Sugar Production 2025 नवी दिल्ली: महाराष्ट्रासह देशात पडलेल्या जोरदार पावसामुळे साखरेचे बंपर उत्पादन होणार असल्याचा दावा राष्ट्रीय सहकारी साखर कारखाना महासंघाने केला आहे.

Sugar Production 2025 यंदा देशात एकूण 345 लाख टन साखर उत्पादन होण्याची शक्यता आहे. तर, गेल्या वर्षीच्या तुलनेत महाराष्ट्रात साखरेचे उत्पादन 29 टक्क्याने वाढण्याची शक्यता आहे.
द्राक्षावरील भुरी रोगाचे व्यवस्थापन!!
Sugar Production 2025 महासंघाचे व्यवस्थापकीय संचालक प्रकाश नाईकनवरे यांनी ‘लोकमत’शी बोलताना सांगितले कि, यंदा देशभरात चांगला पाऊस पडला आहे.

Sugar Production 2025 यामुळे साखरेचे भरघोस उत्पादन होण्याची शक्यता आहे. यंदा 345 लाख टन साखरेची निर्मिती होऊ शकते. मागच्या वर्षी 296 लाख टन साखर तयार झाली होती. मोठ्या पावसामुळे उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
Sugar Production 2025 कर्नाटकात सहा टक्के पेरणीक्षेत्र वाढले आहे. मात्र, उत्तरप्रदेशात पेरणीक्षेत्र तीन टक्क्यांनी घेतले असले तरी उत्पादन चांगले होण्याची शक्यता आहे. असेही नाईकनवरे यांनी सांगितले.
महाराष्ट्रात यंदा 29 टक्के उत्पन्न वाढण्याची शक्यता
- महाराष्ट्र आणि कर्नाटक साखर उत्पदनाच्या बाबतीत आघडीवर राहणार आहेत.
- महाराष्ट्रात 130 लाख टन साखर निर्मिती होण्याची शक्यता आहे.
- गेल्या वर्षी 93 लाख टन साखरेचे उत्पादन झाले होते.
- यंदा तब्बल 29 टक्क्याने उत्पन्न वाढण्याची शक्यता आहे.
- कर्नाटकातही 15 ते 20 टक्के उत्पादन वाढण्याची शक्यता आहे.
- महत्वाचे म्हणजे, महाराष्ट्रात यंदा उसाचे पेरणी क्षेत्र वाढले आहे.
- गेल्या वर्षी 13.82 लाख हेक्टरमध्ये ऊस लावण्यात आला होता.
- यंदा 14.71 लाख हेक्टरमध्ये उसाची लागवड झाली आहे.
| इतर माहितीसाठी | येथे क्लिक करा |