Makka Kharedi 2025 मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची आणि दिलासादायक बातमी समोर अली आहे. महाराष्ट्र राज्य सहकारी आदिवासी विकास महामंडळ (नाशिक) मार्फत करण्यात येणाऱ्या मका खरेदीतील प्रतिहेक्टरी मर्यादा 11 क्विंटलवरून थेट 19 क्विंटल 41 किलो इतकी वाढवण्यात अली आहे. मोठ्या प्रमाणात मका उत्पादन झाल्याने हि आवश्यकता अधोरेखित झाली होती.

Makka Kharedi 2025 उत्पादन जास्त झाल्याने हि वाढ आवश्यक होती. आमदार केवलराम काळे यांच्या पाठपुराव्यानंतर प्रशासनाने त्वरित दखल घेत हि सुधारणा लागू केली. यामुळे मका पिकाला योग्य दर आणि योग्य प्रमाणात खरेदीची हमी मिळून शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे.
वनस्पती शास्त्र: ऊसाची परिपक्वता!!
मोठ्या उत्पादनामुळे मर्यादा वाढवण्याची मागणी मान्य
Makka Kharedi 2025 मेळघाटचे आमदार केवलराम काळे यांनी या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे आणि जिल्हा प्रशासनाला निवेदन दिले होते. त्यानुसार कृषी विभागाच्या जिल्हा अधीक्षकांनी प्रत्यक्ष उत्पादनाचे आकडे ऑनलाईन प्रणालीत नोंदऊन पाठवले. त्या आधारे आदिवासी विकास महामंडळाने मका खरेदीची मर्यादा वाढवण्यास मंजुरी दिली.

शेतकऱ्यांसाठी खरेदी हीच सुरक्षितता Makka Kharedi 2025
मेळघाटातील आदिवासी शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुबाडणुकीचा वारंवार बळी ठरत होते. त्यामुळे महामंडळाद्वारे योग्य दर, योग्य प्रमाणातील खरेदी, वजनात पारदर्शकता यासाठी विशेष खरेदी मोहीम राबवली जाते. मात्र, यंदा उत्पादन मोठ्या प्रमाणात झाल्याने 11 क्विंटलची मर्यादा अपुरी ठरत होती.
तत्काळ दखल Makka Kharedi 2025
लोकमतमध्ये मका खरेदितील मर्यादा आणि शेतकऱ्यांच्या समस्यांवर वृत्त प्रसिद्ध झाल्यानंतर प्रसाशनाने तातडीने कारवाई केली. कृषी विभागाने आकडेवारी पाठवल्यानंतर महामंडळाच्या प्रादेशिक व्यवस्थापक पी.आर. सिरसाठ यांनी अधिकृतरीत्या मर्यादा वाढीची माहिती संबधित खरेदी केंद्रांना कळवली.
मर्यादा वाढली हा मोठा दिलासा: Makka Kharedi 2025
मेळघाटातील अनेक भागांमध्ये मका खरेदी केंद्र 50-60 किलोमीटर अंतरावर असल्याने शेतकऱ्यांना अडचणी येत होत्या.
वाहतूक खर्च वाढूनही 11 क्विंटलपेक्षा कमी मर्यादेमुळे अनेकांचे नुकसान होते.
आता 19.41 क्विंटल मर्यादेमुळे जास्तीत जास्त उत्पादन खरेदी होणार असल्याने शेतकरी समाधानी आहेत.
“मेळघाटातील आदिवासी शेतकऱ्यांना उत्पादन मोठ्या प्रमाणात झाले. त्यामुळे मका खरेदी मर्यादा वाढवण्याची मागणी आम्ही केली होती. ती आता साडेएकोणिस क्विंटल इतकी वाढण्यात आली आहे. शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. केवलराम काळे, आमदार”
शेतकऱ्यांसाठी फायदेशीर निर्णय
- मका खरेदीची मर्यादा 11 वरून 19.41 क्विंटल
- जास्त उत्पादन असलेल्या शेतकऱ्यांचा मोठा फायदा
- व्यापाऱ्यांकडून होणारी लुबाडणूक कमी
- प्रशासन आणि लोकमतच्या वृत्तामुळे तातडीची दखल
- आदिवासी शेतकऱ्यांना आर्थिक साहाय्य
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |