सुरु हंगाम ऊस लागवड एकात्मिक खत व पाणी व्यवस्थापन!! Sugarcane Cultivation 2025

Sugarcane Cultivation 2025 सध्या सुरु ऊस लागवड हंगाम आहे. सुरु ऊस लागवड हि डिसेंबर मध्यापासून 15 फेब्रुवारीपर्यंत करता येते. या काळात लागवडीसह खत व पाण्याचे नियोजन योग्य प्रकारे केल्यास उत्पादकतेमध्ये वाढ मिळते.

Sugarcane Cultivation 2025

Sugarcane Cultivation 2025 भारतात ऊस हे महत्वाचे व्यावसायिक पिकांपैकी एक पीक आहे आणि नगदी पीक म्हणून याचे एक प्रमुख स्थान आहे. ऊस भारत व ब्राझील या देशात प्रामुख्याने पिकविण्यात येतो. ऊस हा साखर आणि गुळाचे मुख्य स्रोत आहे. भारत हा साखरेच्या बाबतीत जगातील दुसऱ्या क्रमांकाचा उत्पादक देश आहे. भारतात महाराष्ट्र व उत्तर प्रदेश हि राज्ये ऊस पिकविण्यात अग्रेसर आहेत.

मेळघाटातील शेतकऱ्यांना दिलासा, मक्याची प्रति हेक्टर खरेदी मर्यादा वाढली!!

Sugarcane Cultivation 2025 ऊस पिकाची लागण बाराही महिने असली तरी प्रामुख्याने लागणीचे तीन हंगाम आहेत.

WhatsApp Group Join Now
लावणी वेळ कालावधी
सुरु हंगामी15 डिसेंबर- 15 फेब्रुवारी12 महिने ते 14 महिने
पूर्व हंगामीऑक्टोबर- नोव्हेंबर15 महिने
आडसालीजुलै- ऑगस्ट18 महिने

सुरु उसाची लागवड 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी या दरम्यान करावी. उसाची लागवड पट्टा पद्धतीने करण्यासाठी रिजरच्या साहाय्याने 2.5 किंवा 3 फूट अंतरावर सऱ्या पाडाव्यात. सलग दोन सऱ्यात लागवड करून तिसरी सरी मोकळी ठेवावी. त्यामुळे 2.5 ते 5 फूट किंवा 3 ते 6 फूट अंतरावर जोड ओळींची पट्टा पद्धतीने लागवड करणे सुलभ होते. मध्यम ते भारी, पाण्याचा योग्य प्रमाणात निचरा होणाऱ्या, 6.5 ते 8.0 सामू असणाऱ्या जमिनीची निवड करावी. लागवड करण्यापूर्वी माती परीक्षण करून घेणे आवश्यक आहे.

Sugarcane Cultivation 2025 सुरु उसाची लागवड डिसेंबर ते फेब्रुवारी या कालावधीत केली जाते, परंतु लागणीच्या योग्य कालावधी 15 जानेवारी ते 15 फेब्रुवारी हा आहे. या उसाची तोडणी साधारण 12 ते 14 महिन्यांनी केली जाते. सुरु गळिताचे पीक घ्यावे किंवा हिरवळीचे एक ताग, धेंचा घेऊन ते जमिनीत गाडले असता सुरु उसाच्या उत्पादनात वाढ होते व जमिनीची सुपीकता चांगली राहते.

योग्य जातींची निवड: सुरु हंगामातील ऊस लागवडीसाठी को 86032 (नीरा), को 94012 (फुले सावित्री), को एम 0265 (फुले-265), फुले 92005, को 8014, को 7527, को सी-671 या जाती निवडाव्यात.

WhatsApp Group Join Now

बेणे निवड व प्रक्रिया: सुरु उसाची लागण करण्यासाठी दोन डोळे टिपरी पद्धतीने लागण करावी. ऊस लागण करताना दोन टिपऱ्यांमधील अंतर 20 ते 30 सेंमी ठेवावे. मध्यम काळया जमिनीसाठी हेक्टरी 30,000 टिपरी व भारी जमिनीसाठी हेक्टरी 25,000 टिपरी बेणे लागते.

बेणे जाड, रसरशीत व निरोगी असावे. डोळ्यांची वाढ चांगली झालेली असावी. डोळे फुगीर असावेत. ते जुनाट व निस्तेज नसावे. बेण्यासाठी 10 ते 11 महिने वयाचा ऊस वापरावा. बेणे रोगमुक्त व कीडमुक्त असावे. डोळ्याजवळ मुळ्या फुटलेला, पांगशा फुटलेला ऊस बेण्यासाठी वापरू नये. बेण्यासाठी खोडवा ऊस वापरू नये.

ऊस बेणेप्रक्रिया करून उसाची लागवड करावी. उसाच्या कांडीवरील खवले कीड, पिठ्या ढेकूण तसेच काणी रोगाच्या नियंत्रणासाठी 300 मिली मॅलॅथिऑन (50 टक्के प्रवाही ) + 100 ग्रॅम कार्बेनडिझम प्रति हेक्टरी 100 लिटर पाण्यात मिसळून द्रावण तयार करावे. या द्रावणात बेणे दहा मिनिटे बुडवावे. बुरशीनाशकाची प्रक्रिया केलेले बेणे अर्धा तास सुकल्यानंतर जिवाणू संवर्धकाची बेणे प्रक्रिया करावी.

यासाठी 100 लिटर पाण्यामध्ये दहा किलो असेटोबॅक्टर आणि 1.25 किलो स्कुरद विरघळणारे जिवाणू संवर्धक टाकावे अशा द्रावणामध्ये हे बेणे 30 मिनिटे बुडवावे. त्यामुळे असेटोबॅक्टर जिवाणू बेण्याच्या पेशींमध्ये प्रवेश करून नत्राची बचत करतात आणि स्फुरद विरघळविणारे जिवाणू जमिनीतील स्फुरद ऊस वाढीसाठी उपलब्ध करून देतात. अशा प्रकारच्या जिवाणूंच्या बीजप्रक्रियेमुळे नत्रामध्ये 50%, तर स्फुरदाच्या मात्रेत 25 टक्के बचत होते.

अंतरपिके: Sugarcane Cultivation 2025

सुरु उसाचा कालावधी 12 ते 14 महिन्यांचा असतो. उसाची लागवड केल्यानंतर पूर्ण उगवण होण्यासाठी सहा ते आठ आठवड्यांचा कालावधी लागतो. सुरुवातीच्या कालावधीमध्ये उसाची वाढ हळू होत असल्यामुळे उसाच्या दोन साऱ्यांमध्ये आंतरपिके घेण्यासाठी भरपूर मोकळी जागा असते. अंतरपिकांमुळे एकूण निव्वळ उत्पन्नात वाढ होते. ऊसासाठी बियाणे, खते व आंतरमशागतीसाठी केलेला खर्च आंतरपिकाच्या उत्पन्नातून निघून जातो.

तणांच्या वाढीवर परिणाम होऊन तणांचे प्रमाण कमी होते. सुरू उसामध्ये भुईमूग, सोयाबीन, कोबी, फुलकोबी, मेथी, कोथिंबीर, कलिंगड, काकडी व कांदा ही आंतरपिके घेता येतात. द्विदल वर्गातील आंतरपीके घेतल्यास जमिनीचा पोत सुधारतो.

एकात्मिक खत व्यवस्थापन: Sugarcane Cultivation 2025

रासायनिक खतांचा असंतुलित वापर झाल्यामुळे जमिनीची सुपीकता व उत्पादकता कमी झाली आहे. यासाठी सेंद्रिय, जैविक आणि रासायनिक अशी एकात्मिक अन्नद्रव्य व्यवस्थापनाची गरज आहे. ऊस उत्पादनवाढीत सेंद्रिय आणि रासायनिक खतांचा प्रमुख वाटा आहे. ऊस लागवडीत खताची गुणवत्ता, त्याचा योग्य वेळी योग्य पद्धतीद्वारा वापर म्हणजे एकात्मिक खत व्यवस्थापन होय.

रासायनिक खतांची गुणवत्ता पाहताना त्या खतांमधून ऊस वाढीसाठी मिळणाऱ्या पोषक अन्नद्रव्यांची कार्यक्षमता लक्षात घेणे महत्त्वाचे आहे. जैविक, सेंद्रिय व रासायनिक खतांच्या माध्यमातून अन्नद्रव्यांचा संतुलित प्रमाणात, योग्य वेळी योग्य पद्धतीने वापर करणे महत्त्वाचे आहे. तेव्हा माती परीक्षण करून अहवालानुसार खताचे नियोजन करावे.

सेंद्रिय खते: Sugarcane Cultivation 2025

सुरू उसासाठी प्रति हेक्टरी 20 (40 गाड्या) टन शेणखत अथवा पाचटाचे कंपोस्ट खत प्रति हेक्‍टरी 7.5 टन (15 गाड्या), आणि गांडूळ खत प्रति हेक्टरी 5 टन (10 गाड्या) ऊस लागवडी पूर्वी दुसऱ्या नांगरटीच्या वेळी अर्धी मात्रा व उरलेले अर्धी मात्रा सरी सोडण्यापूर्वी द्यावी. शेणखत अथवा कंपोस्ट खताची उपलब्धता नसल्यास ताग, धेंचा यासारख्या हिरवळीच्या पिकांचा सेंद्रिय खत म्हणून वापर करावा.

जैविक खते:

Sugarcane Cultivation 2025 असेटोबॅक्टर, अझोटोबॅक्टर, अझोस्पिरिलम व स्फुरद विरघळविणारे जिवाणू एकरी प्रत्येकी अर्धा किलो (एकूण दोन किलो) बेणे प्रक्रिया करून अथवा शेणखतामधून सरीमध्ये मुख्य बांधणीपूर्वी देण्यात यावे.

रासायनिक खते:

उसासाठी नत्र, स्फुरद व पालाश मुख्य अन्नद्रव्य 2:1:1 या प्रमाणात ऊसवाढीच्या अवस्थेनुसार द्यावीत. रासायनिक खतांची कार्यक्षमता वाढवण्यासाठी रासायनिक खते जमिनीत मातीआड करावीत. रासायनिक खतांचा निचऱ्यावाटे होणारा ऱ्हास कमी करून त्यांची उपयुक्तता वाढवण्यासाठी रासायनिक खते पहारीसारख्या अवजाराने द्यावीत, त्यामुळे उसाची वाढ चांगली होऊन उत्पादन वाढण्यास मदत होते.

हंगामी ऊस लागवडीसाठी (डोस प्रती हेक्टर) खते

खते देण्याची वेळनत्र (kg)स्फुरद (kg)पालाश (kg)शेणखत
लागवडीच्या वेळी (10% नत्र, 50% P&K)25626220-25 tons/ha
6-8 आठवडे नंतर (40% नत्र)100
8-12 आठवडे नंतर (10% नत्र)25
20-24 आठवडे नंतर (40% नत्र, 50% स्फुरद,पालाश)1006363
एकूण25012512525

टीप:

एसेटोबॅक्टर आणि स्फुरद विरघळणारे जिवाणूंची बीजप्रक्रिया केलेल्या ऊसास वरील दिलेली हंगामनिहाय रासायनिक नत्र खतमात्रा 50% तर स्फुरदाची 25% कमी करून घ्यावेत.

सूक्ष्म अन्नद्रव्ये: Sugarcane Cultivation 2025

माती परीक्षण आधारे सूक्ष्म अन्नद्रव्यांच्या कमतरतेमुळे 25 किलो फेरस सल्फेट, 20 किलो जिंक सल्फेट, 10 किलो मॅगनीज सल्फेट आणि 5 किलो बोरॅक्स प्रति हेक्टरी चांगल्या कुजलेल्या शेणखतात (10:1) 2 ते 3 दिवस मुरवून सरीमध्ये चरी घेऊन मातीआड करावे. स्फुरदयुक्त खतांसाठी शक्यतो सिंगल सुपर फॉस्फेट चा वापर करावा. त्यामुळे गंधक या दुय्यम अन्नद्रव्यांची वेगळी मात्रा द्यावी लागणार नाही.

उसासाठी अधिक उत्पादन घेण्यासाठी हेक्टरी 400 किलो सिलिकॉन देण्यासाठी बगॅस अश (1.5 टन /हेक्टर) किंवा कॅल्शियम सिलिकेट (832 किलो /हेक्टर) च्या माध्यमातून ऊस लागवडीच्या वेळी एकदाच द्यावा.

ठिबक सिंचनातून नत्रयुक्त खते:

ठिबक सिंचनातून देण्यासाठी युरिया हे संपूर्ण पाण्यात विरघळणारे उत्तम नत्रयुक्त खत आहे. लागणीपासून मोठ्या बांधणी पर्यंत दर आठवड्याच्या अंतराने समान 20 हप्त्यात किंवा दर 15 दिवसाच्या अंतराने समान 10 हप्त्यात नत्र खताची मात्रा विभागून दिल्यास उसाच्या उत्पादनात भरीव वाढ होते. पारंपारिक स्फुरदयुक्त खते नेहमीप्रमाणे दोन समान हप्त्यात ऊस लागण्याचे वेळी व मोठ्या बांधणीच्या वेळी जमिनीतून द्यावीत.

ठिबक सिंचनातून विद्राव्य खतांचे व्यवस्थापन:

सुरू उसासाठी मध्यम खोल, काळ्या जमिनीत सुरू उसाचे अधिक उत्पादन, पाण्याचा व खतांचा कार्यक्षम वापर आणि आर्थिक फायद्यासाठी 80% विद्राव्य खते दर आठवड्याला एक याप्रमाणे 26 हप्त्यात ठिबक सिंचनातून द्यावे.

पाणी व्यवस्थापन:

सुरु उसाला 250 ते 275 हेक्टर सेमी पाण्याची गरज असते. मोठ्या बांधणीपर्यंत सर्वसाधारणपणे पाण्याच्या पाळया 8 सेमी खोलीच्या द्याव्यात. त्यानंतर 10 सेमी खोलीच्या पाळ्या द्याव्यात.

दोन पाळ्यांतील अंतर जमिनीचे पाणी धारणक्षमता, पीकवाढीची अवस्था व हंगाम इत्यादी बाबींचा विचार करून चौकटीत दिल्याप्रमाणे पाणी देण्याचे नियोजन करावे. उन्हाळ्यात 8 ते 10 दिवसांनी हिवाळ्यात 14 ते 16 दिवसांनी व पावसाळ्यात गरजेनुसार 18 ते 20 दिवसांनी पिकास पाणी द्यावे.

ऊस उगवण अवस्थेमध्ये सुरुवातीच्या काळात वरंबा बुडेपर्यंत पाणी देऊ नये. यावेळी उसाला जास्त पाणी दिल्यास नत्रयुक्त खते वाया जातात. कमी पाण्यामुळे जमिनीतील पाणी व हवा यांचा समतोल राखला जातो.

इतर माहितीसाठी येथे क्लीक करा

Leave a Comment