मुरघास: पौष्टिक हिरवा चारा!! Nutritious Green Fodder 2025

Nutritious Green Fodder 2025 भारत हा शेती प्रधान देश आहे. शेती व्यवसायास पूरक व्यवसाय म्हणून दुग्धव्यवसायाचा उल्लेख केला जातो. उत्कृष्ट प्रतीच्या दूध उत्पादनात सकस चाऱ्याचे फार महत्व आहे.

Nutritious Green Fodder 2025

Nutritious Green Fodder 2025 अनुवशिकदृष्ट्या गाय किंवा म्हैस कितीही उच्च वंशावळीची असली तरी तिचे दुग्धोत्पादनाचे अनुवंशिक गुण प्रत्यक्ष उतरवण्याकरिता सकस चारा उपलब्ध करून देणे फार महत्वाचे आहे. दुभत्या जनावरांना दररोज सरासरी 20 ते 25 किलो हिरव्या चाऱ्याची आवश्यकता असते. हिरवा चारा फक्त पावसाळ्यात मुबलक स्वरूपात उपलब्ध असतो.

पीएम किसानच्या 21 व्या हप्त्याची प्रतीक्षा संपली, या दिवशी मिळणार हप्ता!!

Nutritious Green Fodder 2025 उन्ह्याळ्यात तर हिरव्या चाऱ्याची तीव्र टंचाई निर्माण होते. हिरव्या चाऱ्या अभावी गाई व म्हशी दूध कमी देतात. या अचणींवर मात करण्यासाठी मुरघास हा एक रामबाण उपाय आहे. मुरघास हि चारा साठविण्याची पारंपरिक व उत्तम पद्धत आहे. परंतु ती आपल्या देशात मोठ्या प्रमाणात प्रचलित नाही.

WhatsApp Group Join Now

मुरघास म्हणजे काय?

Nutritious Green Fodder 2025 मुरघास म्हणजे जनावरांना खाण्यास योग्य असा हिरवा चारा कापून, कुट्टी करून योग्यपद्धतीने बनविलेल्या सायलोपीटमध्ये हवाबंद पद्धतीने साठविणे व त्यात मुरवणे. त्यात किंवन प्रक्रिया होऊन चारा लूसलुसीत व चवदार बनतो. असा मुरलेला हिरवा चारा उन्ह्याळ्यात जनावरांना खाऊ घातला जातो. मुरघास हि आपल्या शेतामध्ये आवश्यकतेपेक्षा जास्त झालेला हिरवा चारा साठविण्याची अत्यंत उत्कृष्ट व सोपी पद्धत आहे.

Nutritious Green Fodder 2025 मुरघासाचे फायदे-

  1. कमी खर्चात जनावरांना वर्षभर हिरवा चारा मिळतो.
  2. मुरघास इतर चाऱ्यांच्या पौष्टिक असतो व काही महिन्यानंतरही त्यातील अन्नघटक मूळस्थितीत साठवले जातात.
  3. जनावरे मुरघास आवडीने खातात व त्यामुळे चारा वाया जात नाही.
  4. मुरघासाकरिता पीक बुडख्यापासून वापरल्यामुळे जास्त खाद्य मिळू शकते.
  5. मुरघास बनवताना चाऱ्या करिता केलेले पीक एका दिवसात काढून ते राण लगेच दुसऱ्या पिकाकरिता उपलब्ध होते.
  6. मुरघास चवीला चांगला व पचनास हलका असतो.
  7. मुरघास कोणत्याही हंगामात बनवता येतो.
  8. वाळलेल्या चाऱ्याच्या साठवणुकिस लागणाऱ्या जागेपेक्षा मुरघास साठवण्यासाठी कमी जागा लागते.
  9. मुरघासावर प्लास्टिकचे आवरण असल्यामुळे पाऊस व इतर वाईट हवामानाचा त्यावर काहीही परिणाम होत नाही.
  10. वाळलेल्या चाऱ्यापेक्षा जनावरे मुरघास आवडीने खातात.
  11. चारा हवाबंद राहिल्याने त्यातील जीवनसत्वे नाश पावत नाहीत.

Nutritious Green Fodder 2025 मूरघासाचे तोटे-

  1. मुरघास बनवण्यासाठी कुट्टी यंत्रांची आवश्यकता असते.
  2. एकदा सायलोपिट उघडल्यावर त्यातील मुरघास नियमित वापरला पाहिजे.
  3. मुरघास बनवताना खूप कामगार लागतात.

मुरघासासाठी चारा पिके:

खाण्यास योग्य अशा कोणत्याही प्रकारच्या चारा पिकापासून मुरघास बनवता येतो. ज्वारी, मका, बाजरी, ओट, गजरात, यशवंत, गिनीगवत इत्यादी.

WhatsApp Group Join Now

मुरघासाकरिता चारा पिकांची कापणी केव्हा करावी

एकदलयुक्त शर्करायुक्त चारा पिकाची कापणी पीक 30 ते 50 टक्के फुलोऱ्यात असताना अथवा दाणे पिकात असताना करावी. द्विदलवर्गीय प्रथिनेयुक्त पिकांची कापणी 10 ते 20 टक्के फुलोऱ्यात असताना करावी. हिरव्या गवताची कापणी फुले निसवत असताना करावी. मुरघास तयार करताना चाऱ्यातील पाण्याचे प्रमाण 35 ते 70 टक्के असावे.

Nutritious Green Fodder 2025 मुरघास बनविण्याची पद्धत:

मुरघास बनवण्याची पद्धती रासायनिक तसेच किण्वन प्रक्रियेवर अवलंबून असते. 65 ते 70 टक्के पाण्याचे प्रमाण असलेला हिरवा चारा हवाबंद वातावरणात वर्षभर साठवला जातो. हिरव्या चार्‍यातील जिवंत वनस्पती पेशी श्वसन क्रियेसाठी तेथील प्राणवायू वापरून कार्बन डायऑक्साईड वायू बाहेर सोडतात. अन्य कालावधीत तेथे प्राणवायू विरहित वातावरण तयार होते. याचबरोबर जीवाणू, कवक, ईस्ट इत्यादी. मुळे किण्वन प्रक्रिया चालू होते.

मुरघासातील कार्पोहायड्रेटचे विघटन होऊन ऍसेटिक आम्ल व लॅक्टिक आम्ल तयार होतात. प्राणवायू विरहित वातावरणात जेव्हा आम्लता वाढते तेव्हा वरील जिवाणू ईस्ट, कवक व सचेतकची क्रिया थांबते. ज्यावेळी चाऱ्याची आम्लता 4.2 सामू पेक्षा कमी होते त्यावेळी जिवाणूंची वाढव थांबते. या क्रियांमुळे चाऱ्यातील अन्न घटकांचे विघटन थांबते. असा हिरवा चारा मूळ अवस्थेत बरेच दिवस साठविला जातो. मुरघास तयार केल्यापासून तिसऱ्या महिन्यानंतर तो जनावरांना चारण्यास वापरावा.

Nutritious Green Fodder 2025 मुरघास वापर:

मुरघास 55 ते 60 दिवसात तयार होतो. सायलोपिट उघडल्यानंतर त्यातून दररोज कमीत कमी 5 सेंमी ते 2.5 इंच इतका मुरघास वापरावा कारण एकदा गड्डा उघडल्यानंतर त्यात 5 सेंमी इतकी हवा आत जाऊ शकते व मुरघास नसला जातो. मुरघास आंबट गोड लागतो. त्यामुळे जनावरे आवडीने खातात पूर्ण वाढलेल्या गाई अथवा म्हशीला दिवसाला 15 ते 20 किलो व शेळ्या व मेंढ्याना प्रत्येकी पाऊण ते एक किलो मुरघास घालावा.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment