Maharashtra Weather Update 2025 मुंबई: ऑक्टोबर महिना पावसाच्या सरीत गेल्यानंतर आता नोव्हेंबर थंडी घेऊन येणार आहे. हिमालयातील हवामान बदलामुळे दक्षिण भरताकडे शीत वारे वाहू लागले आहे.

Maharashtra Weather Update 2025 शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान 16 तर, राज्याचे 10 अंश सेल्सिअसपर्यंत उतरण्याची शक्यता आहे. त्यामुळे दिवाळीनंतर का होईना थंडी भरण्याचे संकेत हवामान विभागाने दिले आहेत.
राज्यात 14 लाख हेक्टरवर उसाची लागवड यंदा साखरेचे बंपर उत्पादन होणार!!
Maharashtra Weather Update 2025बंगालच्या उपसागरात आलेलं मोंथा चक्रीवादळ आणि अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे मुंबईसह राज्यभरात अवकाळी पावसाने थैमान घातले.

Maharashtra Weather Update 2025 त्यामुळे नागरिकांना ऑक्टोबर हिटचे चटके बसले नाहीत. हा महिना सुखावह गेला असतानाच त्यात आणखी भर पडणार असून, नागरिकांना नोव्हेंबर महिन्यात थंडी अनुभवता येईल.
“गुरुवारी जारी केलेल्या आयएमडीच्या विस्तारित श्रेणीच्या अंदाजानुसार, महाराष्ट्रात येत्या 2 आठवड्यात म्हणजे 7-20 नोव्हेंबर दरम्यान किमान आणि कमाल तापमान सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे. -कृष्णानंद होसाळीकर, जेष्ठ हवामान शास्त्रज्ञ”
“हिमालयात बर्फवृष्टी झाली आहे. त्यामुळे थंड वारे दक्षिण भारताकडे वाहू लागले आहेत. याचा परिणाम म्हणून शनिवारपासून बुधवारपर्यंत मुंबईचे किमान तापमान 16 अंश सेल्सियस तर कमाल तापमान 30 नोंदविले जाईल. राज्याचे कमाल तापमान 26 तर किमान तापमान 12 ते 10 अंश सेल्सियस असेल. त्यानंतर पुन्हा तापमानात वाढ होईल.-अथ्रेय शेट्टी, हवामान अभ्यासक”
“महाराष्ट्रात भागपरत्वे कमाल तापमान 28 ते 32 तर किमान तापमान 18 ते 20 अंश आहे. येणाऱ्या थंड वाऱ्यांना सध्या अटकाव नाही आकाश निरभ्र आहे. महाराष्ट्रात थंडीची शक्यता आहे. शनिवारपासून कमाल व किमान तापमानात महाराष्ट्रात हळूहळू 2 ते 3 अंशांनी घसरण होऊन संपूर्ण महाराष्राष्टात थंडीला सुरुवात होईल. -माणिकराव खुळे, हवामान तज्ज्ञ”
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |