आंबट-गोड बोरांचा हंगाम सुरु, चमेली आणि चेकनेट बोरांना कसा मिळतोय दर? Bore BajarBhav 2025

Bore BajarBhav 2025 पुणे: गोड, आंबट चवीच्या बोरांना पर्यटनस्थळांसह शहर, उपनगरासह परराज्यांतून मागणी वाढली आहे. त्यामुळे बोरांच्या भावात 10 टक्क्यांनी वाढ झाली असल्याची माहिती मार्केटयार्डातील व्यापारी रवींद्र शहा यांनी दिली.

Bore BajarBhav 2025

यंदा सप्टेंबर महिन्याच्या पहिल्या आठवड्यात बोरांचा हंगाम सुरु झाला असून, तो फेब्रुवारी अखेरपर्यंत सुरु राहणार आहे.

शेतात ड्रोन उडवण्यासाठी आता परवानगीची गरज नाही, केंद्र सरकारने हा नियम केला शिथिल!! 

Bore BajarBhav 2025 सध्या मार्केटयार्ड फळबाजारात 300 पोत्यांची आवक होत असून हवेत गारवा वाढल्यामुळे थंड आणि रसदार फळे खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवली आहे. त्यामुळे बोरं खाण्यास नागरिक पसंती देत आहेत. त्यामुळे बोरांना मागणी वाढली आहे.

WhatsApp Group Join Now

Bore BajarBhav 2025 शहरातील व उतनगरातील किरकोळ विक्रेत्यांकडून खरेदी करण्याकडे कल वाढला आहे. याबरोबरच महाबळेश्वर, लोणावळा, सिंहगड, खंडाळासह विविध पर्यटनस्थळांवरून बोरांना मागणी आहे.

बोरांचा घाऊक बाजारातील दर्जानुसार 10 किलोंचा भाव

बोरांचा प्रकार: भाव (रुपयांमध्ये)

चमेली: 300-380

चेकनेट: 950-1100

उमराण: 80-120

WhatsApp Group Join Now

चन्यामन्या: 650-750

हवेत गारवा वाढल्यामुळे थंड आणि रसदार फळे खरेदीकडे नागरिकांनी पाठ फिरवल्याने सध्या बोरांना मागणी वाढली आहे. तसेच शहर उपनगरासह परराज्यातून मागणी वाढत आहे. त्यामुळे मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बोरांच्या दरात 10 टक्क्यांनी वाढ झाली आहे. -रवींद्र शहा, व्यापारी”

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment