सोयाबीन, मूग, उडीद खरेदी आजपासून नोंदणीतील अडथळ्यांवरून शेतकरी त्रस्त!! NAFED Shetmal Kharedi 2025

NAFED Shetmal Kharedi 2025 हमीदराने सोयाबीन, मूग आणि उडीद खरेदी सुरु होण्याच्या पार्श्वभूमीवर मोठ्या प्रमाणावर शेतकरी खरेदी केंद्रावर नोंदणीसाठी गर्दी करत आहेत.

NAFED Shetmal Kharedi 2025

NAFED Shetmal Kharedi 2025 मात्र, इंटरनेट कनेक्टिव्हिटी, सर्व्हर डाऊन, तसेच बायोमेट्रिक ठसे न उमटणे यामुळे शेतकऱ्यांना अनेक ठिकाणी ताटकळत बसावे लागत आहे.

अतिवृष्टी व पूर नुकसानभरपाई 60 टक्के शेतकरी वेटिंगमध्ये, कशामुळे अडकलीय मदत?

NAFED Shetmal Kharedi 2025 13 नोव्हेंबरपर्यंत बीड जिल्ह्यात सोयाबीन व उडीद विक्रीसाठी एकूण 11 हजार 142 शेतकऱ्यांनी नोंदणी पूर्ण केली आहे.

WhatsApp Group Join Now

नोंदणीतील अडथळे कायम: NAFED Shetmal Kharedi 2025

शेतकरी खरेदी केंद्रावर कागदपत्रांसह पोहोचत असले तरी ठसा न लागणे, कमी इंटरनेट स्पीड, आणि सर्व्हर डाऊन यामुळे नोंदणीला उशीर होत आहे. काही केंद्रावर तासन्तास रांगा लागत असून शेतकऱ्यांची मोठी गैरसोय होत आहे.

बीड जिल्ह्यातील नोंदणीची परिस्थिती NAFED Shetmal Kharedi 2025

सध्या 23 खरेदी केंद्रावर नोंदणी सुरु असून सर्वाधिक नोंदणी अंबाजोगाई तालुक्यातील घटनांदूर केंद्रावर 1 हजार 936 झाली आहे.

इतर प्रमुख केंद्रावरील नोंदणी

बीड – 831 शेतकरी

आनंदवाडी – 805

वडवणी – 701

WhatsApp Group Join Now

उर्वरित 19 केंद्रावरही शेतकरी मोठ्या प्रमाणात नोंदणीसाठी उपस्थित आहेत.

15 नोव्हेंबरपासून सोयाबीन, मूग, उडदाची अधिकृत खरेदी प्रक्रिया बीड जिल्यातील सर्व 23 केंद्रावर सुरु होणार आहे.

सोयाबीनसाठी 10 हजार 410 आणि उडदासाठी 732 शेतकऱ्यांनी नोंदणी केलेली आहे. एसएमएस मिळताच शेतकऱ्यांनी शेड्युलप्रमाणे केंद्रावर माळ आणावा. -एच. डी. भोसले, जिल्हा मार्केटिंग अधिकारी”

बाजारभावात वाढ परंतु हमीभावापर्यंत अंतरच

NAFED Shetmal Kharedi 2025 खुल्या बाजारात सोयाबीनचे दर सध्या 4 हजार 300 ते 4 हजार 800 दरम्यान प्रतिक्विंटल दर मिळत आहे.

अलीकडच्या दोन दिवसात दरात वाढ झाली असली तरी हमीभाव 5 हजार 328 पर्यंत पोहोचले नाहीत.

व्यापाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, जास्त आद्र्ता, नॉन-एफएक्यू माल, तातडीची आर्थिक गरज यामुळे बरेच शेतकरी हमीभावाची वाट न पाहता खुल्या बाजारातच विक्री करत आहेत.

नाफेडचे नियम काय?

12% आद्रता असलेला सोयाबीनच खरेदीस पात्र

केंद्रावर चाळणीसाठी 60 ते 80 रुपये प्रति क्विंटल खर्च

हमाली + वाहतूक खर्च वाढल्याने शेतकरी हमीभाव टाळून बाजारात विक्रीला प्राधान्य देतात.

उत्पन्न कमी आहे, खर्च मात्र जास्त. हमीभाव मिळेपर्यंत थांबणे अवघड जाते असल्याचे शेतकरी सांगतात.

शासनाने जाहीर केलेले हमीभाव

सोयाबीन- 5 हजार 328 रुपये

मूग- 8 हजार 768 रुपये

उडीद- 7 हजार 800 रुपये

अतिवृष्टीमुळे सोयाबीनची सरासरी उत्पादकता 6 क्विंटल प्रति हेक्टर इतकी खाली गेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना आता खरेदी मर्यादा किती असेल? जुना साठा विकत येईल का? याबाबतची चिंता वाढली आहे.

उत्पदकता घटली: NAFED Shetmal Kharedi 2025

बऱ्याच शेतकऱ्यांनी मागील वर्षाचे सोयाबीन साठवून ठेवले आहे. पण यावर्षी उतपादन कमी असल्याने शासकीय खरेदी केंद्रावर प्रति हेक्टर किती माल स्वीकारला जाणार याकडे सर्वाचे लक्ष लागले आहे.

इतर माहितीसाठी येथे क्लिक करा

Leave a Comment