Linseed Cultivation 2025 जवस हे एक गळीताचे धान्य असून रब्बी हंगामातील महत्वाचे पीक आहे. याला मराठीत अळशी तर संस्कृतमध्ये असली, अतसी अतसीका, हैमवती, नीलपुष्पी, उंची किंवा क्षुमा म्हणतात. भारतामध्ये मध्यप्रदेश या राज्यात क्षेत्र व उत्पन्न असून त्यापाठोपाठ अनुक्रमे उत्तरप्रदेश, महाराष्ट्र, बिहार, राजस्थान, कर्नाटक व पश्चिम बंगालचे क्षेत्र आहे. देशाच्या एकूण जवस उत्पादनापैकी जवळजवळ 70% वाटा हा मध्यप्रदेश व उत्तरप्रदेश राज्यांचा आहे. जावसमध्ये तेलाचे प्रमाण 33 ते 47 % असते.

Linseed Cultivation 2025 जवस या पिकास थंड व कोरडे हवामान योग्य आहे. हे पीक जिरायत व बागायतीस योग्य आहे. या पिकाची उत्पादकता वाढवण्यासाठी वेळेवर लागवड, सुधारित वाणांचा वापर व किडी व रोगांपासून संरक्षण या बाबींकडे शेतकऱ्यांनी काळजीपूर्वक लक्ष देणे आवश्यक आहे.
बीज ग्राम योजना काय आहे?
Linseed Cultivation 2025 जवस तेलामध्ये 58% ओमेगा-3 मेदाल्म, आणि अँटिऑक्सिडंट दोन्ही घटक हृदयरोगाला कारणीभूत असलेले विकार, रक्तदाब, कोलेस्ट्रॉल, ट्रायग्लिसराईड यांचे प्रमाण कमी होते. संधिवात सुसह्य होतो, मधुमेह आटोक्यात येतो. कर्करोग व इतर रोगांना प्रतिकारशक्ती निर्माण होते. म्हणून जवस दैनंदिन आहारात उपयोगी ठरते.

जमीन: Linseed Cultivation 2025
या पिकासाठी मध्यम ते भारी ओलावा टिकवून ठेवणाऱ्या उत्तम पाण्याचा निचरा होणाऱ्या जमिनीत जवस हे पीक घ्यावे.
पूर्व मशागत: Linseed Cultivation 2025
रब्बी पिक पेरण्यापूर्वी ठेवलेल्या जमिनीवर नांगरट करावी. हेक्टरी 10 गाड्या शेणखत टाकून 2-3 कुळव्याच्या पाळ्या देऊन जमीन भुसभुशीत करावी. त्यामुळे जमिनीत ओलावा टिकवून ठेवण्याची क्षमता वाढते.
| वाणाचे नाव | कालावधी(दिवस) | तेलाचे प्रमाण% | हेक्टरी उत्पन्न (किलो) |
| एनएल-97 | 115-120 | 44 | 600-1200 |
| एनएल-142 | 118-123 | 42 | 1510 (पाण्याची सोय असल्यास) |
| एनएल-135 | 116-121 | 41 | 1600-2300(पाण्याची सोय असल्यास) |
| एनएल-260 | 110-115 | 43 | 1100-1800 |
पेरणीची वेळ: Linseed Cultivation 2025
जवसाची पेरणी योग्य वेळी केल्यास या पिकावर येणारी गादमाशी या किडीचा प्रादुर्भाव कमी प्रमाणात आढळतो. व उत्पादन वाढते. म्हणून कोरडवाहू पिकाची पेरणी ऑक्टोबरच्या पहिल्या पंधरवड्यात तर बागायती पिकाची पेरणी नोव्हेंबरच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
बियाणे: 8 ते 10 किलो प्रती हेक्टरी बियाणे वापरावे.
बीज प्रक्रिया: 1 ग्रॅम बाविस्टीन + 1 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाण्यास चोळावे. यामुळे मर व अल्टरनेरिया ब्लाईट या रोगांचा प्रादुर्भाव कमी होतो.
पेरणीचे अंतर: 45 * 10 सेमी किंवा 30 *10 सेमी अंतरावर अनुक्रमे 45 सेमी किंवा 30 सेमी अंतराच्या पाभरणीने पेरणी करावी.
आंतरपीक: Linseed Cultivation 2025
या पिकात जवस + हरभरा(4:2), जवस + करडई(4:2), जवस + मोहरी(5:1) या प्रमाणात घेता येते. प्रयोगाद्वारे असे सिद्ध झाले आहे की जवस+हरभरा(4:2) या प्रमाणात घेतल्यास ही आंतरपिके पद्धती आर्थिकदृष्ट्या फायदेशीर आहे.
रासायनिक खते:
कोरडवाहू लागवडीस 25 किलो नत्र व 25 किलो स्फुरद/ हेक्टरी (म्हणजेच 125 किलो 20:20 मिश्र खत) पेरणीच्या वेळेस द्यावे तसेच बागायती लागवडीसाठी 60 किलो नत्र + 30 किलो स्फुरद/ हेक्टरी द्यावे. त्यापैकी अर्धनत्र (30 किलो) +संपूर्ण स्फुरद (30 किलो म्हणजेच 150 किलो 20 :20 मिश्रखत) पेरणीच्या वेळेस द्यावे.
आणि राहिलेली अर्धी नत्राची मात्रा (30 किलो नत्र म्हणजेच 35 किलो युरिया) 40-45 दिवसांनी पहिल्या ओलीता सोबत घ्यावी. तसेच या पिकास 5 किलो पी.एस.बी. व 5 किलो झिंक सल्फेट पेरणीच्या वेळेस द्यावे.
पाणी व्यवस्थापन:
या पिकास दोन पाण्याची आवश्यकता आहे. पहिले पाणी फुलोऱ्यावर असताना म्हणजेच 40 ते 45 दिवसांनी व दुसरे ओलीत 65 ते 70 दिवसांनी द्यावे.

आंतरमशागत: Linseed Cultivation 2025
जवसाचे पीक पहिले 30 दिवस ताणविरहित ठेवल्यास उत्पादनात वाढ होते. पेरणीनंतर 25 दिवसांनी पहिली कोळपणी/ डवरणी करणे आवश्यक आहे. तणांचा प्रादुर्भाव लक्षात घेता खुरपणी करावी.
कीड व्यवस्थापन:
या पिकावर गादमाशीचा प्रादुर्भाव आढळून येतो. या किडीच्या नियंत्रणासाठी डायमेथोएट 30% प्रवाही 15 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून फवारणी करणे. तसेच जवस पिकाची पेरणी ऑक्टोबर महिन्याच्या पहिल्या पंधरवड्यात करावी.
रोग व्यवस्थापन:
अल्टरनेरिया ब्लाईट: या रोगाच्या नियंत्रणासाठी थायरम 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे याची प्रक्रिया करावी. तसेच मॅन्कोझेब 0.25% ची फवारणी करावी (25 मिली +10 लिटर पाणी)
भुरी: रोगाचा प्रसार हवेद्वारे होतो या रोगाचे नियंत्रणाकरिता पाण्यात मिसळणारी गंधकाची भुकटी 25 ग्रॅम किंवा कॅराथेन 10 लिटर पाण्यात मिसळून रोग दिसता क्षणीच फवारणी करावी व दुसरी फवारणी आवश्यकता भासल्यास 15 दिवसांनी करावी.
मर: रोगाच्या नियंत्रणासाठी पेरणीपूर्वी 1 ग्रॅम बाविस्टीन + 2 ग्रॅम थायरम प्रति किलो बियाणे चोळावे.
पीक काढणी: Linseed Cultivation 2025
पिकाची पाने व बोंडे पिवळी पडल्यास पीक काढण्यास योग्य समजावे. या पिकाची कापणी विळ्याच्या साह्याने करावी. कापणी झाल्यानंतर 4 ते 5 दिवस वाळवून मळणी करावी व बी योग्य प्रकारे साठवून ठेवावे.
उत्पादन: 5 ते 7 क्विंटल हेक्टर
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |