Late sowing of wheat 2025 बागायती गव्हाची वेळेवर पेरणीसाठीची नोव्हेंबर महिन्याचा पहिला पंधरवडा हि शिफारस असली तरी काही कारणांमुळे पेरणीची वेळ पाळणे शेतकऱ्यांना शक्य होत नाही. यंदा परतीच्या दमदार व जोमदार पावसाने हजेरी लावल्याने जमिनीत वाफसा येण्यास विलंब लागला मशागतीस पुरेसा वेळही मिळाला नाही.

Late sowing of wheat 2025 त्याचबरोबर ऊस तोडणीनंतर खरीप पिकांच्या काढणीस उशीर होण्याने गहू पिकांची लागवड उशिरा करावी लागते. महाराष्ट्रात असे उशिराचे क्षेत्र जवळपास 30 टक्के एवढे असते. यंदाच्या वर्षी पाऊस लांबल्याने जमिनीची मजागत करण्यास उशीर झाल्याने लागवड क्षेत्रात निश्चितच वाढ होण्याची शक्यता आहे.
मुरघास: पौष्टिक हिरवा चारा!!
Late sowing of wheat 2025 बागायत उशिरा पेरणीची शिफारसही 16 नोव्हेंबर ते 15 डिसेंबर या कालावधीसाठी आहे. मात्र, काही शेतकरी 15 डिसेंबरनंतर ही गव्हाची पेरणी करतात. वास्तविक 15 नोव्हेंबरनंतर पेरणी केलेल्या प्रत्येक उशिराच्या पंधरवड्यात गव्हाची पेरणी केल्याने हेक्टरी 2.5 क्विंटल किंवा एकरी एक क्विंटल उत्पादन कमी मिळते.

Late sowing of wheat 2025 गव्हाच्या पिकाचे उत्पादन हे पिकास मिळणाऱ्या थंडीच्या कालावधीवर बहुतांशी अवलंबून असते. गहू पिकाच्या वाढीसाठी 7 ते 21 °c तापमानाची आवश्यकता असते. तसेच दाणे भरण्याच्या वेळी 25°c ते तापमान असल्यास दाण्यांची वाढ चांगली होऊन दाण्यांचे वजन वाढते.
गव्हाच्या बागायती उशिरा पेरणीसाठी, फुले समाधान (एनआयडब्ल्यू- 1994), निफाड 34 एनआयडब्ल्यू- 34 किंवा एकेडब्ल्यू-4627 या सरबती जातींची लागवड करावी. बागायती उशिरा पेरणीसाठी प्रति हेक्टरी 125 ते 150 किलो बियाणे रासायनिक खतांच्या पहिल्या हप्त्यांसह दोन चाड्याच्या पभरणीने एकेरी पद्धतीने 18 सेमी अंतरावर पेरावे.
Late sowing of wheat 2025 पेरणी करतेवेळी निम्मे नत्र व संपूर्ण स्फुरद व पालाश (90:60:40 नत्र, स्फुरद, पालाश किलो प्रति हेक्टरी) म्हणजेच 97 किलो युरिया, 375 किलो सिंगल सुपर फॉस्पेट, 67 किलो म्युरेट ऑफ पोटॅश द्यावे. उर्वरित नत्राचा हप्ता 97 किलो युरिया खुरपणी झाल्यानंतर तीन आठ्वड्यानी प्रति हेक्टरी पहिल्या पाण्याच्या वेळी द्यावा.
गव्हाच्या बियाण्यास पेरणीपूर्वी कॅप्टन किंवा थायरम या बुरशीनाशकाची 3 ग्रॅम प्रति किलो बियाणे या प्रमाणात बीजप्रक्रिया करावी तसेच प्रति 10 किलो बियाण्यास 250 ग्रॅम ऍझोटोबॅक्टर व 250 ग्रॅम पीएसीबी या जिवाणू संवर्धनाची बीजप्रक्रिया करावी.
Late sowing of wheat 2025 पेरणी उथळ म्हणजे 5 ते 6 से.मी. खोल करावी. त्यामुळे उगवण चांगली होते. पेरणी उभी-आडवी अशी दोन्ही बाजूने न करता ती एकेरी करावी. म्हणजे आंतरमशागत करणे सोईचे होते. बियाणे झाकण्यासाठी कुळव उलटा करून चालवावा म्हणजे बी व्यवस्थित दबून झाकले जाते. जमिनीचा उतार लक्षात घेऊन गव्हासाठी 2.5 ते 4 मीटर रुंदीचे व 7 ते 25 मीटर लांब या आकाराचे सारे पडावेत.
बागायत उशिरा पेरलेल्या गव्हास तीन आठवड्यांनी खुरपणी करावी. पीक कांडी अवस्थेत आले की मजुरांच्या साह्याने तणांचा बंदोबस्त करता येत नाही. पिकांची नासाडीच जास्त होण्याची शक्यता असते. अशा परिस्थितीत तण नियंत्रणासाठी तणनाशकाचा वापर करणे फायद्याचे ठरते. तसेच वाढते मजुरीचे दर, वेळेवर मजुरांची अनुउपलब्धता यामुळे तणनाशकांचा वापर फायदेशीर व प्रभावी ठरतो.

Late sowing of wheat 2025 जमिनीत कायम करू ती ओलावा राहून पीक क्षेत्रात थंड हवा राहण्यासाठी पिकास नेहमीपेक्षा कमी अंतराने पंधरा दिवसांनी योग्य मात्रेत पाणी द्यावे तापमान कमी राहण्यासाठी गावांसाठी तुषार सिंचनाचा वापर करावा तुषार सिंचनाने शेवटचे पाणी ऐंशी ते 85 दिवसा दरम्यान द्यावे. बागायत उशिरा पेरणी केलेल्या गहू पिकास जमिनीच्या मगदूरानुसार पाण्याच्या पाण्या कमी जास्त होऊ शकतात.
Late sowing of wheat 2025 जर एकच पाणी देणेइतके उपलब्ध असेल, तर पेरणीनंतर 40 ते 42 दिवसांनी गव्हास पाणी द्यावे. दोन पाणी देणेइतका पाणीसाठा उपलब्ध असेल तर पहिले पाणी पेरणीनंतर 20 ते 22 दिवसांनी आणि दुसरे पाणी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. तीन पाण्याच्या पाळ्या देणे शक्य असेल तर पहिले पाणी 20 ते 22 दुसरे 42 ते 45 व तिसरी 60 ते 65 दिवसांनी द्यावे. अशा रीतीने सुधारित तंत्रज्ञानाचा वापर करून गव्हाचे उत्पादन घ्यावे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |