Slug Caterpilar or Stingworm 2025 सध्य परिस्थितीत घोणस अळी चावा घेत असल्याची अफवा पसरल्याने शेतकरी व शेतमजूर बांधवांमध्ये कमालीची भीती पसरली असल्याचे दिसून येत आहे. तथापी सदर किडी बदल सविस्तर माहिती जाणून घेतल्यास या अळीचे व्यवस्थापन करणे सहज शक्य असल्याचे लक्षात येते.

Slug Caterpilar or Stingworm 2025 या अळीस इंग्रजी मध्ये ‘स्लग कॅटरपिलर’ तर ग्रामीण भागात घुले/ घोणस अळी असे म्हंटले जाते. हि पतंगाच्या (लिमकोडीडे) प्रजातीला एक बहुभक्षी कीड असून सर्वसाधारणपणे आंबा, नारळ, तेलताड, एरंडी, लिंबूवर्गीय फळे, बांधावरील गवत, शोभेच्या वनस्पती व विशेषतः देशी बदाम इ. वर तुरळक प्रमाणात आढळते. असे असले तरी एखाद्या परिसरामधील पिकावर या किडीचा प्रादुर्भाव जास्त प्रमाणात झाल्यास, पिकाच्या पानांचा हिरवा भाग खाऊन फक्त शिरा शिल्लक ठेवते.
‘या’ डिसेंबर महिन्यात सोयाबीनला सरासरी काय दर मिळतील?
जीवनक्रम: Slug Caterpilar or Stingworm 2025
या किडीचा जीवनक्रम अंडी, अळी, कोष व पतंग या चार अवस्थांतून पूर्ण होतो. मादी पतंग यजमान वनस्पतींच्या पानाच्या खालच्या बाजूस गोलाकार आकाराची, फिकट पिवळ्या रंगाची 10-15 अंडी, समूहात घालते. 2-4 दिवसात अंड्यातून अळ्या बाहेर पडतात. सुरुवातीच्या अवस्थेतील अळ्यांचा रंग पिवळसर हिरवट असून संपूर्ण शरीरावरती बारीक केस/ काटे असतात. पूर्ण वाढलेल्या अळ्या मोहक हिरव्या रंगाच्या असून त्यांच्या शरीरावर संरक्षणासाठी लाल रंगाचे विषारी काट्यांचे चार समूह पाठीकडील बाजूने पुढील व मागील भागात तयार झालेले असतात.

पूर्ण वाढलेल्या अळ्या छदामपादानी (स्यूडोलेगस) संथ गतीने चालतात व रेशमासारखा चकचकीत द्रव सोडतात व त्याच्या साहाय्याने वनस्पतीना घट्ट चिकटून राहतात. अळी अवस्थेचा कालावधी 30-40 दिवसाचा असतो. कोषावस्था करड्या रंगाच्या टणक रेशमी आवरणात 30-32 दिवसात पूर्ण होते. किडीचे पतंग हिरवट तपकिरी रंगाचे असतात. पुढील पंखाचा रंग हिरवा तपकिरी असतो. तर मागील पंख पिवळसर पांढऱ्या रंगाचे असतात. नर पतंग 2-4 दिवस तर मादी पतंग 5-8 दिवस जगते.
घोणस अळी बाबतीत गैरसमज व तथ्य:
Slug Caterpilar or Stingworm 2025 घोणस अळी नवीन कीड नसून आशिया व आग्नेय आशिया खंडातील देशांमध्ये (भारत, पाकिस्तान, इंडोनेशिया, म्यानमार, चीन, जपान, इत्यादी.) आढळणारे सर्वसामान्य प्रजाती आहे. शक्यतो पावसाळ्यात, पावसाच्या परतीला, उष्ण व अद्र हवामानात ही अळी दिसून येते. या अळीच्या अंगावर बारीक बारीक केस असतात. त्याखाली काही विष ग्रंथी असतात व या केसातून ते विशिष्ट रसायन किंवा विष त्यांच्या संरक्षणासाठी बाहेर टाकतात.
Slug Caterpilar or Stingworm 2025 घोणस अळी चावा घेते असे म्हणणे चुकीचे असून अळीच्या शरीरावरील संरक्षक विषारी काट्यांचा त्वचेशी संपर्क आल्यास दाह होतो, हलके जळजळणारे पुरळ उठतात किंवा खाज सुटते. अतिसंवेदनशील व्यक्तींना जास्त त्रास होतो संभावतो.
अळी कुठल्याही प्रकारे पाठलाग करत नाही. उलटपक्षी तिच्या थेंब्यासारख्या संथ चालण्याच्या सवयीमुळे व एकंदर फुगीर आकारामुळे तिला स्लग कॅटरपिलर असेही म्हटले जाते.
अळीच्या दंशाने अर्धांगवायू झाल्याची कुठलाही नोंद नाही. तथापी अळीच्या विषाच्या तीव्रतेमुळे काही कालावधीसाठी दंश झालेला भाग बधिर झाल्याने सदर गैरसमज पसरला असावा.
Slug Caterpilar or Stingworm 2025 घोणस अळीचा दंश झाल्याने मृत्यू होतो असे चित्र समाजामाध्यमातून बिंबवल्याचे काही ठिकाणी दिसून आले होते. शास्त्रीय दृष्ट्या त्याला कुठलाही आधार असल्याचे दिसून येत नाही.
घोणस अळीचे व्यवस्थापन करताना घ्यावयाची दक्षता:
| करू नये- | करावे- |
| अळीच्या नियंत्रणासाठी पिकावर सरसकट रासायनिक कीटकनाशकांची फवारणी टाळावी. | सुरुवातीच्या अवस्थेतील लहान अळ्या आढळल्यास, 5 टक्के निंबोळी अर्काची किंवा 1500 पीपीएम. 50 मिली प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून फवारावे. अळीच्या नियंत्रणासाठी सध्य परिस्थितीत शिफारशीत रासायनिक कीटकनाशके उपलब्ध नाहीत. तथापि इतर किडींच्या नियंत्रणासाठी वापरली जाणारी कीटकनाशके उदा. प्रोफेनोफॉस 50 इसी मिली. किंवा क्विनॉलफॉस 25 इसी. 30 मिली. किंवा क्लोरपायरीफॉस 20 इसी. 25 मिली. किंवा इमामेक्टीन बेन्झोएट 5 एस.जी. 4 ग्रॅम प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून अळ्या आढळून आलेल्या भागात फवारणी घेतल्यास चांगले नियंत्रण होते. |
| घोणस अळ्या आकर्षक रंगसंगती व फुगीर आकाराच्या असल्याने कुतूहलापोटी त्यांना स्पर्श करू नये. | शेतात काम करत असताना अशा अळ्या दिसून आल्यास त्यांचा स्पर्श काटाक्षाने टाळावा. त्याकरिता संरक्षक साधनांचा (हातमोजे, संपूर्ण बाह्यांचा अंगरखा इ.) वापर करावा. |
| घोणस अळीचा डंक झाल्यास घाबरू नये. | डंक झालेल्या जागी तात्काळ कागद चिकटविण्यासाठी वापरतो ती चिकटपट्टी हलक्या हाताने लावून परत काढून घ्यावी. यामुळे या अळीचे केस सहजपणे निघून जाऊन दाह कमी होण्यास मदत होते. |
| डंक झालेल्या ठिकाणी कुठलेही तेल किंवा मलम लावणे टाळावे. | ज्या ठिकाणी डंक झाला आहे त्या ठिकाणी बर्फ लावावा. खाण्याचा (बेकिंग) सोडा व पाण्याची पेस्ट करून लावल्यास तात्पुरते वेदनाक्षमण होते. |
| अतिवेदना होत असल्यास स्वतः औषध उपचार करू नयेत. | वेळ न दवडता जवळच्या तज्ञ वैद्यांकडून उपचार करून घ्यावे. |
| अफवा पसरवू नये. | अफवांना बळी पडू नये. |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |