Soyabean Market 2025 भारतात सण 2025-26 मध्ये सोयाबीनचे उत्पादन 100 लाख टन उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत 21 टक्क्यांनी कमी आहे. सण 2023-24 च्या तुलनेत सण 2024-25 मध्ये सोयाबीन तेलाच्या आयातीत तुलनेत 54 टक्क्यांनी वाढ आहे.

Soyabean Market 2025 सण 2023-24 च्या तुलनेत सण 2024-25 मध्ये सोयाबिन तेलाच्या आयातीत तुलनेत 54 टक्क्यांनी वाढ आहे. अमेरिकन कृषी विभागाच्या, (USDA, नोव्हेंबर 2025) अहवालानुसार सण 2025-26 मध्ये, जगात 4258 लाख टन सोयाबीनचे उत्पादन होण्याची शक्यता वर्तवली आहे. जे मागील वर्षीच्या तुलनेत 0.3 टक्केनी कमी आहे.
महावितरणकडून कृषीपंपासाठी नवीन धोरण, शेतकऱ्यांना मिळणार आता दिवसा वीज!!
Soyabean Market 2025 सण 2025-26 हंगामासाठी किमान आधारभूत किंमत 5 हजार 328 रुपये प्रति क्विंटल आहे. मागील वर्षीच्या तुलनेत चालू वर्षी सोयाबीनच्या किंमती कमी आहेत. मागील तीन वर्षातील डिसेंबर महिन्यातील सरासरी किंमती.

- डिसेंबर 2022 मध्ये 5 हजार 556 रुपये प्रति क्विंटल
- डिसेंबर 2023 मध्ये 4 हजार 831 रुपये प्रति क्विंटल
- डिसेंबर 2024 मध्ये 4 हजार 143 रुपये प्रति क्विंटल
लातूर बाजारातील सोयाबीनच्या संभाव्य किमती- डिसेंबर 2025: 4 हजार 515 ते 4 895 रुपये प्रति क्विंटल सदर संभाव्य किंमत अंदाज हा FAQ ग्रेडच्या सोयाबीनसाठी आहे.
सण 2024-25 मध्ये सोयाबीनच्या निर्यातीत मागील वर्षाच्या तुलनेत घट झाली आहे. सण 2023-2024 मध्ये 19.7 लाख टन सोयपेंड निर्यात झाली आहे. सण 2024-25 मध्ये निर्यात 18.0 लाख टन असून ती मागील वर्षाच्या तुलनेत कमी आहे.
-मा. बाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्पातील “बाजार माहिती विश्लेषण व जोखीम निवारण कक्षा अंतर्गत” शेतमालाच्या किंमतीचा अभ्यास करून नोहेंबर 2025 या कालावधीसाठी सोयाबीन पिकांचा संभाव्य किंमतीचा सुधारित अंदाज वर्तविला आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |