, औषधी फवारणी यांचा खर्चब वेगळाच. एका कॅरेटचा खर्च 150 ते 180 रुपये होतो. गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये लिंबाला 50 ते 70 रुपये किलो दर होता. सुरत बाजारात एका 30 किलोच्या कॅरेटला 1000 ते 1400 रुपये दर मिळत होता. यावर्षी तोच माल 100 ते 300 रुपये कॅरेट या दरात विकला जात आहे.

गावात चार खासगी लिंबू खरेदी केंद्र
Lemon Market 2025 गुढे गावातील चार खासगी दुकानात सध्या 2 ते 11 रुपये किलो असा दर मिळतो. स्थानिक दुकानदार लिंबू घेऊन तात्काळ पैसे देतात. मात्र, सुरतमार्गे माल पाठवला, तर तिसऱ्या दिवशी पेटी मिळते.
गुढे व परिसरात मोठ्या प्रमाणात लिंबाचे उतपादन होते. पण त्याला योग्य दर मिळत नाही. भडगाव शेतकरी संघामार्फत शासकीय दराने लिंबू खरेदी करण्याचा प्रयत्न करण्यात येईल. पावसाळा आणि हिवाळ्यात लिंबूला खूपच कमी भाव मिळतो, म्हणून गुढे लिंबू प्रक्रिया उद्योग उभारण्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करावा.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |