Turmeric Market 2025 वाशिम जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी दिलासादायक बातमी समोर अली आहे. गेल्या काही महिन्यांपासून अस्थिरतेचा सामना करणाऱ्या हळदीच्या दरात आता पुन्हा एकदा तेजी दिसू लागली आहे.

Turmeric Market 2025 केवळ पाच दिवसांच्या कालावधीतच दरात तब्ब्ल 800 रुपयांची वाढ झाल्याने शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर आशेचे हास्य उमटलं आहे.
द्राक्षावरील मिलीबग ओळख व नियंत्रण!!
31 ऑक्टोबर रोजी वाशीम कृषी उत्पन्न बाजार समितीत हळदीला कमाल 13 हजार 400 रुपये प्रति क्विंटल दर मिळाला होता. मात्र 6 नोव्हेंबर रोजी रिसोड बाजार समितीत 14 हजार 200 रुपये प्रति क्विंटलचा उच्चांक नोंदवला गेला. म्हणजेच फक्त 5 दिवसात दरात 800 रुपयांची झेप दिसून आली.

Turmeric Market 2025 शेतकऱ्यांना दिलासा:
जिल्ह्यातील शेतकरी नैसर्गिक आपत्ती, अतिवृष्टी आणि उत्पादन खर्चवाढीमुळे आधीच अडचणीत आहेत. सोयाबीनसारख्या मुख्य पिकाला अपेक्षित दर न मिळाल्याने शेतकरी आर्थिकदृष्ट्या कोलमडले आहेत. अशात हळदीच्या दरात आलेली हि वाढ काहीशी दिलासा देणारी ठरत आहे.
गेल्या काही महिन्यांपासून उत्पादन खर्चाच्या तुलनेत कमी भाव मिळत असल्याने शेकऱ्यांना तोटा सहन करावा लागत होता.
मात्र आता हंगामाच्या अखेरीस दारात सुधारणा झाल्याने नव्या हंगामात चांगल्या भावाची अपेक्षा निर्माण झाली आहे.

Turmeric Market 2025 उत्पादनावर मूळकूज रोगाचे संकट
या वर्षी वाशिम जिल्ह्यात 25 हजार 322 हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रात हळदीची लागवड करण्यात आली आहे. सुरुवातीला पोषक हवामानामुळे पिके बहरली होती, पण सप्टेंबर मध्ये झालेल्या सततच्या अतिवृष्टीमुळे पिकावर मूळकूज रोगाचा प्रादुर्भाव झाला. परिणामी उत्पादनात घट होण्याची भीती निर्माण झाली आहे.
कोणत्या हळदीला किती दर?
| हळदीचा प्रकार | किमान दर (क्विंटल) | कमाल दर (क्विंटल) |
| कांडी हळद | 11,000 | 14,200 |
| गहू हळद | 10,900 | 13,150 |
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |