हरभरा लागवड तंत्र!! Gram Cultivation 2025

Gram Cultivation 2025 रब्बी हंगामामधील हरभरा हे एक महत्त्वाचे डाळवर्गीय पीक आहे. हरभरा पर्यावरणाशी मैत्री साधनारे, जमिनीचा कस सुधारून व टिकवून ठेवणारे, अतिशय कमी पाण्यावर भरपूर उत्पादन देणारे हे कडधान्य वर्गीय पीक आहे. रब्बी हंगामात हरभराच्या नव्या वाणांचा आणि सुधारित लागवड तंत्रांचा वापर केला तर चांगले अर्थाजन करून देणारे पीक अशी शेतकऱ्यांची पक्की खात्री झाली आहे.

Gram Cultivation 2025

हरभरा पिकाची इतर पिकाशी तुलना केल्यास आपल्या सहज लक्षात येईल की, महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणावर घेतल्या जाणाऱ्या गव्हाच्या पिकास सर्वसाधारण 5 ते 7 पानाच्या पाळ्या दिल्या जातात. त्याद्वारे हेक्टरी 20 ते 25 क्विंटल धान्योउत्पादन मिळते आणि त्यास मिळणारा बाजारभाव फारसा आकर्षक नाही. या ऐवजी तेवढ्याच पाण्यामध्ये हरभऱ्याचे दुप्पट क्षेत्रावर पीक घेता येते. विजय, विशाल, दिग्विजय, विराट यासारख्या हुकमी उत्पादन देणाऱ्या जातींमुळे चांगले उत्पन्न होऊ शकते.

नोहेंबर अर्ध्यावर तरी केवळ 16 टक्के क्षेत्रावर रब्बी लागवड पूर्ण; गतवर्षीच्या तुलनेत सहा लाख हेक्टरने यंदा कमी पेरणी!!

एकंदरीत हरभऱ्यामध्ये जमिनीचा पोत टिकवून ठेवण्याची क्षमता, कमी पाण्यावर चांगले उत्पादन देणारे नवे वाण आणि चांगला बाजारभाव या सर्व बाबींचा विचार केल्यास अवर्षणप्रवण भागातील शेतकऱ्यांना हरभऱ्यामुळे थोडेफार आर्थिक स्थैर्य निश्चित मिळू शकेल. तसेच जेथे सिंचनाची सोय आहे अशा ठिकाणी चांगले आर्थिक उत्पादन मिळू शकेल. उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीने सुधारित तंत्राचा अवलंब करून लागवड करणे आवश्यक आहे.

WhatsApp Group Join Now

जमीन व हवामान: Gram Cultivation 2025

हरभरा पिकासाठी मध्यम ते भारी काळी, कसदार, भुसभुशीत, क्षारमुक्त आणि पाण्याचा उत्तम निचरा होणारी जमीन योग्य असते. हलक्या जमिनीत पाणी धरून ठेवण्याची क्षमता कमी असल्यामुळे अपेक्षित उत्पादन मिळत नाही. या पिकास थंड हवामान पोषक असते. पीक तीन आठवड्याचे झाल्यानंतर किमान तापमान 100 ते 150 सेल्सिअस आणि कमाल तापमान 250 ते 300 सेल्सिअस असेल तर पिकाची वाढ जोमदार होऊन पिकास फांद्या, फुले व घाटे भरपूर लागतात.

पूर्वमशागत: Gram Cultivation 2025

खरिपाचे पीक निघाल्यानंतर शेत नांगरून व पाळ्या घालून भुसभुशीत करावे आणि जमिनीत पुरेसा ओलावा असताना पेरणी करावी म्हणजे उगवण चांगली होते.

पेरणीची वेळ: Gram Cultivation 2025

हरभरा हे रब्बी हंगामातील पीक असल्याने कोरडी व थंड हवा या पिकास चांगली मानवते. कोरड वाहू क्षेत्रामध्ये जेथे सिंचनाची सोया नाही तेथे हस्त नक्षत्राच्या पहिल्या चरणानंतर म्हणजे 25 सप्टेंबरनंतर जमिनीत ओळ कमी होण्यापूर्वी पेरणी करावी. बागायती हरभरा 20 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर या दरम्यान पेरल्यास चांगले उत्पादन येते. काबुली हरभऱ्याची पेरणी सिंचनाची सोया असेल तरच करावी.

WhatsApp Group Join Now

सुधारित वाण:

देशी हरभऱ्यामध्ये विजय विशाल दिग्विजय हे वाण मर रोगास प्रतिकारक्षम असून जिरायत बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य आहेत. तर कबुली हरभऱ्याचे विराट विहार पी.के.व्ही-2, पी.के.व्ही-4 आणि कृपा हे वाण अधिक उत्पादन देणारे आहेत. यापैकी विजय आणि दिग्विजय हे देशी वाण कोरडवाहू साठी अतिशय चांगले आहेत. पाण्याची उपलब्धता असेल तर पाण्या बरोबर खत मात्रे सही हे वाण आहे.विराट हा काबुली वाण अधिक उत्पादनशील व मर रोगाला प्रतिकारक्षम आहे.

वाणकालावधी (दिवस)सरासरी उत्पादन क्विंटल/हेक्टर वैशिठ्ये
विजयजिरायत: 85-90
बागायत: 105-110
जिरायत: 85-90
बागायत: 105-110
उशिरा: 16-18
अधिक उत्पादन क्षमता, मररोग प्रतिकारक्षम, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीचे योग्य, आवर्षण प्रवण, प्रतिकारक्षम, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, गुजरात राज्या करिता प्रसारित.
विशाल110-115जिरायत: 14-15
बागायत: 30-35
आकर्षक पिवळे टपोरे दाणे, अधिक उत्पादन क्षमता, मर रोग प्रतिकारक्षम, अधिक बाजारभाव, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.
दिग्विजयजिरायत: 90-95
बागायत: 105-110
जिरायत: 14-15
बागायत: 35-40
उशिरा: 20-20
पिवळसर तांबूस, टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, जिरायत, बागायत तसेच उशिरा पेरणीस योग्य, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित
विराट110-115जिरायत: 15-16
बागायत: 35-40
काबुली वाण, अधिक टपोरे दाणे, मर रोग प्रतिकारक्षम, महाराष्ट्र राज्याकरिता प्रसारित.
विक्रम110-115जिरायत: 15-16
बागायत: 35-40
यांत्रिक काढणीसाठी उत्कृष्ट
कृपा105-110जिरायत: 10-12
बागायत: 30-32
जास्त टपोरे दाणे असणारा काबुली वाण, दाणे सफेद पांढऱ्या रंगाचे, सर्वाधिक बाजारभाव, महाराष्ट्र, मध्यप्रदेश आणि कर्नाटक राज्याकरिता प्रसारित (100 दाण्याचे वजन 59.4 ग्रॅम)
पीकेव्ही-2 100-105सरासरी उत्पन्न 12-15अधिक टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मर रोग प्रतिकारक्षम
पीकेव्ही-4100-110सरासरी उत्पन्न 12-15जास्त टपोरे दाणे, अधिक बाजारभाव, मर रोग प्रतिकारक्षम.

पेरणी पद्धत:

देशी हरभऱ्याची पेरणी पभरणीने किंवा तिफणीने करावी. दोन ओळीतील अंतर 30 सें.मी. व दोन रोपातील 10 सें.मी. अंतरावर टोकण होईल असे ट्रॅक्टरवर चालणारे पेरणीयंत्र महात्मा फुले कृषी विद्यापीठाने तयार केले आहे. त्याचा वापर हरभरा पेरताना अवश्य करावा. हरभरा सरी वरंब्यावरही चांगला येतो भारी जमिनीत 90 सें.मी. रुंदीच्या सऱ्या सोडाव्यात आणि वरंब्याच्या दोन्ही बाजूला 10 सेंमी अंतरावर एक-एक बियाणे टोकावे. काबुली वाणांसाठी जमीन ओलीवरून वाफश्यावर पेरणी केली असता यगवण चांगली होते.

बियाणाचे प्रमाण:

पेरणीसाठी विजय हरभऱ्याचे हेक्टरी 35 ते 70 किलो तर विशाल, दिग्विजय, विराट, पी.के.व्ही-2 या वाणाचे हेक्टरी 100 किलो बियाणे लागते. पी.के.व्ही-4 आणि कृपा वाणाकरिता 125 ते 130 किलो हेक्टरी बियाणे वापरावे.

बीजप्रक्रिया: Gram Cultivation 2025

पेरणीसाठी प्रमाणित किंवा स्वतःचे अथवा खात्रीचे बियाणे वापरावे. बियाणास बुरशीनाशकाची बीजप्रक्रिया केलेली नसल्यास प्रति किलो बियाण्यास 1 ते 1.5 ग्रॅम बाविस्टीन किंवा 2 ते 2.5 ग्रॅम थायरम अथवा कॅप्टन ही बुरशीनाशके चोळावेत. तसेच पेरणीपूर्वी प्रति किलो बियाणास 5 ग्रॅम ट्रायकोडर्माचे बीजप्रक्रिया करावी. यानंतर फुले रायझोबियम जिवाणू संवर्धन व पी.एस.बी. प्रति 10 किलो बियाण्यास गुळाच्या थंड द्रावणामध्ये मिसळून चोळावे आणि बियाणे सावलीत सुकवून ताबडतोब पेरणी करावी.

पेरणीचं अंतर:

हेक्टरी रोपांचे अपेक्षित संख्या (3,33,333) मिळण्याकरिता पेरणी दोन फणातील अंतर 30 सेमी असलेल्या पभरणीने करावी. पेरणीनंतर 15 दिवसात आवश्यक्य असेल तेथे नांगे भरावेत आणि विरळणी करून 2 रोपातील अंतर 10 सेमी ठेवावे.

खत व्यवस्थापन: Gram Cultivation 2025

जिरायत हरभऱ्याला हेक्टरी 12.5 किलो नत्र आणि 25 किलो स्फुरद तसेच बागायतीस 25 किलो नत्र 50 किलो स्फुरद आणि 30 किलो पालाश हि खते पेरणीपूर्वी जमिनीत पेरून द्यावीत. यासाठी हेक्टरी 125 किलो डीएपी आणि 50 किलो म्युरेट ऑफ पोटॅश पेरणीच्यावेळी बियाणे लगत पडेल या पद्धतीने दुचाडी पभरणीने पेरून द्यावे. खत विस्कटून टाकु नये. पीक फुलोऱ्यात असताना व घाटे भरण्याच्या अवस्थेत 2 टक्के युरियाची फवारणी करावी.

पाणी व्यवस्थापन:

जिरायत हरभरा क्षेत्रात जमिनीतील ओलावा खूप कमी असेल आणि एखादे पाणी देणे शक्य असेल तर हरभरा फुले येऊ लागताच पाणी द्यावे. बागायत हरभरा शेताची रान बांधणी करताना दोन सऱ्यातील अंतर कमीत कमी ठेवण्याचा प्रयत्न करावा. तसेच लांबी सुद्धा उतारानुसार कमी ठेवावी. म्हणजे पिकाला प्रमाणशीर पाणी देण्यास सोयीचे होते. मध्यम जमिनीत 20 ते 25 दिवसांनी पहिले, 45 ते 50 दिवसांनी दुसरे आणि 65 ते 70 दिवसांनी तिसरे पाणी द्यावे. भारी जमिनीस पाण्याच्या दोन पाळ्या पुरेशा होतात. त्यासाठी पहिले पाणी 30 ते 35 दिवसांनी व दुसरे पाणी 65 ते 70 दिवसांनी द्यावे. हरभरा पिकाला सर्वसाधारणपणे 25 सेमी पाणी लागते. प्रत्येक वेळी पाणी प्रमाणात 7 ते 8 सेमी देणे महत्त्वाचे असते.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment