Control of Mealybug on Grapes 2025 महाराष्ट्रात द्राक्ष हे पीक प्रामुख्याने सांगली, अहमदनगर, नाशिक या जिल्ह्यामध्ये घेतले जाते. गेल्या काही वर्षांमध्ये द्राक्ष पिकांवर पिठ्या ढेकणाचा (मिलीबग) प्रादुर्भाव मोठ्या प्रमाणात वाढतच आहे. भारतात या किडीमुळे मोठ्या प्रमाणात, आर्थिक नुकसान होत आहे. द्राक्ष पीक हे त्यासाठी अपवाद नाही. त्यामुळे पिठ्या ढेकणाचा वाढता उद्रेक व त्यामुळे होणारे पिकाचे नुकसान विचारात घेऊन त्यावर प्रतिबंधात्मक उपाय या लेखाद्वारे देत आहोत.

नुकसानीचा प्रकार: Control of Mealybug on Grapes 2025
पिठ्या ढेकूण वेलीच्या बुंध्यातील ओलांड्यातील, पानातील, फुलोऱ्यातील व घडातील रसशोषण करतात. मिलीबगच्या प्रादुर्भाव वेलीच्या वाढीच्या ठिकाणी झाला तर नवीन फुटीची वाढ खुंटते व या नवीन फुटीचे रूपांतर वेलीत होत नाही. पिठ्या ढेकूण स्वतःच्या शरीरातून मधासारखा चिकट पदार्थ बाहेर टाकतात.
हिमालयात बर्फवृष्टीमुळे थंड वारे दक्षिण भारताकडे; कसा राहील थंडीचा अंदाज?
या चिकट पदार्थामुळे प्रादुर्भाव झालेले घड निर्यातीस, बेदाण्यास किंवा बाजारात पाठवण्यास लायक राहत नाहीत. या किडीमुळे द्राक्षवेलींची वाढ खुंटते. नवीन वेलींवर मोठ्या प्रमाणात मिलीबगचा प्रादुर्भाव झाल्यास त्या मरतात. ज्या ठिकाणी या किडींचा मोठ्या प्रमाणात प्रादुर्भाव झालेला असतो, तिथे 100 टक्के पर्यंत घट येते.

जीवनक्रम: Control of Mealybug on Grapes 2025
मॅकॉनेलीकोकस हिरसुट्सची मादी तांबड्या रंगाची असते तर प्लॅनोकॉकस सिट्रिची मादी पिवळसर पांढऱ्या रंगाची असते. या दोन्ही प्रकारच्या किडींवर पांढऱ्या मेणासारख्या पदार्थाचे आवरण असते. प्रत्येक मिलीबगची मादी सैलसर कापसासारख्या पुंजक्यात साधारणपणे एका आठवड्यात 300 ते 500 अंडी घालते.
मॅकॉनेलीकोकस हिरसुटस मादीची अंडी नारंगी रंगाची असतात. तर प्लॅनोकोकस सिट्रि मादीची अंडी पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. या अंड्यामधून साधारणपणे 5 ते 6 दिवसात पिल्ली बाहेर पडतात. पिल्ली अंड्यातून बाहेर पडल्यावर वेलींवर स्थिरावतात ते वेलींमधील रस शोषण्यास सुरुवात करतात. मॅकॉनेलीकोकस हिरसूटसची पिल्ले नारंगी रंगाची असतात.
तर प्लॅनोकोकस सिट्रीची पिल्ली पिवळसर पांढऱ्या रंगाची असतात. मिलीबगची मादी आणि नर पहिल्या काही अवस्थांमध्ये सारखेच दिसतात मिलीबगची मादी तीन जाते, तर नर चार अवस्थांमधून जातात. मिलीबगचा नर कापसासारखी पिशवी तयार करतो आणि पिशवीत हिवाळ्यात कोषावस्थेत जातो. प्रौढ नरास दोन पंख आणि दोन हाल्टर्स असतात. मिलीबगची मादीच मोठ्या प्रमाणात वेलींचे नुकसान करते व नर मिलीबग क्वचितच वेलींचे निक्सन करतो मिलीबगचा जीवनक्रम साधारणपणे 30 दिवसात पूर्ण होतो.
एकात्मिक व्यवस्थापन: Control of Mealybug on Grapes 2025
अनेक पिकांवर सापडणाऱ्या मिलीबगचे संपूर्ण नियंत्रण करणे बरेच अवघड आहे. मिलीबग खोडाच्या भेगात आणि सालीखाली राहतात व त्याची स्वतःची वसाहत निर्माण करतात. मिलीबगच्या प्रत्येक अवस्थेला मेणासारखे आवरण असल्यामुळे त्यांचा पारंपरिक कीटकनाशकांनी बंदोबस्त करणे अवघड आहे. पारंपरिक, यांत्रिक, जैविक आणि रासायनिक या पद्धतींचा एकत्र वर्षभर वापर करून मिलीबगची संख्या कमी ठेऊन उत्पादनाचे नुकसान टाळणे शक्य आहे.
एप्रिल छाटणीनंतर:
द्राक्ष काढणीच्या वेळेस खराब द्राक्ष्यांचे घड म्हणजेच मिलीबगचा प्रादुर्भाव असलेले घड गोळा करून नष्ट करावेत.
द्राक्षांच्या बागांकडून छाटणीनंतर कीडग्रस्त काड्या तसेच पालापाचोळा गोळा करून नष्ट करावा.
छाटणीनंतर द्राक्षाच्या खोडावरील तसेच वलांड्यावरील मोकळी झालेली साल काढून जाळून नष्ट करावी.
मिलीबगच्या वाढीस मदत करणारे दुसरी पिके आणि गवत हे मिलीबगला लपण्यास वर्षभर मदत करतात त्यामुळे ही पिके नष्ट करावेत.
जवळपास मुंग्यांची वसाहत व वारुळे शोधून नष्ट करावेत. त्यासाठी एप्रिल-मे मध्ये क्लोरोपायरीफॉस 20c 2.5 मिली /लि. पाण्यात मिसळून जमिनीत देणे किंवा मॅलाथिऑन पावडर 5 टक्के 10 किलो प्रति एकर वापरावी. मुंग्यांमुळे मिलीबगची संख्या वाढण्यास मदत होते म्हणून मुंग्यांचा बंदोबस्त करणे गरजेचे आहे.
एप्रिल-मे मध्ये 2 मिली डायक्लोरोव्हॉस 76 ईसी + 2 ग्रॅम फिश ऑइल रोझीन सोप 1 लि. पाण्यात एकत्र करून खोडावर व ओलांड्यावर फवारावे किंवा त्याने ओलांडे व खोड चांगले पुसून काढावेत.
इमिडाक्लोप्रिड 70 टक्के दाणेदार पाण्यात मिसळणारी भुकटी 0.5 ग्रॅम लिटर प्रति वेल या प्रमाणात प्रत्येक वेलीला जमिनीतून एप्रिल-मे मध्ये द्यावे.
जमिनीतून औषध दिल्यानंतर साधारणपणे 30 दिवसांनी मोथोमिल 1 ग्रॅम प्रति लिटर या प्रमाणे वेलीवर फवारणी करावी.
पहिल्यांदा ऑगस्ट-सप्टेंबरमध्ये मिलीबगवर उपजीविका करणारे परोपजीवी कीटक लेडीबर्ड बीटल (क्रिप्टोलिमस मोंटेझरी) 5000 प्रति हेक्टर याप्रमाणे सोडावे.

ऑक्टोबर छाटणीनंतर
नोव्हेंबर ते फेब्रुवारी पर्यंत खोडावरील व ओलांड्यावरील मिलीबगच्या वसाहती शोधून त्यांचा नायनाट करावा.
दुसऱ्यांदा ऑस्ट्रेलियन लेडीबर्ड बीटल 5000 प्रति हेक्टर प्रमाणे डिसेंबरच्या शेवटच्या पंधरवड्यापासून जानेवारीच्या पहिल्या पंधरवड्यातपर्यंत बागेत सोडाव्यात.
मिलीबगचा प्रादुर्भाव आणि द्राक्ष काढणीच्या वेळा पाहून गरज भासल्यास फेब्रुवारीच्या शेवटी किंवा मार्चच्या पहिल्या आठवड्यात क्लोरपायरीफॉस 20 टक्के (2 मिली/ ली) च्या एक किंवा दोन फवारण्या कराव्यात.
द्राक्ष काढणीचे वेळेस जर मिलीबगचा प्रादुर्भाव जास्त असेल तर जेट स्प्रे पंपाच्या साहाय्याने पाण्याची एकदा फवारणी करावी.
मिलीबगचा प्रादुर्भाव पाहून खाली दिलेल्या कीटकनाशकांची फवारणी करावी.
मिलीबगच्या नियंत्रणासाठी शिफारस केलेली कीटकनाशके
| कीटकनाशके | मात्रा (प्रति 10 लि. पाणी) |
| ब्युप्रोफेझिन 25 एस सी | 12.5 मिली |
| मिथोमिल 40 एसपी | 10 ग्रॅम |
| आझाडिरॅक्टिन 1% | 20 मिली |
| क्लोरपायरीफॉस 20 ईसी | 20 मिली |
| इतर माहितीसाठी | येथे क्लीक करा |