PM Kisan Yojana Update 2025 पीएम किसानच्या 20 हप्त्यांची रक्कम आतापर्यंत शेकऱ्यांच्या खात्यात पाठवण्यात अली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते पीएम किसान सन्मान निधी योजनेच्या लाभार्थी शेतकऱ्यांना 21 वा हप्ता 19 नोव्हेंबरला मिळणार आहे.

PM Kisan Yojana Update 2025 पंतप्रधान किसान सन्मान योजनेचा लाभ एका कुटुंबात एकालाच देण्याच्या निकषामुळे 20 व्या हप्त्याच्या तुलनेत 21 व्या हप्त्यावेळी देण्यात येणाऱ्या लाभार्थामध्ये तब्बल अडीच लाख शेतकऱ्यांना वगळले आहे.
हरभरा लागवड तंत्र!!
PM Kisan Yojana Update 2025 केंद्र सरकारने यासाठी आधार, प्राप्तिकर आणि शिधापत्रिका पोर्टलच्या आधारे या शेतकरी कुटुंबाची सदस्यसंख्या आणि उत्पन्न तपासण्यास सुरुवात केली आहे.

त्यानुसार हि घट दिसून येत आहे. यापूर्वी 20 वा हप्ता 2 ऑगस्ट रोजी 19 लाख 19 हजार शेतकऱ्यांना दिला होता.
21 व्या हप्त्यासाठी किती शेतकरी पात्र?
राज्यातील 20 लाख 41 हजार 241 शेतकरी पात्र आहेत. या संख्येनुसार 1 हजार 808 कोटी 25 लाख रुपयांचा लाभ देण्यात येणार आहे. मात्र, 20 व्या हप्त्याच्या तुलनेत यात तब्बल 2 लाख 50 हजार शेतकऱ्यांची घट झाली.
योजनेतील सुधारणा समजून घ्या
PM Kisan Yojana Update 2025 पीएम किसान योजनेत लाभार्थी कुटुंबाच्या व्याख्येप्रमाणे पती, पत्नी व त्यांची 18 वर्षाखालील मुले मिळून हा हप्ता आहे.
मात्र, काही कुटुंबांनी पती व पत्नी या दोघांनीही नोंदणी केली असल्याने, अशा कुटुंबामध्ये जर दोघांच्याही नावे जमीन असेल तर पतीचा हप्ता बंद केला आहे व पत्नीचा सुरु ठेवला आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |