सद्यस्थितीत कांदा पिकातील रोगांचे नियंत्रण!! Diseases in Onion Crops 2025

Diseases in Onion Crops 2025 सध्या महाराष्ट्रात हिवाळा असला तरी जागतिक हवामान बदलामुळे अनैसर्गिक असे दमट पावसाळी ढगाळ असे वातावरण असून रोग /किडी वाढवण्यासाठी पोषक आहे. त्याचप्रमाणे खरीप हंगामात असणारा सततचा पाऊस, जमिनीत असणारा ओलावा यामुळे कांदा रोपवाटिकेत डम्पिंग ऑफ (रोप कोलमडणे/ रोपातील मर) यांचा प्रादुर्भाव दिसून आला.

Diseases in Onion Crops 2025

Diseases in Onion Crops 2025 तसेच उन्हाळी कांदा रोपवाटिकेत काळा करपा या रोगाचा प्रादुर्भाव आढळला. यामुळे काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव नाशिक, अहमदनगर, सातारा, इत्यादी. जिल्ह्यात काही भागात आढळून आला तसेच सध्या रोपे लागवडीस आलेली असून रोपांची मर झालेली दिसत आहेत. यावर सुद्धा काळा करपा रोगाचा रोपांवर प्रादुर्भाव असल्याचे आढळले.

पीएम किसान योजनेतून अडीच लाख शेतकऱ्यांना का वगळले? काय आहे कारण?

Diseases in Onion Crops 2025 रोपवाटिका निरोगी राहण्यासाठी कांदा पिकातील मर आणि करपा रोगाच्या नियंत्रणासाठी रोपवाटिकेत बियाणे लागवड करताना आणि लागवडीनंतर रोपांची योग्य काळजी घेणे जरुरीचे आहे.

WhatsApp Group Join Now

रोपवाटिकेत एकात्मिक रोग व्यवस्थापन:

रोपवाटिकेतील रोपांवर जमिनीतील फ्युजॅरियम बुरशीच्या प्रादुर्भावामुळे रोपे कोलमडणे (डम्पिंग ऑफ /रोपे मर) रोग येतो. या रोगामुळे रोपांची मान जमिनीलगत अचानक कुजून रोपे कोलमडलेली / जळालेली दिसतात. त्याचप्रमाणे कोलेटोट्रिकम या बुरशीच्या प्रादुर्भावाने रोपांच्या माना लांबलेल्या, रोपे पिवळसर, पाती शेंड्याकडून करपलेल्या आणि मानांवर बुरशीचे काळसर वलय दिसतात अशा रोपांच्या मुळाच्या मुळाचा भाव कुजल्या सारखा दिसतो. रोपे जळालेली, सहज उपटतात.

रोपवाटिकेतील उपाय योजना: Diseases in Onion Crops 2025

रोपवाटिकेची जमीन मध्यम प्रतीची, उत्तम निचरा होणारी असावी.

गादीवाफ्यावर रोपे तयार करावेत, गादीवाफा 3*1 आकारांचा किंवा जास्तीत जास्त 4 ते 5 मीटर लांबी ठेवून 15 से.मी. उंची असलेले असावेत.

कांदा रोपवाटिकेची जागा नेहमी बदलती असावी.

बियाणे स्वच्छ, नवीन, शुद्ध भेसळविरहित, योग्य उगवण क्षमतेचे आणि खात्रीलायक असावे.

WhatsApp Group Join Now

गादीवाफ्यावर बियाणे पेरणीपूर्वी बियाण्यास कॅप्टन 2 ग्रॅम + बावीस्टीन 2 ग्रॅम प्रति किलो या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी अथवा 5 ग्रॅम ट्रायकोडर्मा पावडर प्रति किलो बियाणे या प्रमाणात चोळावे.

बियाणे पेरण्यापूर्वी: Diseases in Onion Crops 2025

साधारणपणे 3*1 मी. आकाराच्या गादीवाफ्यावर 30 ग्रॅम बावीस्टीन प्रतिवाफा याप्रमाणात जमिनीत मिसळावे किंवा ट्रायकोडर्मा पावडर 10 ग्रॅम आणि चांगले कुजलेले शेणखत 5 किलो एकत्रित जमिनीवर सारख्या प्रमाणात टाकून मातीत मिसळून घ्यावे व ताबडतोब पाणी घ्यावे आणि वापसा आल्यावर बियाण्याचे पेरणी करावी.

पेरणीनंतर 15 दिवसांनी कॉपर ऑक्सिक्लोराईड 20 ग्रॅम + कार्बेन्डाझम 10 ग्रॅम किंवा मॅन्कोझेब 20 ग्रॅम + कार्बेन्डाझम 10 ग्रॅम, प्रति 10 लिटर पाण्यात मिसळून दोन्ही ओळींमधून काकरी पाडून टाकावे.

जांभळ्या करपा:

जांभळा करपा हा अल्टरनेरिया पोरी नावाच्या बुरशीमुळे येतो. या बुरशीजन्य करपा रोगाचे प्रमाण खरीप हंगामातील दमट, ढगाळ व पावसाळी वातावरणात जास्त वाढते. सध्याच्या ढगाळ, पावसाळी आणि सकाळच्या धुक्यामुळे करपा रोग वाढण्याची शक्यता आहे. रोगाच्या प्रादुर्भावामुळे कांद्याच्या पातीवर सुरुवातीला लहान, खोलगट पांढुरके ठिपके /चट्टे पडतात. या चट्टेचा मध्यभाग जांभळट लालसर रंगाचा घेऊन कडा पिवळसर दिसतात.

दमट हवामानात रोगाचे प्रमाण वाढून या चट्टेचे ठिकाणी तपकिरी किंवा काळपट बुरशीची वाढलेली चट्टेचे प्रमाण वाढल्यामुळे पाने शेंड्यांकडून जाऊ लागतात व संपूर्ण पात जळल्यासारखे दिसते. पाती जळाल्याने कांदा चांगला पोसत नाही आणि चिंगळी कांद्याचे प्रमाण वाढते.

बियाण्यासाठी लावलेल्या कांद्याच्या पातीवर रोगाचे प्रमाण वाढल्यास त्याचा प्रादुर्भाव दांड्यांवर होऊन गोंड्यात बी भरत नाही, थोड्याशा धक्क्याने /वाऱ्याने दांडेखाली कोलमडतात. याकरिता कांद्यास फुलण्यास उमलण्यास सुरुवात होईपर्यंत गरजेनुसार बुरशीनाशकाची फवारणी करावी. 10 दिवसाच्या अंतराने तीन फवारण्या कीटकनाशक/ बुरशीनाशकाच्या कराव्यात.

काळा करपा (कोलेटोट्रिकम ब्लाईट):

कोलेटोट्रिकम नावाच्या बुरशीमुळे काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव खरीप हंगामात दिसून येतो. या रोगामुळे सुरुवातीच्या पानावर फिक्कट डाग पडून त्या ठिकाणी आणि मानेवर वर्तुळाकार डाग पडतात. पानावर वर्तुळाकार काळे पडून पाती पिवळसर, करपलेल्या दिसतात. रोगांचे प्रमाण जमिनीत पाण्याचा निचरा न झाल्यामुळे जास्त वाढून पाने करपतात पाण्याचा निचरा न झालेला ठिकाणी माना लांबलेल्या दिसतात आणि कांदा खराब होतो.

रोपे पडणे / मुरवणे/ माना पिळणे:

यावर्षी खरीप व रब्बी कांदा रोपवाटिकेत असणारा सततचा ओलावा, हवामान ढगाळ/ पावसाळी तसेच बियाणे गादीवाफ्यावर न पेरलेली रोपे अशा परिस्थितीत रोगाचा प्रादुर्भाव दिसून आला. फ्युजेरियम व कोलेटोट्रिकम रोगाचा प्रादुर्भाव होतो. सूत्रकृमी तसेच काही वाढवर्धक पदार्थाची वाढ होते.

अशा प्रादुर्भाव झालेले रोपांची लागवड झाली तर रोगग्रस्त रोपांच्या माना लांबलेल्या, पाने पिवळसर, पीक पडलेले /मुरगळलेले दिसतात, मानेवर काळा करपा रोगाचे वर्तुळाकार /काळपट डाग दिसतात. प्रादुर्भाव झालेल्या कांद्याच्या गाठीचा भाग मलूल, पाणथळ होतो, कांदा पोसत नाही, नंतर सडतो, यासाठी रोपवाटिकेत सांगितलेली काळजी घ्यावी. लागवडीच्या वेळी रोपे प्रक्रिया केलेली आणि लागवड केल्यानंतर योग्य बुरशीनाशकांची फवारणी करावी.

तपकिरी करपा: Diseases in Onion Crops 2025

स्टेमफीलियम नावाच्या बुरशीमुळे तपकिरी करपा रब्बी हवामानात येतो, सुरुवातिला पानांवर पिवळसर तपकिरी चट्टे पडतात. चट्टे प्रमाण बुंध्यांकडून शेंड्याकडे वाढत जाऊन पाने तपकिरी पडून सुकतात. पाने सुरकुतल्या सारखी आणि शेंडे जळाल्यासारखी दिसतात. करपा रोगाच्या नियंत्रणाकरिता खालीलप्रमाणे उपाय वेळीच करावेत.

  1. पेरणीपूर्वी बियाण्यास शिफारसीत बीज प्रक्रिया करूनच पेरावे.
  2. रूपवाटकेत काळा करपा रोग वाढू नये म्हणून रोपे पातळ गादिवाफेवर बियाणे ओळीत पेरावे म्हणजे बुरशीनाशकाची जिरवण करणे सोपे जाते रोगाचे प्रमाण कमी राहते.
  3. रोपवाटिकेत करपा रोप वाढू नये म्हणून बुरशीनाशकाचे फवारणी करावी.
  4. मर, काळा करपा, सूत्रकमी रोगांच्या नियंत्रणाकरिता, लागवड करण्यापूर्वी रोपांची मुळे मानेपर्यंतचा भाग मॅन्कोझेब 20 ग्रॅम + कार्बेन्डाझिम 10 ग्रॅम +क्लोरोपायरीफॉस 20 मिली. 10 लिटर पाण्यात मिसळून या द्रावणात 10 ते 15 मिनिटे बुडवून लागवड करावी.
  5. लागवड केल्यानंतर 10 दिवसांनी रोपे प्रक्रिया केलेली नसल्यास काळा करपा रोगाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी डायथेन एम-45 प्रति 30 ग्रॅम किंवा डायथेन एम-45 प्रति 20 ग्रॅम + बाविस्टीन 10 ग्रॅम, 10 लिटर पाण्यात मिसळून संपूर्ण रोपांवर फवारणी करावी. हीच फवारणी रोपे उगवण्याकरिता 10 ते 20 दिवसांनी करावी. यानंतर टेब्युकोनॅझोल 10 मि.ली. 10 लिटर पाण्यात मिसळून 7 ते 10 दिवसाच्या अंतराने दोन फवारण्या कराव्यात.
  6. करपा आणि फुलकिडे नियंत्रणासाठी लागवडीनंतर रोगांची लक्षणे दिसताच दर 10 दिवसाच्या अंतराने अझोक्सीट्रॉबीन प्रति 10 मिली. किंवा टेब्युकोनॅझोल प्रति 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून या बुरशी नाशकांची फवारणी जांभळा करपा आणि काळा करपा नियंत्रणासाठी 10 लिटर पाण्यात मिसळून करावी. फुलकिडींसाठी वरील पैकी एका बुरशीनाशकाबरोबर फ्रेप्रोनील (रिजंट) 10 मी.ली. किंवा लॅम्बडा सायहॅलोथ्रीन 5 % ई. सी. 6 मी.ली. + स्टिकर 10 मिली 10 लिटर पाण्यात मिसळून आलटून पालटून फवारावे. किंवा व्हर्टिसीलियम लेकानी या जैविक कीटकनाशकाची फवारणी 5 ग्रॅम प्रति ली. पाण्यातून सायंकाळी फवारणी करावी.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment