दुधाळ गाईची निवड कशी करावी?
Cow breeds of Maharashtra 2025 सर्वसाधारणपणे दुधाळ गाईचा मागील भाग मोठा व रुंद असतो. चारही सड एकाच आकाराचे असून त्यांची लांबी सारखी असते. कासेच्या शिरा मोठ्या लांब व स्पष्ट असतात. जनावर तरतरीत असते. कातडी तजेलदार मऊ व पातळ असते. सर्वसाधारण बांधा भक्कम असतो व कोठा तुलनात्मकदृष्ट्या मोठा असतो.

महाराष्ट्रात आढळणाऱ्या महत्वाच्या गायींच्या जाती
गौळाऊ: हि गुरे मुख्यतः महाराष्ट्रातील वर्धा, नागपूर व मध्यप्रदेशातील छिंदवाडा जिल्ह्यात आढळतात. हा प्रदेश काहीसा डोंगराळ असून उन्हाळा तीव्र व हिवाळा सौम्य असतो. गौळाऊ गुरे मध्यम उंचीची, हलक्या बांध्याची, रुंद तोंडाची असतात. डोके अरुंद व खाली निमुळते असते. कपाळ सपाट असते, डोळे अरुंद व खाली निमुळते असते. कपाळ सपाट असते, डोळे बदामी आकाराचे, कान मध्यम आकाराचे व उंच असतात.
उत्तर भारतात अतितीव्र थंडीची लाट राज्यात ‘या’ भागात थंडीचा कडाका आणखी वाढण्याची शक्यता!!
Cow breeds of Maharashtra 2025 शिंगे आखूड असून काहीशी मागे वळलेली असतात. मान आखूड व खांदा एका बाजूस थोडा झुकलेला असतो. पाय सरळ व मजबूत पोळ खूपच लोंबती असते. अंगावरील कातडी सैल असते. शेपटी आखूड व रंग पंधरा असतो. बैल चपळ असून शेती व वाहतुकीकरिता उत्तम असतात.

देवणी: Cow breeds of Maharashtra 2025
आंध्रप्रदेश महाराष्ट्राचा उत्तर आणि पश्चिम भाग बीड व नांदेड जिल्हे हा या जनावरांचा मूळप्रदेश आहे. यांचा बांधा मध्यम असून गीर जातीच्या गुरांशी यांचे बरेच साम्य असते. अंगावर काळे पांढरे ठिपके असतात. कपाळ फुगीर व कान लांब असून शिंगे वळणदार असतात. कातडी सैल असते. पोळ लोंबती तर छाती फुगीर असते. खुरे काळी असतात. बैल शेतीसाठी व ओझे वाहण्यासाठी उपयुक्त असतात. गायीचा दूध देण्याचा कालावधी 300 दिवस असून सरासरी दूध उत्पादन 1100 लिटर असते.
डांगी: Cow breeds of Maharashtra 2025
हि गुरे अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग, नाशिक जिल्हा या भागात आढळतात. या भागात उन्ह्याळ्यात जास्त उष्ण तापमान आणि हिवाळ्यातील थंडी जास्त असते. डांगी गुरे लाल, पांढऱ्या किंवा काळ्या पांढऱ्या रंगाची असतात. त्यांचा बांधा मध्यम परंतु वजनदार असतो. डोके लहान असून कपाळ फुगीर असते. नाकपुड्यांमधील भाग रुंद असतो.
शिंगे आखूड व जाड असतात. कान लहान असतात. या गुरांचे पाय आखूड पण मजबूत असतात. पोळ मध्यम आकाराची व लोंबती असते. वशिड मध्यम आकाराची व कातडी चमकदार असून त्यावर एक प्रकारचा तेलकट स्त्राव असतो. डांगी गुरे मध्यम गतीच्या जड कामासाठी तसेच डोंगराळ व जास्त पावसाच्या भागात भात शेतीसाठी उपयोगी असतात. हि जात दुहेरी उपयोगाची आहे.
खिल्लारी: Cow breeds of Maharashtra 2025
या जातीच्या गुरांचे चार प्रकार मुख्यतः आढळून येतात. ते म्हणजे आटपाडी, महाल, म्हसवाड खिल्लार, तापी खिल्लारी, आणि नकली खिल्लारी होत. हि गुरे महाराष्ट्र राज्यातील सोलापूर, सातारा, अहमदनगर जिल्ह्याचा काही भाग व जळगाव जिल्ह्यात आढळून येतात. या गुरांचा बांधा भरीव व त्वचा घट्ट असते. हि गुरे चपळ व तापट असतात. या गुरांचा रंग पांढरा फिक्का करडा असतो. वळूचे वशिड, मान व पुठ्यावरील करडा रंग गर्द असतो.
कपाळ लांब व अरुंद असून मागील बाजूस फुगीर होत जाते. कपाळाच्या मधोमध खोलगट भाग असतो. डोळे लहान व लांबट असतात. कान लहान आणि टोकदार असतात. मान काहीशी आखूड व पोळ लहान असते. पाय सरळ असतात. खुरे काळी व घट्ट असतात. शेपटी मध्यम लांबीची असून त्वचा लवचिक असते. खिल्लारी बैल मजबूत असून शेतीसाठी व जलद वाहतुकीसाठी प्रसिद्ध आहेत. गायी मात्र फार कमी दूध देतात.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |